Makar Sankranti Ukhane 2026; ‘नाव घ्या नाव घ्या’ म्हणणाऱ्या मैत्रिणींसाठी झटपट लक्षात राहणारे खास उखाणे!

Makar Sankranti Ukhane 2026; छोटे, झटपट उखाणे

Makar Sankranti Ukhane 2026;आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये उखाण्याला एक खास आणि वेगळं महत्त्व आहे. उखाणा घेणाऱ्या स्त्रीने घेतलेल्या शब्दांतून आपल्या पतीबद्दलचं प्रेम, आदर आणि नात्यातला गोडवा ओतप्रोत वाहत असतो. संक्रांत म्हटलं की काळी साडी, तिळगुळ, हळदी-कुंकू आणि सुवासिनींचा उत्साह! आणि हळदी-कुंकू म्हटलं की हमखास कानावर पडणारे शब्द म्हणजे— “उखाणा घ्या बरं, उखाणा!” अशा वेळी आयत्या वेळी उखाणा सुचत नाही किंवा खूप मोठे उखाणे लक्षात राहत नाहीत. म्हणूनच, चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण या लेखामध्ये पटकन लक्षात राहतील आणि लगेच घेऊन तुम्ही सर्वांची मनं जिंकाल, असे छोटे आणि गोड उखाणे पाहूया!

संक्रांतीसाठी खास उखाणे

(Sankranti Special)



“काळी चंद्रकळा, तिळाचा हलवा,
……………. रावांच्या नावाचा आज आहे मजला हेवा.”


“मकर संक्रांतीचा सण, तिळगुळाचा गोडवा,
……………. रावांच्या संसारात आनंदाचा गोडवा सदा वाढवा.”

Makar Sankranti Ukhane 2026; या लयबद्ध पद्धतीने आपल्या जोडीदाराचे मग नवरा असो वा बायको हे दोघेही उखाणे घेतात. घरगुती समारंभात आणि हळदी कुंकाच्या समारंभात सुवासिनी या आपल्या नवरोबाचे नाव ह्या उखाण्यात घेतात. 

आज आपण या लेखात पाहणार आहोत स्त्रियांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमात लागणारे Ukhane . 

दोन ओळींचे असतात आणि त्यात एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा एखादी गोष्ट कौतुकाने किंवा विनोदाने उल्लेखली जाते. उखाणे म्हणणे ही एक कला आहे.

Makar Sankranti चला तर मग उखाणा घेण्यासाठी…..

Makar Sankranti Ukhane 2026; मकर संक्रांत स्पेशल उखाणे 

तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी

_____रावांची मी राणी

तिळाचे पोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ,

_____रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा

आणि _____ चा जोडा राहो साता जन्माचा.

\

“महिलांनो, सरकार देतंय ₹१५,००० ची फ्री शिलाई मशीन! आजच असा करा मोबाईलवरून अर्ज.”

शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्य जिजाऊची कुशी

_____रावांच नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी.

मकर संक्रांतीला, लोक उडवतात पतंग,

_____रावांची आवड आहे, गुरुचा सत्संग.

हलव्याचे दागिने, त्यावर काळी साडी,

नेहमी खुश राहो _ आणि __ ची जोडी

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास

_____रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.

तिळगुळ घ्या आली संक्रांत

_____शी झाले लग्न स्वभावाने फारच शांत

गुलाबाचे फूल लावते वेणीला

_____रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.

मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा,

_____रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.

Makar Sankranti Ukhane 2026;

संसारुपी सागरात पली असावे हौशी

_____राव च नाव घेते मकर संक्रांती दिवशी.

गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,

_____रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.

Makar Sankranti Ukhane 2026; मकर संक्रांतीला, कपडे घालतात काळे,

_____रावांना नेमही सुचतात, कुठेपण चाळे.

हिऱ्याची अंगठी, चांदीचे पैंजण

_____रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण

तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,

_____रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

एका आठवड्यात, दिवस असतात सात,

_____रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत.

निसर्ग निर्मिती च्या वेळी सुर्यनारायण झाले माळी

_____चे नाव घेते संक्रांतीच्या वेळी.

कोल्हापूरचा चिवडा,लोणावळ्याची चिक्की,

_____रावासमोर सर्व दुनिया फिकी.

काकवी पासून, बनवतात गुळ,

_____रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले,

_____रावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडविले.

तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,

_____रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.

तिळगुळ घ्या आली संक्रांत

_____शी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत

मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे मनी

_____राव माझ्या सौभाग्याचे धनी.

देवीच्या मंदिराला सोन्याच्या कळस

_____राव आहेत सर्वांपेक्षा सरस.

माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची

_____रावांचे नाव घेतेय संक्रांतीच्या दिवशी.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी

_____रावांचे नांव घेते, मकर संक्रांतिच्या दिवशी.

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,

_____रावांचे नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

आयुष्याच्या सागरात ( मुलाकडील आडनाव ) ची नौका

_____रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका.

तिळाचा स्नेह गुळाची गोडी,

सदा सुखात राहो _____जोडी.

दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी

_____ रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.

मंगलकार्याची खूण म्हणजे दाराला तारण

_____रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण.

वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस

_____रावांच नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया,

_____रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया.

मैत्रिणी सारखी नणंद माझी, भावासारखा आहे दीर

_____रावांचे नाव घ्यायला मन माझे नेहमीच अधीर.

 तुमच्या लाडकाय लेकीचे भविष्य करा सुरक्षित! हे नवीन सुकन्या समृद्धी योजनेचे २०२६ चे व्याजदर!

तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,

_____रावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.

संक्रातीच्या सणाला आहे सुगड्याचा मान

_____रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाच वान.

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छांन

_____रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.

तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी,

_ रावांचे नाव घेते, सुखी असावी आमची जोडी.

सूर्याची राशी बदलेल, तुमचे भविष्य,

__ रावांमुळे, बदलेल माझे आयुष्य.

तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,

_____रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.

तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी

_____रावांची मी राणी

हळदी कुंकूवाचे कारण सासू आहे प्रेमळ नणंद आहे हौशी

_____रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी.

आई वडिलांचा निरोप घेताना पाऊले होतात कष्टी

_____रावांच्या आयुष्यात करेन सुखाची वृष्टी.

नंदन वनात नाग नागिणीची वस्ती

_____राव यांना आयुष्य मागते माझ्या पेक्षा जास्ती

गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत

_____रावांचे नाव घेते संक्रांतच्या पूजेत.

कवीची कविता मनापासून वाचावी

_____रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.

असंख्य तारे नभात पाहावेत निरखून,

_____रावां सारखे पती वडिलांनी दिले पारखून.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी

_____रावांचे नाव घेते मकर संक्रातीच्या दिवशी.

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात

_____रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात

अंगणात काढते रांगोळी फुलांची

_____रावांचे नाव घेते नवी सून ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची.

सोसायट्यांच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ

_____रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगुळ.

Makar Sankranti Ukhane 2026;

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान

_____चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण

तीळासारखा स्नेह गुळासारखी गोडी

_____रावांच नाव घेते सुखी असावी जोडी.

तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा

_____चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा..

आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा

_____रावांच्या पाठीशी ईश्र्वराचा हात सदैव असावा.

मोत्याची माळ, सोन्याचा साज _____रावांचे नाव घेते,

मकर संक्रातीचा सण आहे आज.

माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची

_____रावांचे नाव घेतेय,संक्रांति च्या दिवशी.

घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण,

_____रावांचे नाव घेते संक्रातीचे कारण.

घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण ,

_____रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण

संसार रुपी सारिपाठावर पडले मनाजोगे दान

_____रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

_____शी लग्न झाले वर्ष झाले सोळा.

कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा

_____रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,

_____रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

नेत्रांच्या निरांजनात अश्रुंच्या वाती

_____रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.

तिळगुळ घ्या आली संक्रांत

_____माझ्याबरोबर मला कसली भ्रांत.

महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी

_____रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला

_____रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळेला

नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा

_____रावांच नाव घेते सन आहे संक्रांतीचा.

राजहंस पक्षी पाळतात हौशी

_____रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली

_____रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली.

तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा,

_____रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा.

चांदीच्या ताटात रेशमी खण

_____रावांच नाव घेते संक्रांतीचा सन.

जीवनाच्या करंजीत प्रेमासाचे सारण,

_____रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण.

अबोलीच्या मुग्ध काळ्या सांगून गेल्या मनीचे

_____च नाव घेते सानिध्य आहे मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकवाचे……

हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी

_____रावांच नाव घेते संक्रांतीचा दिवशी.

कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी,

_____रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी.

सासू माझी मायाळू दीर माझा हौशी

_____रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

यमुनेच्या पाण्यात ताजमहालाची सावली

_____ना जन्म देऊन धन्य झाली माउली.

Loading