HSRP Number Plate Deadline Maharashtra:“
HSRP Number Plate Deadline Maharashtra: जाणून घ्या,ऑनलाईन अर्ज सोप्या पद्धतीने
HSRP Number Plate Deadline Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकारने आता सर्व वाहनांसाठी High Security Registration Plate (HSRP) अनिवार्य केली आहे. जर तुमचं वाहन १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेलं असेल आणि अजून HSRP नंबर प्लेट लावली नसेल, तर ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख आहे. या मुदतीनंतर आपल्या गाडीवर HSRP नसल्यास किमान ₹१,००० (किंवा त्याहून अधिक) दंड भरावा लागू शकतो.
आरटीओ (RTO)तपासणी दरम्यान आपल्याकडे डीलरकडून मिळालेली अपॉइंटमेंट receipt असेल, तर तुम्ही तात्पुरता दंड टाळू शकता. त्यामुळे वेळ न दवडता आजच HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करा.चला तर मग आज या लेखांमध्ये या संदर्भातील सर्व माहिती पाहून.
आता शेतकऱ्यांच्या शेताला मिळेल २५ वर्षे मोफत वीज! जाणून घ्या “सौर कृषी वाहिनी”
HSRP प्लेट म्हणजे काय? आणि का आहे अनिवार्य?
(What and Why HSRP?)
HSRP (High Security Registration Plate) म्हणजे उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट. ही केवळ एक साधी नंबर प्लेट नाही, तर त्यात अनेक सुरक्षा फीचर्स आहेत खालील प्रमाणे आहेत.
- जसे की,प्लेटच्या डाव्या बाजूला अशोक चक्राचा होलोग्राम असतो, जो बनावट प्लेट ओळखण्यास मदत करतो.
- HSRP Number Plate Deadline Maharashtra: प्लेटवर एक कायमस्वरूपी, लेझरने कोरलेला ओळख क्रमांक (Laser-Etched Number)असतो, जो वाहनाच्या चेसिस नंबरशी जुळतो.
- टॅम्पर-प्रूफ डिझाइन (Tamper-Proof Design): यामध्ये वापरले जाणारे स्नॅप-लॉक फिटिंग (Snap-Lock Fitting) आणि विशेष बोल्ट्स एकदा लावल्यावर काढता येत नाहीत, ज्यामुळे चोरी झाल्यावर किंवा प्लेट बदलण्याचा प्रयत्न झाल्यास ते शक्य होत नाही.
- एकरूपता (Uniformity): सर्व वाहनांचा डेटा एका राष्ट्रीय डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवला जातो.थोडक्यात, तुमच्या वाहनाची चोरी आणि गैरवापर रोखण्यासाठी HSRP अनिवार्य आणि महत्वपूर्ण आहे.
ऐकलं का? आता आधार केंद्र बंद—या महिन्यात घरबसल्या करा सगळी महत्त्वाची अपडेट्स!
कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना
तुमच्या वाहनासाठी HSRP बुकिंग कसे कराल?
(Step-by-Step HSRP Booking Guide)
HSRP प्लेट मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) मध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करू शकता.
सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या, https://mhhsrp.com/ किंवा https://bookmyhsrp.com/
तुम्ही तुमच्या वाहन उत्पादकाच्या (OEM) अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता, किंवा महाराष्ट्र सरकारसाठी अनेक अधिकृत विक्रेत्यांच्या पोर्टलचा वापर करू शकता. उदा. https://mhhsrp.com/ किंवा https://bookmyhsrp.com/
बुकिंग निवडा: “High Security Registration Plate with Colour Sticker” हा पर्याय निवडा.
माहिती भरा: तुमचे राज्य (महाराष्ट्र), RTO कार्यालय, आणि वाहनाची माहिती (Registration Number, Engine Number, Chassis Number) अचूक भरा.
HSRP Number Plate Deadline Maharashtra: डीलर किंवा होम फिटमेंट निवडा: तुम्ही HSRP प्लेट डीलरशीपवर (जवळच्या ठिकाणी) बसवून घेऊ शकता, किंवा अतिरिक्त शुल्क भरून घरी बसवून घेण्याचा पर्याय निवडू शकता.
शुल्क भरा: ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे आवश्यक शुल्क भरा.
तारखेची निवड करा: तुम्हाला प्लेट बसवून घेण्यासाठी सोयीस्कर तारीख आणि वेळ निवडा.
प्लेट बसवा: निवडलेल्या तारखेला, त्या ठिकाणी जाऊन प्लेट बसवून घ्या आणि दंड टाळा.
जुनी वाहने:
ज्यांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी वाहन खरेदी केले आहे, त्यांनी तातडीने HSRP साठी अर्ज करावा.
नवीन वाहने:
१ एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांमध्ये डीलरकडून आधीच HSRP बसवलेली असते, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
तुमच्या सोसायटी/ऑफिससाठी खास सोय, ‘बल्क बुकिंग’ (Bulk Booking) करा आणि घरीच प्लेट बसवा!
सामान्य नागरिकांसाठी HSRP प्लेट बसवण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी, परिवहन विभागाने ‘बल्क बुकिंग’ची सुविधा दिली आहे. जर तुमच्या सोसायटीत किंवा ऑफिसमध्ये २५ किंवा त्याहून अधिक वाहने असतील ज्यांना HSRP प्लेट्स लावायच्या आहेत, तर तुम्ही एकत्रित बुकिंग (Group Booking) करू शकता.
HSRP Number Plate Deadline Maharashtra: याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, प्लेट बसवणाऱ्या कंपनीचे तंत्रज्ञ तुमच्या सोसायटीत किंवा ऑफिसमध्ये येऊन प्लेट्स बसवून देतील. यामुळे तुम्हाला बाहेर जाण्याचा, वेळ घालवण्याचा आणि ‘होम फिटमेंट’चे अतिरिक्त शुल्क (Extra Charges for Home Installation) भरण्याचा त्रास वाचेल. तुमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी लगेच संपर्क साधावा. इतरांना देखील शेअर करा
जाणून घेऊया महाराजांच्या दहा गडांची माहिती
“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”
![]()








