GajananMaharaj PrakatDin2026;जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती
GajananMaharaj PrakatDin2026; विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव आणि तेथील श्री गजानन महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर प्रत्येक घरातील श्रद्धास्थान आहेत. ‘गण गण गणात बोते’ या मंत्राने भक्तांच्या आयुष्यात चैतन्य भरणारे महाराज आणि त्यांच्या दर्शनासाठी आसुसलेले लाखो भक्त, यांच्या भेटीचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे ‘श्री गजानन महाराज प्रकट दिन’. शेगाव नगरीत या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्रातही हा दिवस एखाद्या मोठ्या उत्सवासारखा साजरा केला जातो.
भक्ती आणि परंपरेचा संगम
GajananMaharaj PrakatDin2026; शेगाव नगरीत या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्रातही हा दिवस एखाद्या मोठ्या उत्सवासारखा साजरा केला जातो. प्रत्येक भक्त आपल्या महाराजांची सेवा करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.
पारायण सोहळा: प्रकट दिनानिमित्त अनेक ठिकाणी ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाच्या पारायणाचे आयोजन केले जाते. काही भक्त सात दिवसांचे, तर काही तीन दिवसांचे विशेष पारायण करून महाराजांची सेवा करतात.
‘माऊली’ – एक प्रेमळ हाक: शेगावात भक्त एकमेकांना किंवा महाराजांच्या सेवकांना ‘माऊली’ या नावाने हाक मारतात. ही साद केवळ शब्दांची नसून त्यामागे आपुलकी आणि समर्पणाची भावना असते.
GajananMaharaj PrakatDin2026; टाळ-मृदंगाचा नाद: प्रकट दिनाच्या दिवशी संपूर्ण शेगाव नगरी टाळ-मृदंगाच्या आवाजाने दुमदुमून जाते. भक्तांच्या जयघोषात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते.
उत्सवाचे मुख्य टप्पे
(Event Details – 2026)
प्रकट दिन तारीख: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ (माघ वद्य सप्तमी).
प्रमुख कार्यक्रम: पहाटे काकडा आरती, दुग्धाभिषेक आणि सकाळी १० ते १२ या वेळेत विशेष ‘काल्याचे कीर्तन’ होऊन दुपारी १२ वाजता मुख्य प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो.
GajananMaharaj PrakatDin2026; पालखी सोहळा: सायंकाळी महाराजांची पालखी, अश्व, रथ आणि मेण्यासह नगर परिक्रमेसाठी निघते.
तुमच्या लाडकाय लेकीचे भविष्य करा सुरक्षित! हे नवीन सुकन्या समृद्धी योजनेचे २०२६ चे व्याजदर!
शेगाव संस्थानची खास वैशिष्ट्ये
(Specialties of Shegaon)
१. अजोड शिस्त (Discipline):
शेगाव संस्थानची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिथली शिस्त. लाखो भाविक एकाच वेळी दर्शनाला आले तरी कुठेही गोंधळ नसतो. हीच शिस्तबद्धता महाराष्ट्रातील इतर संस्थानांसाठी एक आदर्श मानली जाते.
२. स्वच्छतेचे माहेरघर (Cleanliness):
भारतातील सर्वात स्वच्छ मंदिरांच्या यादीत शेगावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. येथील परिसर आणि व्यवस्था पाहून भक्तांचे मन प्रसन्न होते.
३. सेवा आणि महाप्रसाद:
संस्थानमार्फत विनामूल्य महाप्रसाद, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक उपक्रम अत्यंत पारदर्शकपणे राबवले जातात.
GajananMaharaj PrakatDin2026; शके १८००, माघ वद्य सप्तमी (२३ फेब्रुवारी १८७८) रोजी गजानन महाराज प्रथमच शेगावात लोकांच्या दृष्टीस पडले. त्यांनी दिलेला ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र ‘जीव आणि शिव एकच आहेत’ हा संदेश देतो.
“महिलांनो, सरकार देतंय ₹१५,००० ची फ्री शिलाई मशीन! आजच असा करा मोबाईलवरून अर्ज.”
ऐतिहासिक संदर्भ (Quick History)
अधिकृत वेबसाईट (Official Website)
👉 www.gajananmaharaj.org
॥ श्री गजानन महाराजांची आरती ॥
GajananMaharaj Aarati
जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया ।
जयदेव जयदेव ॥धृ॥
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।
तें तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी ।
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा ।
करूनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना ।
धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना ।
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥
लीला अनंत केल्या बंकटसदनास ।
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस ।
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥
व्याधी वारून केले कैकां संपन्न ।
करविले भक्तालागी विट्ठलदर्शन ।
भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥४॥
॥ श्री गजानन महाराज बावन्नी ॥
GajananMaharaj Bavani
जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१||
निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२||
सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३||
माघ वद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४||
उष्ट्या पत्रावळीनिमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५||
बंकट लालावरी तुझी | कृपा जाहली ती साची ||६||
गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७||
तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८||
जानाकीरामा चिंचवणे | नासवोनी स्वरूपी आणणे ||९||
मुकीन चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०||
विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११||
मध माश्यांचे डंख तूवा | सहन सुखे केले देवा ||१२||
त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३||
कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४||
वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५||
जळत्या पर्यकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६||
टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७||
बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्तची जो होता ||१८||
रामदास रूपे त्याला | दर्शन देवोनी तोषविला ||१९||
सुकलालाची गोमाता | द्वाड बहुत होती ताता ||२०||
कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१||
घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२||
दांभिकता परी ती त्याची | तू न चालवोनी घे साची ||२३||
भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४||
आज्ञा तव शिरसावंद्य | काकही मानती तुज वंद्य ||२५||
विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवऱ्याला ||२६||
पिताम्बराकरवी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७||
सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८||
सवडद येथील गंगाभारती | थुंकूनी वारिली रक्तपिती ||२९||
पुंडलिकाचे गंडांतर | निष्ठा जाणून केले दूर ||३०||
ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१||
माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२||
लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३||
कवर सुताची कांदा भाकर | भक्शिलीस तू प्रेमाखातर ||३४||
नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५||
बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावरी विरक्त प्रीती ||३६||
बापुना मनी विठ्ठल भक्ती | स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७||
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८||
वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९||
उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०||
देहान्ताच्या नंतरही | कितीजणा अनुभव येई ||४१||
पडत्या मजूरा झेलीयेले | बघती जन आश्चर्य भले ||४२||
अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३||
गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४||
शरण जाऊनी गजानना | दुःख तयाते करी कथना ||४५||
कृपा करी तो भक्तांसी | धावून येतो वेगेसी ||४६||
गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७||
बावन्न गुरुवारी नेमे | करा पाठ बहु भक्तीने ||४८||
विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९||
चिंता साऱ्या दूर करी | संकटातूनी पार करी ||५०||
सदाचार रत सद्भक्ता | फळ लाभे बघता बघता ||५१||
भक्त बोले जय बोला | गजाननाची जय बोला ||
जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||
GajananMaharaj PrakatDin2026; ॥ अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ॥
या अंगारकी चतुर्थीला करा राजूरच्या गणपतीची वारी, नवसाला पावणारा गणपती”
January 4, 2026

![]()


