PAN-Aadhaar link deadline Marathi: पॅन‑आधार लिंक करण्याची शेवटची तारीख, प्रक्रिया आणि निष्क्रिय पॅन कार्डचे परिणाम जाणून घ्या
PAN-Aadhaar link deadline Marathi: नमस्कार वाचकहो,तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक केले आहे का?
जर अजून केले नसेल, तर आता शेवटची संधी समजून घ्या. सरकारने ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. यानंतर, म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून लिंक न केलेले पॅन कार्ड (PAN-Aadhaar link deadline) ‘निष्क्रिय’ (Deactivate) होईल. याचा अर्थ तुमचे बँक व्यवहार, गुंतवणूक, कर्ज, आयटीआर भरणे आणि इतर महत्त्वाच्या वित्तीय सेवा करताना मोठा अडथळा येऊ शकतो.
म्हणून, वेळ न दवडता आजच ही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करा. चला, या लेखात आपण जाणून घेऊ – पॅन-आधार लिंकिंगची सहज प्रक्रिया, परिणाम आणि आवश्यक सूचना
आता शेतकऱ्यांच्या शेताला मिळेल २५ वर्षे मोफत वीज! जाणून घ्या “सौर कृषी वाहिनी”
पॅन-आधार लिंकिंग का आवश्यक आहे?
Why is PAN-Aadhaar linking necessary?
- PAN-Aadhaar link deadline Marathi: सरकारच्या नियमानुसार, सर्व पॅन कार्डधारकांनी त्यांचे पॅन आणि आधार कार्ड ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी लिंक करणे बंधनकारक आहे.
- ही जोडणी न केल्यास, १ जानेवारी २०२६ पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल — याचा थेट परिणाम सर्व आर्थिक व्यवहारांवर होतो.
- निष्क्रिय पॅनमुळे बँक ट्रांजेक्शन, गुंतवणूक, कर्ज, शेअर बाजारातील व्यवहार, आणि इतर वित्तीय फायदे वापरताना अडचण निर्माण होते.
पॅन-आधार लिंकिंगची प्रक्रिया
(How to Link PAN-Aadhaar – Steps)
- प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलींग पोर्टलवर जा.
- “Link Aadhaar” या पर्यायावर क्लिक करा.
- पॅन व आधार क्रमांक अचूक भरा.
- रु. १,०००/- शुल्क ऑनलाइन भरा.
- प्रक्रिया पूर्ण करा आणि SMS/E-mail द्वारा पुष्टी मिळवा.
ऐकलं का? आता आधार केंद्र बंद—या महिन्यात घरबसल्या करा सगळी महत्त्वाची अपडेट्स!
महत्वाच्या सूचना:
PAN-Aadhaar link deadline Marathi: प्रत्येक आर्थिक व्यवहारात पॅन कार्ड अनिवार्य आहे.
शेवटच्या तारखेच्या आधी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक.
“अधिक माहितीसाठी” पॅन-आधार लिंकिंग, प्रक्रिया व अधिकृत मार्गदर्शनासाठी तुम्ही खालील सरकारी ई-फायलींग (e-filing) पोर्टल/वेबसाईट वापरू शकता
https://www.incometax.gov.in/iec/foportal/help/e-filing-link-aadhaar-faq किंवा
आता ट्रेनमधील खालची बर्थ कोणाची? आणि ‘झोपण्याचा हक्क’ किती? रेल्वेने नियम केले पक्के,
पॅन-आधार लिंकिंग संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१. पॅन-आधार लिंक कशासाठी करावे लागते?
सरकारने सर्व पॅन कार्डधारकांना त्यांच्या पॅन आणि आधार नंबरची लिंकिंग बंधनकारक केली आहे — आर्थिक व्यवहार सुरक्षित, पारदर्शक आणि प्रमाणित करण्यासाठी.
२. पॅन-आधार लिंक न केल्यास काय होईल?
PAN-Aadhaar link deadline Marathi: १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे बँक व्यवहार, कर्ज, गुंतवणूक, ITR भरणे अशा सर्व आर्थिक कामांमध्ये अडचण येईल.
३. लिंक करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
PAN-Aadhaar link deadline Marathi: ३१ डिसेंबर २०२५.
४. पॅन-आधार लिंक करण्यासाठी शुल्क किती आहे?
रु. १,०००/- (एक हजार रुपये) ऑनलाइन भरावे लागते.
५. पॅन-आधार लिंक प्रक्रिया ऑनलाइन कशी करावी?
प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलींग पोर्टलवर जा → “Link Aadhaar” क्लिक करा → पॅन व आधार क्रमांक भरा → शुल्क भरा → प्रक्रिया पूर्ण करा.
६. लिंकिंगची पुष्टी कशी मिळेल?
प्रक्रिया पूर्ण केल्यावर SMS/E-mail द्वारे लिंकिंगची पुष्टी प्राप्त होईल.
७. माझे पॅन निष्क्रिय झाले तर पुन्हा सक्रिय करता येईल का?
होय, लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करून आणि आवश्यक फी भरून पुढे प्रक्रिया केली जाऊ शकते.
८. कुठे/कुठल्या वेबसाइटवर लिंक करावे?
प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत ई-फायलींग पोर्टलवर (incometax.gov.in).
९. आधारपाशी नोंदणी केलेली माहिती आणि पॅनवर नोंदणीची माहिती वेगळी असल्यास?
दोन्हीमध्ये माहिती जुळणे आवश्यक आहे; त्रुटी असल्यास आधी update करावे, नंतर लिंक प्रक्रिया करा.
१०. पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन)ही लिंकिंग शक्य आहे का?
हो, तुम्ही NSDL किंवा UTIITSL केंद्रांमधूनही ही प्रक्रिया करू शकता.
जाणून घेऊया महाराजांच्या जयंतीनिमित्त दहा गडांची माहिती
“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”
![]()








