Narak Chaturdashi 2025 Marathi; थोडक्यात महत्वपूर्ण माहिती
Narak Chaturdashi 2025 Marathi; प्रकाशाचा उत्सव दीपावली,वसुबारसपासून सुरू होणारा हा उजळल्या आनंदाचा, संस्कारांचा आणि नात्यांच्या ऊबदार आठवणींचा सोहळा. (Narak Chaturdashi) नरक चतुर्दशीच्या रंगीबेरंगी दिवशी आणखी खुलतो. काही घरांत “पहिले पाणी” म्हणून, लहान मुलांच्या तोंडी येणारी ही ‘छोटी दिवाळी’ खास साजरी केली जाते,तर काही ठिकाणी ‘रूप चौदस’ या नावाने ही परंपरा अजून जिवंत आहे. या दिवशी अंधारावर विजय, वाईटावर चांगुलपणाचा जल्लोष, आणि घराघरात सौख्य, आरोग्य, समाधान व समृद्धीची आश्वासक किरणं फुलतात.
Narak Chaturdashi 2025 Marathi; प्रत्येक घरात लावलेली एक-एक ज्योत, आणि एकत्र आलेल्या कुटुंबातले हसू,हे सगळं अहंकार, आळस, नकारात्मकतेवर विजय मिळवून, आशेच्या आणि नव्या जीवनाच्या प्रकाशात जणू नवं बहर घेऊन येतं. चला, आपल्या परंपरेने नटलेल्या सणाबद्दल, थोडक्यात माहिती घेऊया.
आता सर्व UPI व्यवहार एका अॅपवर! मँडेट्स पोर्टिंग व ट्रॅकिंग म्हणजे काय? वापरण्याची पद्धत?
नरक चतुर्दशी केवळ बाह्य प्रकाशाचा नव्हे तर आंतरिक प्रकाशाचा सण आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अहंकार, लोभ आणि नकारात्मकतेसारख्या आंतरिक शत्रूंवर मात करूनच खरे प्रकाशाचे स्वागत करता येते. प्रत्येक ज्योत आपल्या आत असलेल्या दैवीतेचे प्रतीक आहे, जी अंधारावर मात करू शकते.
हा अंधारावर प्रकाश, वाईटावर सद्गुणांचा विजय आणि आत्मिक शुद्धतेचा प्रतीक आहे. हा सण आपल्याला शिकवतो की अंधार कितीही खोल असला तरी प्रकाशाचा एक कण त्याचा नाश करू शकतो.
नरक चतुर्दशी २०२५: तारीख आणि शुभ मुहूर्त
Narak Chaturdashi date and shubh Murtha
Narak Chaturdashi 2025 Marathi; २०२५ मध्ये नरक चतुर्दशी १९ ऑक्टोबर, रविवार रोजी साजरी केली जाईल. धार्मिक दृष्ट्या, शुभ मुहूर्त दुपारी १:५१ वाजता सुरू होऊन पुढच्या दिवशी दुपारी ३:४४ वाजता संपेल. संध्याकाळी दिवे लावण्याची परंपरा असल्याने, १९ ऑक्टोबर हाच दिवस उत्सवासाठी श्रेयस्कर ठरतो.
“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”
नरक चतुर्दशीचे महत्त्व
Narak Chaturdashi informant
Narak Chaturdashi 2025 Marathi; हा दिवस भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा यांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून जगाला त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. नरकासुर हा भूदेवी आणि भगवान वराह यांचा पुत्र असूनही, अहंकाराने वेढलेला होता. त्याच्या वधाने हा संदेश दिला की चांगले-वाईट दोन्ही एकाच मुळापासून उद्भवू शकते, पण अंतिम विजय नेहमीच धर्माचा होतो.
नरक चतुर्दशी हा आपल्या आंतरिक अहंकार, आळस आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा दिवस आहे. पहाटे तेलाने केलेले स्नान (अभ्यंग स्नान) केवळ शरीरशुद्धीच नव्हे तर आत्मशुद्धीचेही प्रतीक आहे.
“खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता”
नरकासुरवधाची कथा
Narakasur story
नरकासुर हा इतका शक्तिशाली झाला होता की त्याला फक्त त्याचीच आई मारू शकते, असे ब्रह्मदेवांचे वरदान होते. जेव्हा त्याने तिन्ही लोकांमध्ये अत्याचारांचा महापूर घालून देव, मानव आणि दानवांना त्रस्त केले, तेव्हा भगवान कृष्णांनी सत्यभामेसोबत युद्ध केले.
युद्धात कृष्ण जखमी झाले, तेव्हा सत्यभामेने धनुष्य उचलले आणि नरकासुराचा वध केला. मरण्यापूर्वी नरकासुराला त्याच्या चुका कळल्या आणि त्याने प्रत्येक वर्षी या दिवसाला उत्सव म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली.
भारतभरातील विविध नावाने हा साण केला जातो साजरा
This festival is celebrated across India under different names
Narak Chaturdashi 2025 Marathi; महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारत: पहाटे अभ्यंग स्नान, यमराजाची पूजा आणि संध्याकाळी दिवे लावणे.
गोवा: नरकासुराच्या पुतळ्यांचे दहन करून वाईटाचा नाश साजरा करणे.
पश्चिम बंगाल: भूत चतुर्दशी म्हणून ओळखला जाणारा हा दिवस, ज्यावर १४ दिवे लावून पूर्वजांचे स्मरण केले जाते.
तामिळनाडू: देवी लक्ष्मीची पूजा आणि ‘नोम्बू’ उपवास.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेश: दिवाळीच्या दिवशीच नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
विशेष उपाय यमदीप विधी
Special Remedy: Yamdeep Ritual
नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी घरातील सर्वात मोठ्या सदस्याने चौमुखी दिवा (यमदीप) लावावा. हा दिवा मोहरीच्या तेलातून करावा आणि त्याचे तोंड दक्षिण दिशेकडे ठेवावे. दिवा लावताना खालील मंत्र म्हटला जातो:
“मृत्युना पाषाणदण्डाभ्यां कालेन च मया सह।
त्रयोदश्यां दीपदानात सूर्यजः प्रीयतामिति।।”
Narak Chaturdashi 2025 Marathi; हा विधी केल्याने अकालमृत्यू टळतो आणि कुटुंबात सुख-शांती राहते असे मानले जाते.
या दिवशी सुवासिनी यांनी अभ्यंग स्नान करून सुरुवातीस गॅसवर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढून त्यानंतर स्वयंपाक करावा. ही गोष्ट शुभम मानल्या जाते.
असे देखील म्हणतात की या दिवशी सूर्य उदयाच्या आत अभंग स्नान करावे ज्यामुळे आपले पुढचे आयुष्य हे सुखकर आणि आनंदीमुळे जाते नाहीतर नर्क पडतो अशी देखील आख्यायिका आहे.
![]()








