Aadhaar card new rules November 2025: नेमके कोणते बदल झाले आहेत
Aadhaar card new rules November 2025: भारतातील आधार कार्डधारकांसाठी UIDAI ने 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणारे मोठे बदल जाहीर केले आहेत. डिजिटल युगातील या नव्या सुधारणा, वाढलेली शुल्क रचना, आणि मजबूत नियमावलीमुळे आधार कार्ड संबंधित सेवा नागरिकांसाठी अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. आता नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग किंवा मोबाइल नंबरसारख्या तपशीलांचे अपडेट प्रगतीशील डिजिटल पद्धतीने घरी बसून करता येणार आहेत.
UIDAI च्या या निर्णयामुळे देशातील प्रत्येक नागरिकावर प्रत्यक्ष परिणाम होणार असून, आधार सेवांचा दर्जा आणि विश्वासार्हता दोन्ही वाढणार आहेत. चला तर मग आज आपण या लेखांमध्ये या संदर्भात त थोडक्यात महत्वपूर्ण माहिती पाहूया.
Aadhaar card new rules November 2025:आता आधार तपशील पूर्णपणे ऑनलाइन (Online) अपडेट करता येतील – नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, आणि मोबाइल नंबरसह सर्व माहिती घरी बसून बदलता येईल.
नवीन प्रणालीमध्ये सरकारी डेटाबेसद्वारे स्वयंचलित पडताळणी (Auto Verification) केली जाईल; दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
UIDAI चे 1 नोव्हेंबर 2025 पासूनचे बदल
UIDAI मध्ये झालेले नवीन बदल डिजिटल अपडेट प्रणाली कशी यासंदर्भात आधारात आधी फीस काय होती आता फीस किती द्यावी लागणार आहे. या संदर्भातील थोडक्यात संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
मतदानासंबंधीत SIR म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती
डिजिटल अपडेट प्रणाली सुरू
(Digital Update System Launch)
1 नोव्हेंबरपासून नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर घरी बसून, पूर्णपणे ऑनलाइन अपडेट करता येईल. OTP व सरकारी डेटाबेसद्वारे स्वयंचलित पडताळणी होईल. दस्तऐवज अपलोड करण्याची किंवा मॅन्युअल तपासणीची आवश्यकता नाही.
“नवे बँकिंग नियम, आता एका खात्याला चार नॉमिनी ठेवण्याची सुविधा जाणून घ्या,संपूर्ण माहिती”
फी बदल
(Fee Change)
Aadhaar card new rules November 2025: आधार तपशील अपडेट करण्यासाठी शुल्क वाढवले गेले—हेही 1 नोव्हेंबरपासून लागू. नाव/पत्ता/जन्मतारीख/मोबाइलसाठी 75 रुपये, बायोमेट्रिकसाठी 125 रुपये आकारले जातील.
मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत
(Free Biometric Update for Children)
7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फिंगरप्रिंट व आयरिस अपडेट मोफत राहतील.
कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना
नवीन दस्तऐवज यादी आणि कडक नियम
(New Document List & Strict Rules)
सभ्य व स्पष्ट कागदपत्रांची यादी लागू; एक व्यक्ती फक्त एका आधार क्रमांकासाठी पात्र, डुप्लिकेट आढळ्यास कारवाई.
फ्री ऑनलाइन अपडेट सेवा संपली
(Free Online Update Facility Ended)
14 जून 2025 नंतर मोफत अपडेटींग सुविधा उपलब्ध नाही; आता प्रत्येक बदलासाठी शुल्क आकारले जाईल.
ग्रामीण व लहान शहरांसाठी सोय
(Convenience for Rural & Small Towns)
मायआधार पोर्टल/ UIDAI अॅपवरून सर्व डिजिटल अपडेट OTP पडताळणीने करता येतील. बायोमेट्रिक अपडेटसाठी मात्र केंद्रावर भेट आवश्यक.
![]()








