Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi:’हरिहर योग’,कशामुळे वैकुंठ चतुर्दशीला विष्णू व शिवाची पूजा एकत्र होते?
Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi:नमस्कार, प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात. देवउठनी एकादशीच्या त्यानंतर दोन दिवसांनी येणारी कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी (Vaikuntha Chaturdashi) मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.
या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची हरिहर भेट (Harirar Bhet) होते, हा प्रसंग अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योग मानला जातो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू-शिवाची एकत्रित पूजा केल्याने आणि व्रत केल्याने भक्ताला थेट वैकुंठ धामाची प्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
वैकुंठ चतुर्दशी २०२५ ची तारीख
Vaikuntha Chaturdashi 2025 Date
यंदा, २०२५ साली वैकुंठ चतुर्दशी मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल.
वैकुंठ चतुर्दशी २०२५, मंगळवार, ४ नोव्हेंबर
चतुर्दशी तिथी प्रारंभ ४ नोव्हेंबर २०२५, पहाटे ०२:०५ वाजता
चतुर्दशी तिथी समाप्ती ४ नोव्हेंबर २०२५, रात्री १०:३६ वाजता
निशीथ काळ (विष्णू पूजेचा शुभ मुहूर्त) ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ११:५८ ते ५ नोव्हेंबरच्या पहाटे १२:४९ पर्यंत
वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि हरिहर भेट
Tradition of Midnight Vishnu Puja and Morning Shiva Puja
Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi: वैकुंठ चतुर्दशी म्हणजे विष्णू-शिव भेटीचा अलौकिक दिवसचातुर्मासाचे (चार महिने – आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन) काळात विश्वाचा कारभार भगवान श्री शंकर यांच्याकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री शंकर हे भगवान श्री विष्णू यांच्याकडे विश्वाचा कारभार पुन्हा सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. याच दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेट होते, म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो.
सध्या ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गुगल’ ला जोरदार टक्कर देणारी भारतीय कंपनी तुम्हाला माहिती आहे का?
या दिवशी श्री विष्णूची मध्यरात्री (निशीथ काळात) आणि भगवान शंकराची सकाळच्या ब्रह्म मुहूर्तावर पूजा करण्याची परंपरा आहे.
अनेक ठिकाणी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना बेलप्रत्र आणि
भगवान शिव शंकरा तुळस अर्पण करतात .
वैकुंठ चतुर्दशीची पौराणिक कथा
Mythological Story of Vaikuntha Chaturdashi
Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi: वैकुंठ चतुर्दशी म्हणजे विष्णू-शिव भेटीचा अलौकिक दिवसएका पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान श्री विष्णू यांनी काशी येथे महादेवाची पूजा करण्याचा संकल्प केला. त्यांनी १०८ कमळ फुले शिवलिंगाला अर्पण करण्याचा निश्चय केला. भगवान शंकराने त्यांची भक्ती तपासण्यासाठी त्या कमळातून एक कमळ कमी केले.
Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi: एक कमळ कमी पडत असल्याचे पाहून श्री विष्णूंनी विचार केला की, लोक मला ‘कमलनयन’ किंवा ‘पुंडरीकाक्ष’ (कमळासारखे डोळे असलेला) म्हणतात. मग, त्यांनी पूजा पूर्ण करण्यासाठी आपला कमळासारखा एक डोळा काढून शिवलिंगावर अर्पण करण्याची तयारी केली.
कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना
Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi: वैकुंठ चतुर्दशी म्हणजे विष्णू-शिव भेटीचा अलौकिक दिवसभगवान विष्णूंची ही अगाध भक्ती पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. ते तत्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना थांबवले. त्यांनी विष्णूंना वर दिला की, कार्तिक शुक्ल चतुर्दशी हा दिवस यापुढे ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळखला जाईल.
जो कोणी या दिवशी हे व्रत करेल आणि प्रथम विष्णूची व नंतर शिवाची पूजा करेल, त्याला जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळेल आणि थेट वैकुंठ धामाची प्राप्ती होईल. त्याच दिवशी शिवाने विष्णूंना सुदर्शन चक्र (Sudarshan Chakra) देखील प्रदान केले.
पैसा स्थिर ठेवण्याकरिता आणि घरात बरकत आणण्यासाठीचे उपाय
वैकुंठ चतुर्दशी पूजा विधी
या दिवशी हरिहर भेटीमुळे पूजेत एक आगळेवेगळे महत्त्व असते.
१. भगवान श्री विष्णूची पूजा (मध्यरात्री – निशीथ काळ)
Worship of Lord Vishnu (Midnight)
- पहाटे स्नान करून स्वच्छ पिवळी वस्त्रे परिधान करावी.
- लागडी आसनावर पिवळा कापड पसरवून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे.
- कमळ फुले, चंदन, केशर, दूध, दही, साखर, मध आणि गोड नैवेद्य अर्पण करावा.
- या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र (बेल) अर्पण केले जाते, जे इतर वेळी शंकराला वाहतात.
- ‘विष्णू सहस्रनाम’ किंवा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा.
- माखणा खीरचा नैवेद्य अर्पण करावा.
२. भगवान श्री शंकराची पूजा (सकाळ/ब्रह्म मुहूर्त)
Worship of Lord Shiva (Morning/Brahma Muhurat)
- दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिवाची पूजा करावी.
- शिवलिंगावर गायीचे दूध, दही आणि मधाचा अभिषेक करावा.
- बिल्वपत्र, धतुरा, भांग, फळे आणि मिठाई अर्पण करावी.
- या दिवशी भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण केली जातात, जी इतर वेळी विष्णूला वाहतात. (हरिहर भेटीचे प्रतीक म्हणून हे केले जाते).
- ‘रुद्राष्टकम’, ‘शिवमहिम्ना स्तोत्र’ किंवा ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा.
वैकुंठ चतुर्दशी व्रताचे फल
Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi: वैकुंठ चतुर्दशी म्हणजे विष्णू-शिव भेटीचा अलौकिक दिवसया पवित्र दिवशी विष्णू आणि शिव या दोन्ही देवांची एकत्रित पूजा केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात. घरात सुख-शांती येते, दुःख-दारिद्र्य दूर होते आणि मनुष्याला त्याच्या जीवनातच वैकुंठ प्राप्तीचा आनंद मिळतो, असे मानले जाते. या व्रतामुळे आरोग्य चांगले राहते आणि मृत्युनंतर मोक्ष प्राप्त होतो.
Vaikuntha Chaturdashi 2025 Marathi: काशीमध्ये वैकुंठ चतुर्दशीला काशी विश्वनाथ स्थापना दिवस म्हणून देखील साजरे केले जाते, जिथे भगवान विष्णूंना काशी विश्वनाथ मंदिरात विशेष स्थान दिले जाते.
![]()








