Girija Oak National Crush Marathi:“ही तर आपली मराठी! गिरीजा ओक जी सध्या ‘’National Crush” म्हणून देशभरात ओळखली जात आहे.”

Girija Oak National Crush Marathi: जाणून घेऊया,आजची नॅशनल क्रश, Blue Saree वाली…”

Girija Oak National Crush Marathi: कोण आहे ही अभिनेत्री आणि सोशल मीडियावर तिची इतकी चर्चा का?
जिला आज देशभरातील चाहते ‘नॅशनल क्रश’ म्हणतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गेली जवळपास दोन दशके आपल्या अभिनयाने छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले (Girija Oak ) सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांच्या निळ्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Girija Oak National Crush Marathi: अनेक युजर्स त्यांना ‘भारताची सिडनी स्वीनी’ (Hollywood heartthrob Sydney Sweeney) म्हणत आहेत, तर काही जण त्यांची तुलना मॉनिका बेलुचीच्या (Monica Bellucci) शाश्वत सौंदर्याशी करत आहेत.
या अचानक आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमुळे, अनेकांना या प्रतिभावान अभिनेत्रीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


“तू निरागस चंद्रमा…” हे अजरामर गाणं आठवतं का? जशी त्या गाण्यातील निरागसता आणि गोजिरी भावना आपल्या मनात घर करते, तशीच काहीशी अनुभूती आजच्या मराठी प्रेक्षकांना गिरीजा ओक गोडबोलेमुळे मिळते.

Girija Oak National Crush Marathi: साधेपणाच्या, सहज हास्याच्या आणि अभिनयाच्या नव्या व्याख्या ठरवत, गिरीजा आज ‘नॅशनल क्रश’ म्हणून सोशल मीडियावर झळकत आहे. तिच्या ब्लू साडीतील लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे आणि अस्सल मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात तिने खास स्थान मिळवलं आहे.


नॅशनल क्रश म्हणजे काय?

What is National Crush?


‘नॅशनल क्रश’ हा शब्द सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे, लोकप्रियतेमुळे किंवा सहज आकर्षणामुळे ती रातोरात देशभराच्या चर्चेचा विषय ठरली की दिला जातो. अलिया भट्ट, रश्मिका मंदाना, प्रिया प्रकाश वारियर यांच्यासारख्या अभिनेत्रींच्या नावांशीही हा शब्द पूर्वी जोडला गेला आहे. सध्या गिरीजा ओकच्या साध्या आणि आत्मीय लूकमुळे ती भारताच्या ‘नॅशनल क्रश’ म्हणून व्हायरल झाली आहे.


 AIच्या जगात पाऊल टाका — जाणून घ्या सोपी सुरुवात आणि घडवा तुमचं भविष्य!


गिरीजा ओक यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती

all information about Girija Oak

विभागमाहिती
जन्म आणि मूळ२७ डिसेंबर १९८७ रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे जन्म.
कुटुंबत्या veteran मराठी अभिनेते गिरीश ओक आणि गृहिणी पद्मश्री फाटक यांच्या कन्या आहेत. त्यांचे लग्न चित्रपट निर्माते सुहृद गोडबोले यांच्याशी झाले आहे.
शिक्षणत्यांनी मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नॉलॉजी मध्ये पदवी (Degree) मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचा (Business Management) अभ्यास केला आणि अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी थिएटर कार्यशाळांमध्ये (Theatre Workshops) भाग घेतला.
अभिनय क्षेत्रातील प्रवासगिरीजा ओक यांनी मराठीसोबतच हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

मराठी आणि प्रादेशिक काम

ती मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही ‒ गिरीजा ओक मालिका, नाटक, सिनेमा आणि जाहिरातींमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहे. तिने ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’, शाहरुख खानसोबत ‘जवान’ आणि मनोज वाजपेयींसोबत ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हे हिंदी सिनेमे केले आहेत. तिचे वडील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, तर सासरे श्रीरंग गोडबोलेही मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर.

गिरीजा आणि तिच्या कुटुंबाला अभिनयाचा वारसा आहे. तिने निर्माता सुहृद गोडबोलेसह लव्ह मॅरेज केले असून, त्यांना एक मुलगाही आहे. तिच्या नणंद मृण्मयी गोडबोलेसुद्धा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ज्यांनी ‘चि.व चि.सौ.का.’ आणि ‘मी आई आणि…’ या सीरिजमध्ये देखील काम केले आहे. गिरीजा आणि मृण्मयी बहिणींसारखे जवळचे नाते शेअर करतात, आणि त्या दोघींचे एकत्र व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

गिरीजा ओकचा हा साधा, आत्मविश्वासू, आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व आजच्या पिढीच्या दृष्टीने एक प्रेरणा ठरत आहे, आणि तिच्या अभिनयाचा, सौंदर्याचा गौरव राष्ट्रीय स्तरावर होत आहे.

पहिला चित्रपट: त्यांचा पहिला मराठी चित्रपट २००४ साली प्रदर्शित झालेला ‘मानिनी’ हा होता. यात त्यांच्यासोबत स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होते.

इतर मराठी काम: त्यांनी गुलमोहर, लज्जा, नवरा माझा भावरा यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टीव्ही मालिका: त्यांनी सोनी टीव्हीच्या लोकप्रिय हिंदी मालिकेमध्ये (Ladies Special) देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. ही मालिका मुंबईच्या लेडीज स्पेशल लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर आधारित होती.

कन्नड चित्रपट: २००९ मध्ये त्यांनी House Full या कन्नड चित्रपटातही काम करून आपली बहुभाषिक क्षमता दाखवली.


प्रमुख हिंदी काम (बॉलिवूड)

in Bollywood

‘तारे जमीन पर’ (२००७): आमिर खान अभिनित या हिट चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यात त्यांनी जबीनची भूमिका साकारली होती.

‘शोर इन द सिटी’ (२०१०): या चित्रपटातही त्यांची भूमिका होती.

‘जवान’ (२०२३): शाहरूख खानच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटातही त्या झळकल्या होत्या.
ओटीटी आणि वेब सीरिज

‘इन्स्पेक्टर झेंडे’: यात त्यांनी मनोज वाजपेयी यांच्यासोबत काम केले.

मॉडर्न लव्ह: मुंबई’

आगामी प्रोजेक्ट: त्या लवकरच गुलशन देवैय्यासोबत ‘थेरपी शेरपी’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

सोशल मीडियावरील चर्चा


Girija Oak National Crush Marathi: गिरीजा ओक यांचा निळ्या साडीतील लूक एका मुलाखती दरम्यानचा आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या भौतिकशास्त्राच्या (Physics) शिक्षकाचा ‘वेव्ह्स’ (Waves) शब्दाचा ‘बेब्स’ असा उच्चार केल्याचा मजेशीर किस्सा सांगितला होता.
Girija Oak National Crush Marathi: या फोटोंनंतर सोशल मीडियावर त्यांची प्रशंसा करणारे आणि त्यांना ‘नॅशनल क्रश’ म्हणून घोषित करणारे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

“आजच HSRP नंबर प्लेट बसवा—30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख, नाही तर तुम्हाला बसेल दंड”

चाहत्यांनी त्यांना ‘सर्वात सुंदर आणि तरीही दुर्लक्षित अभिनेत्री’ म्हटले आहे.

कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना

Girija Oak National Crush Marathi: एका व्हिडिओ नुसार, या अचानक मिळालेल्या प्रसिद्धीवर गिरीजा ओक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा फोन सतत वाजत आहे आणि त्या स्वतः या गोष्टीमुळे ‘अचंबित’ आहेत. त्यांनी हे देखील मान्य केले की काही सोशल मीडिया हँडल्सने त्यांचे फोटो ‘sexualised’ (अश्लील) केले. मात्र, तरीही ‘जे काम मी करते, ते टिकणारे आहे. जर लोकांना आता माझे काम कळत असेल तर मला आनंद आहे,’ असे म्हणत त्यांनी या ट्रेंडला सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे.

आता शेतकऱ्यांच्या शेताला मिळेल २५ वर्षे मोफत वीज! जाणून घ्या “सौर कृषी वाहिनी”

Loading