UPI new features 2025 Marathi: सविस्तर जाणून घ्या
UPI new features 2025 Marathi: नमस्कार, तुम्ही Google Pay, Phone Pay किंवा Paytm व इतर कोणतेही ॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डिजिटल पेमेंट्सचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना NPCI ने घेतलेला नवा निर्णय प्रत्येक UPI युजरसाठी विश्वास, सहजता आणि पारदर्शकतेचा अनुभव देणारा ठरतो आहे.(UPI new features ) “सोप्पं आणि विश्वासाचा” ह्या नवीन नियमानुसार आता तुमचे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने ट्रॅक करता येणार आहेत. चला तर मग, पाहूया या बदलांमुळे आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे.
मँडेट्सचे सुलभ ट्रॅकिंग म्हणजे काय?
What is easy tracking of mandates?
UPI new features 2025 Marathi: डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी आता एक उत्कृष्ट सुविधा मिळणार आहे. जर Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI अॅप वापरत असाल, तर व्यवहार तपासणीसाठी वेगवेगळ्या अॅप्समध्ये लॉगिन करण्याची गरज नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 31 डिसेंबर 2025 पासून नवीन नियम लागू करण्याचे ठरवले आहे, ज्यामुळे सर्व UPI अॅप्सचे ऑटोपे मँडेट्स आणि व्यवहार एका संगणकीत किंवा स्मार्टफोनच्या अॅपमध्ये एकत्रितपणे पाहता येतील. यामुळे आर्थिक पारदर्शकता आणि नियंत्रण वाढेल, तसेच डिजिटल पेमेंटचे सुरक्षिततेकडे एक मोठे पाऊल टाकले जाईल.
आता कृषी यांत्रिकीकरण योजनेची अनुदान मर्यादा काढली, जाणून घ्या नवीन नियम
यापूर्वी जर एखाद्या युजरकडे विविध अॅपवर मँडेट्स (जसे Netflixचे ऑटो पेमेंट Google Pay वर, तर विजेचे PhonePeवर) असतील, तर त्यांना प्रत्येक अॅपवर जाऊन व्यवहार पाहावे लागत होते. आता कोणत्याही एकाच UPI अॅपवरून सर्व मँडेट्स आणि ऑटो पेमेंट्स सहजपणे ट्रॅक करता येतील.
UPI new features 2025 Marathi: ही प्रणाली 31 डिसेंबर 2025 नंतर सर्व अॅपवर लागू होईल, आणि युजर्सना आर्थिक व्यवस्थापन, व्यवहार ट्रॅकिंग आणि ऑटो पेमेंट्स रद्द/बदलण्यात मोठी सोय होईल. हे बदल केवळ व्यवहार पारदर्शकतेत वाढ नव्हे तर सुरक्षिततेसाठीही फायदेशीर आहेत, कारण बायोमेट्रिक आणि फेस आयडी प्रमाणे प्रगत सुरक्षा पर्याय देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत.
आता कोणत्याही अॅपची मर्यादा नाही – एकाच ठिकाणी सर्व मँडेट्स आणि व्यवहार नियंत्रित, ट्रॅक आणि पोर्ट करता येतील; तसेच सुरक्षा फीचर्स (जसे बायोमेट्रिक व फेस आयडी) सुद्धा मिळतील, त्यामुळे व्यवहाराच्या सुरक्षिततेतही वाढ होईल.
लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात,’E-KYC’ कशी करावी – सोप्या पद्धतीने
नवीन सुरक्षा फीचर्स
new features and security
NPCI च्या या अपडेटमध्ये फेस आयडी आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सारख्या आधुनिक सुरक्षा फीचर्सचा समावेश असेल. यामुळे UPI व्यवहार अधिक सुरक्षित होतील आणि फ्रॉडच्या घटनांवर आळा बसेल.
“खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता”
युजर्सना मिळणारे फायदे
user’s benefits
- सर्व UPI व्यवहार एका ठिकाणी पाहण्याची सुविधा
- ऑटो पेमेंट्स आणि मँडेट्सचे सुलभ ट्रॅकिंग
- अॅप बदलणे आणि मँडेट पोर्टिंग अतिशय सोपे
- व्यवहारातील पारदर्शकता आणि वित्तीय नियंत्रण
- अधिक प्रगत सुरक्षा प्रणालींद्वारे विश्वास वाढ
UPI new features 2025 Marathi: डिजिटल पेमेंट युजर्ससाठी या बदलामुळे आर्थिक व्यवहार सांभाळणे अधिक सुलभ, सुरक्षित आणि एकसंध होणार आहे. ही सुविधा लागू झाल्यानंतर भारतातील UPI व्यवहारांचा अनुभव जागतिक दर्जाचा ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
UPI new features 2025 Marathi: अधिक माहिती साठी तुम्ही या सांकेतिक स्तरावर भेट देऊ शकता.National Payments Corporation of India (NPCI) —
https://www.npci.org.in/
ही माहिती असल्यास योग्य वाटल्यास आपण इतरांना देखील शेअर करू शकता.
“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”
![]()








