Zoho Success Story Marathi:सध्या ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गुगल’ ला जोरदार टक्कर देणारी भारतीय कंपनी तुम्हाला माहिती आहे का?

Zoho Success Story Marathi: जाणून घ्या श्रीधर वेम्बू यांना

Zoho Success Story Marathi: भारतीय तंत्रज्ञान विश्वात ‘Zoho Corporation’ हे नाव सध्या झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. अमेरिकन दिग्गज कंपन्यांना टक्कर देणारे भारतीय डिजिटल सोल्यूशन्स ‘Zoho Mail’, ‘Arattai’ मेसेंजर आणि आता ‘Zoho Pay’ चे येणारे नवे वारे,भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राला नवीन आयाम देत आहेत. काही दिवसांपूर्वीच देशाचे संरक्षण मंत्री यांनी Zoho कंपनीच्या उत्कर्षाचे कौतुक केले, तसेच या कंपनीचे सर्वेसर्वा श्रीधर वेम्बू यांच्या नेतृत्वाने भारतीय स्टार्टअप्सला जागतिक स्तरावर नवा विश्वास दिला आहे.

या लेखात आपण Zoho Corporation आणि श्रीधर वेम्बू यांच्या प्रेरणादायी यशोगाथेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

Zoho म्हणजे काय?

(What is Zoho )

Zoho Success Story Marathi: ही एक भारतीय मल्टीनॅशनल तंत्रज्ञान कंपनी आहे, जी वेब-आधारित सॉफ्टवेअर, बिझनेस टूल्स आणि IT सेवा पुरवते. Zoho Mail, CRM, Arattai App, तसेच विविध कंपन्यांसाठी क्लाऊड आधारित सिस्टम्स Zoho द्वारे विकसित केली जातात. ‘Zoho’ चे उद्दिष्ट म्हणजे जगभरातील व्यवसायांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि स्वदेशी डिजिटल सेवा पुरवणे. सध्याच्या काळात Zoho कंपनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत जगातील टेक मार्केटमध्ये आपले स्थान बळकट करत आहे.

पैसा स्थिर ठेवण्याकरिता आणि घरात बरकत आणण्यासाठीचे उपाय

प्रमुख उत्पादने

(Main Products)

Zoho Success Story Marathi: खालीप्रमाणे Zohoची प्रमुख उत्पादने

  • Zoho Mail – Secure Email Service
  • Arattai App – Secure Indian Messaging App
  • Zoho CRM – Customer Relationship Management
  • Zoho Suite – Cloud-Based Business Tools

1 नोव्हेंबरपासून! तुमच्या आधारमध्ये ‘हे’ नवे बदल

स्वदेशी तंत्रज्ञान आणि उद्देश

(Indigenous Technology & Vision)
Zoho च्या सर्व उत्पादने व सेवा भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहेत, ज्याचा उद्दिष्ट व्यवसायांना सुरक्षित व सर्वसमावेशक डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे हे आहे.

UPI App – Zoho Pay
‘Zoho Pay’ नावाचे UPI आधारित भुगतान ॲप लवकरच येणार आहे, जे Google Pay, PhonePe सारख्या ॲप्सना स्पर्धा देईल.

  • Zoho Pay Features
  • UPI, Card & Net Banking Integration

संस्थापक – श्रीधर वेम्बू

(Founder – Sridhar Vembu)


Zoho Corporationचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी अमेरिकेतली मोठी नोकरी सोडून भारतीय ग्रामीण भागातून कंपनी चालवण्याचा आदर्श घालून दिला.

 जीवनशैली :अब्जाधीश असूनही ते आजही सायकल चालवतात आणि अत्यंत साधे जीवन जगतात. त्यांनी अमेरिकेतील आयटी इंजिनीअरची मोठी नोकरी सोडली.

Zoho Success Story Marathi: ग्रामीण भागातून कंपनी चालवण्याचे (Rural Offices) एक मोठे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. शहरातून गावात येऊन त्यांनी आपले ऑफिस सुरू केले, ज्यामुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या.

श्रीधर वेम्बू हे सिद्ध करतात की माणूस श्रीमंत झाल्यावरही जमिनीशी जोडलेला राहू शकतो आणि ग्रामीण भागातही जागतिक दर्जाची कंपनी उभी करू शकतो.

Zoho कंपनी आणि श्रीधर वेम्बू यांच्या स्वदेशी आणि ग्रामीण विकास मॉडेलचे कौतुक केवळ सामान्य नागरिकांनीच नव्हे, तर सरकारच्या उच्च स्तरावरूनही करण्यात आले आहे.

 देशाचे संरक्षण मंत्री (Defence Minister) यांनी श्रीधर वेम्बू यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

Zoho Success Story Marathi:  ग्रामीण भागातून व्यवसाय उभा करण्याच्या आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला (Indigenous Technology) प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सरकारनेही पाठिंबा दिला आहे.ही प्रशंसा देशातील ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिली जाते.

कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना

Zoho च्या माध्यमातून श्रीधर वेम्बू यांनी केवळ एक मोठी कंपनीच उभी केली नाही, तर एक नवा आदर्श उभा केला आहे की, उच्च तंत्रज्ञानाचे केंद्र शहराबाहेर, देशाच्या ग्रामीण भागातही असू शकते.

Zoho कंपनीकडून जाहिरात (Ad) दाखवली जात नाही—ते जाहिरातविरहित मॉडेल चालवतात आणि युजर डेटा कधीच तिसऱ्या पक्षाला विकत नाहीत. त्यामुळे Zoho कंपनीचा कोणताही प्रोडक्ट वापरताना जाहिरात किंवा डेटा-विक्रीसंबंधी चिंता नाही.

Zoho ने ‘Arattai’ messaging app विकसित केले आहे, जी भारतीय WhatsApp प्रतिस्पर्धी ठरते. हे ॲप भारतात लोकप्रिय होत असून सेफ, भारतीय बनावटीचे, आणि कमी नेटवर्क/साध्या फोनवरही उत्तम चालते—यामुळे WhatsApp ला जोरदार टक्कर देते.

Zoho Success Story Marathi: अश्विनी वैष्णव (केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री) यांनी Zoho च्या ऑफिस टूल्स (Zoho Docs, Show, इ.) वापरण्याचा आणि स्वदेशी प्लॅटफॉर्मवर जाण्याचा संदेश दिला आहे.


धर्मेंद्र प्रधान(केंद्रीय शिक्षण मंत्री) यांनी Arattai ॲप वापरण्यास प्रोत्साहित केलं आहे, “Made in India, Secure, Free & Swadeshi” अशी जाहिरपणे शिफारस दिली आहे.

Zoho कंपनीची सुरुवात श्रीधर वेम्बू यांनी त्यांच्या भावासोबत एक छोट्या अपार्टमेंटमध्ये केला होती. सुरुवातीला घरातील साध्या सुविधांमधूनच हे स्टार्टअप उभे राहिले आणि आज ते जागतिक टेक कंपनी बनले आहे. आपल्यालाही माहिती योग्य वाटल्यास आपण इतरांना देखील शेअर करू शकता.

मतदानासंबंधीत SIR म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Loading