Voter List Update Marathi 2025; संपूर्ण उत्तर एका क्लिकमध्ये मिळवा!
Voter List Update Marathi 2025; देशभर SIR प्रक्रिया सुरू! आता प्रत्येक मतदाराची ओळख, पत्ता आणि नागरिकत्व होणार पुन्हा पडताळणी. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादी सुधारणा मोहीम सुरू केली आहे.Special Intensive Revision (SIR) नावाची ही मतदार यादी सुधारणा मोही आता बिहारनंतर या प्रक्रियेचा विस्तार सर्व राज्यांत होणार आहे.
वर्तमानपत्रानुसार, आयोगाने सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. 28 ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
पहिल्या टप्प्यात असम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एसआयआरची अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढील वर्षी येथे विधानसभा निवडणुका होणार असल्याने आयोगाने या राज्यांना प्राधान्य दिले आहे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही निकट भविष्यात ही प्रक्रिया राबवली जाईल.
“नवे बँकिंग नियम, आता एका खात्याला चार नॉमिनी ठेवण्याची सुविधा जाणून घ्या,संपूर्ण माहिती”
SIR म्हणजे काय?
what is SIR?
हा एक घर-दारी सत्यापन कार्यक्रम आहे जो भारतीय घटनेच्या कलम 324 आणि प्रातिनिधिक जनता अधिनियम 1950 अंतर्गत चालवला जातो. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराची ओळख, पत्ता आणि नागरिकत्व पुन्हा तपासले जाते.
Voter List Update Marathi 2025; बिहारमध्ये शेवटची SIR 2003 मध्ये झाली होती, त्यामुळे आता 22 वर्षांनी ही व्यापक पडताळणी करणे आवश्यक ठरले आहे. या दरम्यान स्थलांतर, जन्म-मृत्यू आणि डुप्लिकेट नोंदी यामुळे मतदार यादीत अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत.
कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना
SIR उद्दिष्टे काय?
SIR purpose
सध्या देशभरात निवडणूक आयोग SIR म्हणजेच मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन राबवत आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक नागरिकाची मतदार नोंदणी पुन्हा पडताळली जाईल, त्यामुळे मतदार यादीतील अचूकता वाढवणे, डुप्लिकेट व फसव्या नोंदी हटवणे, नवे पात्र मतदार सामावून घेणे आणि मृत अथवा अवैध नागरिकांची सदस्यता रद्द करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
या मोहीमेअंतर्गत नागरिकांना स्वत:च्या ओळखीची व भारतीय नागरिकत्वाची पुष्टी करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यात आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड तसेच निवास पुरावा व 2003 च्या मतदार यादीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टाच्या सूचनांनुसार स्वीकारले जाणार आहेत.
या व्यापक पडताळणी प्रक्रियेत स्थलांतरित मजूर, गरीब आणि आदिवासी समाजांना कागदपत्रांची मिळवणी करताना अडचणी येऊ शकतात. देशातील सुमारे 15 कोटी स्थलांतरित मतदार या नाविन्यपूर्ण पडताळणीमुळे त्यांच्या मूळ निवासस्थानी मतदान करत राहतील याकडे आयोग लक्ष ठेवतो आहे.
निवडणूक आयोगाच्या या धोरणामुळे “एक व्यक्ती, एक मत” या तत्त्वाची अंमलबजावणी अधिक मजबूत होईल आणि भारतीय लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
Important documents for SIR
Voter List Update Marathi 2025; नागरिकांना स्वतःची ओळख आणि भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. आधार कार्ड आता ओळखपुरावा म्हणून मान्य आहे, मात्र ते नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वापरात येणार नाही. खालील कागदपत्रे या प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जातील.
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड
- रेशन कार्ड, रहिवासी दाखला
- वीज/पाणी/गॅस बिल
- बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड
- 2002 च्या मतदार यादीची प्रत
Voter List Update Marathi 2025; नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मात्र जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, किंवा पालकांचे नाव 2002 च्या मतदार यादीत असल्याचा पुरावा आवश्यक असेल.
Note: मुख्य माहिती व तपशील सर्व राज्यांसाठी Election Commission of India च्या https://eci.gov.in शकता ही माहिती आपल्याला इतरांना देखील शेअर करू शकता.
![]()








