Ganesh Jayanti 2026 Marathi: सर्वकाही एकाच क्लिकवर!
Ganesh Jayanti 2026 Marathi: श्री गणेश मंदिर म्हणजे आराध्य देवता, हिंदू धर्मात श्रीगणेशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणी या देवाला गणपती, विनायक, श्री वरद मूर्ती म्हणते, तर कोणी भक्तीने ‘गणपती बाप्पा मोरया’ किंवा ‘मोरया’ म्हणून संबोधते. याच लाडक्या गणपतीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. माघी चतुर्थीला येणाऱ्या ‘गणेश जयंती’ बद्दलची ही सविस्तर माहिती.
‘नाव घ्या नाव घ्या’ म्हणणाऱ्या मैत्रिणींसाठी झटपट लक्षात राहणारे खास उखाणे!
गणेश जयंती आणि गणेश उत्सव: काय आहे फरक?
Ganesh Jayantid difference
अनेकांना प्रश्न पडतो की वर्षातून दोनदा गणपती का साजरे केले जातात? त्यातील फरक खालीलप्रमाणे:
नैवेद्य: माघी गणेश जयंतीला ‘तिळाचे मोदक’ किंवा ‘तिळाचे लाडू’ यांचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो.
गणेश जयंती (माघी चतुर्थी):
माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा ‘जन्म’ झाला होता, म्हणून याला गणेश जयंती किंवा ‘प्रकट दिन’ म्हणतात. हा बाप्पाचा वाढदिवस आहे.
गणेश उत्सव (भाद्रपद चतुर्थी):
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती पृथ्वीवर ‘पाहुणे’ म्हणून येतात. हा उत्सव पार्थिव गणेशाच्या पूजेचा आणि सार्वजनिक उत्सवाचा असतो.
“महिलांनो, सरकार देतंय ₹१५,००० ची फ्री शिलाई मशीन! आजच असा करा मोबाईलवरून अर्ज.”
शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (२२ जानेवारी २०२६)
shubh Murtha
मुहूर्त: गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ११:२० ते दुपारी १:४० या वेळेत बाप्पाची पूजा करणे सर्वोत्तम ठरेल.
अभिषेक: या दिवशी बाप्पाला पंचामृताचा अभिषेक घालावा.
या गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष चे 21 पाठ घ्यावे.
‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
माघी गणेशोत्सवाचे महत्त्व
(Significance)
भाद्रपदातील गणपतीप्रमाणेच माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पौराणिक कथेनुसार, याच दिवशी गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून याला ‘गणेश प्रकट दिन’ असेही म्हणतात. ग्रहांच्या पिडा दूर करण्यासाठी आणि कार्यात यश मिळवण्यासाठी या दिवशी केलेली पूजा फलद्रूप ठरते.
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
गणेश जयंतीला कुठे भरते यात्रा?
(Major Fairs and Celebrations)
गणेश जयंतीनिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या यात्रा भरतात, जिथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
माघी गणेश जयंतीला अष्टविनायकाची यात्रा करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विशेषतः मोरगाव (मयुरेश्वर) येथे या दिवशी मोठी यात्रा भरते.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठा असतो, इथेही भाविकांची मोठी रांग लागते.
कोकणात अनेक गावांमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त ‘भजन’ आणि ‘पालखी सोहळा’ आयोजित केला जातो.
पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसह अनेक मानाच्या गणपती मंदिरांत फुलांची सजावट आणि यात्रा असते.
![]()








