Diwali Padwa 2025 Date; जाणून घेऊया थोडक्यात महत्वपूर्ण माहिती
Diwali Padwa 2025 Date; दीपोत्सवाच्या रंगीबेरंगी उत्सवात चौथा दिवस म्हणजे बलीप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा व्यवसायाची नव्या वर्षाची शुभ सुरुवात.Diwali padwa पती-पत्नीच्या प्रेमाचा पर्व, आणि भारतीय परंपरेतील एका महान दानशूर राजाचे स्मरण! व्यापारी वर्गासाठी वहीपूजन, गृहस्थांसाठी नव्या उमंगाची पहाट, आणि हर घरात नाळ मजबूत करणारा संस्कार असा हर्षोल्लास, नवचैतन्य, आणि भक्तीचा दिवाळी पाडवा साजरा होतो.
पाडव्याचा दिवस हे महाराष्ट्राचे अद्वितीय आणि ऐतिहासिक वारसा, भक्तीचा आणि दानतेचा सण म्हणून ओळखला जातो. चला तर मग आज आले का मध्ये जाणून घेऊया ह्या दिवाळी विषयी थोडक्यात आणि रंजक माहिती,
“खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता”
१. बलिप्रतिपदा (पाडवा)
Diwali padwa
Diwali Padwa 2025 Date; साडेतीन मुहूर्तांपैकी एक: दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
पती-पत्नीमधील प्रेम: या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. हा दिवस पती-पत्नीमधील दृढ प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे.
नवीन वर्षाची सुरुवात: उद्योजक आणि व्यापारी या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात मानून वहीपूजन (खातेपूजन) करतात.
बळीराजाचे स्मरण: हा दिवस राजा बळीचा सन्मान करण्याचा विशेष दिवस आहे. आजच्या दिवशी राजा बळी आणि भगवान विष्णूंच्या वामन अवताराचे स्मरण करून पूजन केले जाते.
समृद्धीची प्रार्थना: “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” ही प्रसिद्ध मराठी म्हण आजच्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करते. याचा अर्थ, प्रत्येक शेतकरी सुखी, समृद्ध आणि निरोगी होवो व आपला देश सुजलाम सुफलाम बनो.
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना,पैसे सुरक्षित ठेवून करा दुप्पट!
२. गोवर्धन पूजन
Govardhan puja
Diwali Padwa 2025 Date; पर्यावरण आणि श्रद्धेचा संगम: भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा अहंकार मोडून आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून व्रजवासीयांचे मुसळधार पावसापासून रक्षण केले होते. त्यामुळे हा दिवस केवळ धार्मिक नाही, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाराही आहे.
मानव आणि निसर्गाचे नाते: हा दिवस मानव आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते दर्शवतो.
प्रेमाचा आणि सहकार्याचा संदेश: नम्रता, स्नेह, प्रेम, आदर, सहयोग आणि पर्यावरण प्रेम हा या दिवसाचा खरा संदेश आहे. खरा देव तोच जो जीवांचे रक्षण करतो, भीती निर्माण करत नाही, ही शिकवण यातून मिळते.
श्रीकृष्ण आणि गोवर्धन पूजन: या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि जगतजननी स्वरूप असलेल्या गोवर्धन पर्वताचे पूजन केले जाते.
३. अन्नकूट
Ankut
Diwali Padwa 2025 Date;माता अन्नपूर्णेप्रती कृतज्ञता: संपूर्ण ब्रह्मांडाचे पालनपोषण करणाऱ्या माता अन्नपूर्णेच्या कृपेबद्दल कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे.
Diwali Padwa 2025 Date;विविध पक्वान्नांचा नैवेद्य: आजच्या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा करून तिला विविध प्रकारची मिष्ठाने, व्यंजने आणि खाद्यपदार्थांचा भव्य नैवेद्य दाखवला जातो.
पूजेचे मुहूर्त:
सकाळ:
६:०० ते ७:३० (लाभ)
७:३० ते ९:०० (अमृत)
०८:१५ ते १०:२९ (स्थिर लग्न)
१०:३० ते १२:०० (शुभ)
सायंकाळ:
४:३० ते ६:०० (लाभ)
६:०० ते ७:०० (गोधुली)
1. इतिहास आणि आख्यायिका
(History & Mythology)
Diwali Padwa 2025 Date; बळीराजा नावाचा एक अत्यंत दानशूर राजा होता, त्याच्या दारी येणाऱ्या अतिथीला तो जे मागेल ते दान देत असे. दान देणे हा सद्गुण असला तरी गुणांचा अतिरेक हा दोष ठरतो — कोणाला, केव्हा, काय द्यावे याचा विचार होणे आवश्यक आहे. भगवद्गीता आणि शास्त्रात सत्पात्राचा आणि अपात्राचा स्पष्ट उल्लेख आहे; सत्पात्राला द्यावे, अपात्राला दान देऊ नये, कारण अपात्र माणसाकडे संपत्ती गेली तर ते वाटेल तसं वागतात. बळीराजा कोणालाही, कधीही, जे मागेल ते देई, म्हणून श्री भगवान विष्णूंनी मुंजा मुलाचा म्हणजे वामनाचा अवतार घेतला. वामन हा विष्णूंचा पाचवा अवतार असून, तो भिक्षा मागणारा मुंजा मुलगाच होता.
“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”
वामनरूपी विष्णूंनी बळीराजाकडे जाऊन भिक्षा मागितली. बळीराजाने विचारले, ‘‘तुला काय हवे?’’ तेव्हा वामनाने ‘‘त्रिपाद भूमी’’ मागितली. वामन कोण आणि या दानाचा परिणाम काय, हे बळीराजाला माहित नव्हते; पण त्याने ती भूमी दिली. वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने पृथ्वी, दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले, आणि तिसऱ्या पावलासाठी विचारले.
बळीराजाने ‘‘तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा’’ म्हटले. वामनाने असे केल्यावर बळीराजाला पाताळात धाडले, आणि वर मागायला सांगितले. बळीराजाने ‘‘माझे राज्य पृथ्वीवर तीन दिवस तरी मानावे’’ असा वर मागितला. तेव्हा भगवान विष्णूंनी दीवाळीच्या तीन दिवशी — आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा — बळीराजाचे राज्य असेल, असा वर दिला.
या तिन्ही दिवस यमदीपदान केल्याने जिवावर आलेल्या अपमृत्यूचे संकट टळते, आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मीचा निवास होतो. बळीराजा असुर घराण्यातला असूनही त्याच्या पुण्याईने आणि भगवंताच्या कृपेने देवत्वाला पोचला. त्याने दानाचा, भक्तीचा, आणि जनसेवेचा आदर्श ठेवला. भगवंताने बळीराजाचे असुरत्व टाकून त्याला ईश्वरी कृपेने, ज्ञानाने आणि त्याग भावनेने देवत्वाकडे नेले; बळीराजाच्या राज्यात भोगमय विचार, असुर वृत्ती नाहीशी झाली आणि जनतेला सुख, समृद्धी आणि दैवी विचार मिळाले.
नव्या वर्षाची आरंभ व वहीपूजन
(New Year & Ledgers Worship)
पाडवा म्हणजे व्यापारी वर्गासाठी विक्रम संवत्सराची आणि नव्या वर्षाची सुरूवात. याच दिवशी वहीपूजन (ledger book worship) आणि दुकानाची विधीपूर्वक पूजा करून मोठ्या उत्साहात नवीन पर्वाची सुरुवात केली जाते. वहीपूजन मुहूर्त (2 नोव्हेंबर 2024): पहाटे 4.10 ते 6.40, सकाळी 8 ते 10.50 — व्यापाऱ्यांसाठी सर्वात लाभदायक मानला जातो.
3. आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व
(Spiritual & Social Significance)
बलीराजाच्या दानशीलतेमधून व्यक्तीने सत्पात्रि दान आणि विवेकशील निर्णय घेण्याचा विचार शिकावा. भगवंताने बलीराजाला दिलेल्या आशीर्वादानुसार दिवाळीचे तीन दिवस (चतुर्दशी, अमावस्या, प्रतिपदा) यमदीपदान, लक्ष्मी निवास, अपमृत्यू टळणे आणि भक्तिचा वर मिळतो. ही कथा दानशीलता, ईश्वरी कृपा आणि ज्ञानाच्या आधारे जीवन उत्कर्षाची प्रेरणा देते.
4. कौटुंबिक परंपरा — पती-पत्नी औक्षण
(Rituals: Husband-Wife Bond)
पाडव्याचा दिवस प्रेम, आदर आणि नात्यांच्या मजबुतीसाठी ओळखला जातो. स्त्रिया अभ्यंगस्नानानंतर पतीला औक्षण करतात, पती बायकोला भेटवस्तू देतो — कौटुंबिक सौख्य, प्रेम, आणि स्मरणाचा अनोखा संस्कारआई आपल्या मुलाला देखील या दिवशी तसेच, वहिनी ही दिराला औक्षवंत करते, किंवा लहान वहिनी ही आपल्या मोठ्या दिराला औक्षवंत करते.

![]()








