Table of Contents
ToggleGauri Ganpti An Inseparable Pair: ज्येष्ठ कनिष्ठ
Gauri Ganpti An Inseparable Pair: गौरी गणपती हा महाराष्ट्रीरातील एक मुख्य सण आहे. गौरी गणपती या सणाला महालक्ष्नमीचा सण असे म्हणून देखील म्हणतात.भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तसेच महालक्ष्मींना दाग दागिन्यांनी देखील सजवतात.
Gauri Ganpti An Inseparable Pair: ज्येष्ठा गौरीची पूजन हे महाराष्ट्र राज्यातील गौरी गणपतीचा सण म्हणून साजरा केला जातो. या सणाला हा सण सर्वत्र महाराष्ट्रभर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो त्यासाठी वेगवेगळ्या आख्यायिका देखील प्रचलित आहेत.
Gauri Ganpti An Inseparable Pair: ज्येष्ठा गौरी जेव्हा घरात बसवल्या जातात तेव्हा त्यांच्यासाठी मखर केले जाते. त्यांच्यासमोर गहू आणि तांदूळ यांची रास टाकला जाते. तसेच असे म्हटले जाते की या दिवशी लक्ष्मीपूजन होते त्या दिवशी महालक्ष्मी ही आपल्या घरी येते. त्या घरी आल्यानंतर एकमेकींना हळद कुंकू लावतात.व विडा देखील देतात.
Gauri Ganpti An Inseparable Pair: काही मान्यतांनुसार गौरीला श्री गणेशाची बहीण मानले जाते, तर प्रचलित दंतकथांनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. ती श्री गणेशाची माता आहे. काही लोक या सणाला महालक्ष्मी पूजादेखील म्हणतात तसेच आता ते काय म्याहणे ते वर मागितला काही त्रास आहे गणपती बाप्पा लग्न होईल दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करतात.
Gauri Ganpti An Inseparable Pair: या सणाला वेगवेगळे पदार्थ केले जातात त्यामध्ये अनारसे, करंजी, लाडू असे अनेक पदार्थ या सणाला केले जातात. या ज्येष्ठ कनिष्ठ गौरी मध्ये देखील बसवल्या जाते. आणि त्यासोबत म्हणजे त्यांची मुले जातात.
Gauri Ganpti An Inseparable Pair: Time of Arrival or Muhurta
Gauri Ganpti An Inseparable Pair: आपल्या राज्यात गणपती उत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा हे आपल्या घरी विराजमान झाले. आता गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आता येणार गौरी गणपती म्हणजे महालक्ष्मी जन्म वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखल्या जाते.
Gauri Ganpti An Inseparable Pair: गौरी गणपती यांचे आगमन हे गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर चौथ्या दिवशी होते. त्यास आपण ज्येष्ठा गौरी आव्हान असे म्हणतात. यावर्षी ज्येष्ठा गौरींचे आवाहन 10 सप्टेंबर मंगळवार रोजी होणार आहे.
Gauri Ganpti An Inseparable Pair: तर बुधवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरी पूजन आहे. त्यास आपण ज्येष्ठा गौरी जेवण देखील म्हणतो.12 सप्टेंबर गुरुवारी ज्येष्ठा गौरी या विसर्जित होणार आहेत.
Gauri Ganpti An Inseparable Pair: ज्येष्ठा गौरींचे आवाहन 10 सप्टेंबर मंगळवार रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. या दिवशी दुपारी 3 ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे.
Gauri Ganpti An Inseparable Pair: In short
गौरी गणपतीचा सण कधी येतो | भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर |
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे आव्हान मुहूर्त | 10 सप्टेंबर मंगळवार रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत |
गौरी गणपतीच्या समोर किती दिवस असतो | गौरी गणपतीचा हा सण तीन दिवसाचा असतो |
गौरी गणपती हे कशाचे प्रतीक आहे | काही मान्यतांनुसार गौरीला श्री गणेशाची बहीण मानले जाते |
Gauri Ganpti An Inseparable Pair: Legend
ज्येष्ठा गौरी आवाहन कथा
Gauri Ganpti An Inseparable Pair: श्रीमहालक्ष्मीआणि त्यांची बहीण ‘श्रीअलक्ष्मी’ या दोन्चाही बहिणीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे (येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जे खर्च होते त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ हीदेखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यक अशी आहे.
Gauri Ganpti An Inseparable Pair: जेव्हा समुद्र मंथन नंतर झाले तेव्हा मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीनं सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला.
श्रीविष्णूने दिला तीन वर : श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळं तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थ (पिंपळाचे झाड) वृक्षाखाली रडत बसली. तिथुन श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचं सांत्वन केलंं आणि तिला तीन वरही दिले.
Gauri Ganpti An Inseparable Pair: पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘लक्ष्मी’ व ‘अलक्ष्मी’ या दोघी बहिणींची पूजा केली जाते.
मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या
गणपती बाप्पा मोरया द हार्ड बीटhttp://Ganpati Bappa Morya The Heartbeat:
Kartik Aryan Handsome Actor: https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/
Riteish And Genelia Cute Couple: आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
Gauri Ganpti An Inseparable Pair: Story Of Gauri Ganpti
ज्येष्ठा गौरी आवाहनाची कथा जाणून घ्या
Gauri Ganpti An Inseparable Pair: एक आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. एके दिवशी भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजवू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर घरी घेऊन येईल.
Gauri Ganpti An Inseparable Pair: मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील! बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही.
गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर काही मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले.
Gauri Ganpti An Inseparable Pair: बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली.
सगळी जणं आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अंग ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल आणि तो उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.
Gauri Ganpti An Inseparable Pair: म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरासुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली.
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही.
ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्ष सुख मिळेल. सतत, संपत्ती मिळेल.
Gauri Ganpti An Inseparable Pair: Story
आख्यायिका :
Gauri Ganpti An Inseparable Pair: राज्यात शनिवारी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आता महिलांची लगबग सुरु झाली आहे ती ज्येष्ठा गौरी आगमनाची. ज्येष्ठा गौरींना विदर्भात ‘महालक्ष्म्या’ म्हणतात. ‘लक्ष्मी’ या शब्दाआधी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला. मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ म्हटलं जातं. तर अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची कथा काय आहे ते जाणून घेणार आहोत.
Gauri Ganpti An Inseparable Pair: Aarti sagrah
Gauri Ganpti An Inseparable Pair: श्री गणेशाची आरती
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
Gauri Ganpti An Inseparable Pair: श्री देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
Gauri Ganpti An Inseparable Pair: विपुल दयाघन गर्जे
विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबर श्रीरेणुके वो |पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ।धृ .।।.।। .।।
श्रमलीस खेळुनी नाचूनी गोंधळ घालूनि ब्रह्मांगणी वो । निजलिस कशी दीनाची चिंता सोडुनी अंतःकरणी वो | उठ लवकर जगदंबे त्र्यैलोक्याची तू स्वामिनी वो । विधी हरी हर अज्ञानी पूर्ण ज्ञानी तू शहाणी वो । समर्थ परमेश्वरी तू अनंत ब्रह्मांड नायिके वो || १ || पळभर ।। धृ।।
शरणागत मी आलो परि बहू चुकलो बहु बोलावया वो | तुज जननीचे नाते लाज न वाटे लावावया वो | परि तूं दिनांची जननी अनाथांची तुज बहु दया वो । हे श्रुति सत्य की असत्य अनुभव आलो मी पहावया वो | कळेल तैसी करी परि निज ब्रीद रक्षी मम पालिके वो || २ || पळभर ।। धृ .।।
भवगदे पिडलो भारी मजला दुःख हे सोसेना वो | अजुनी अंबे तुजला माझी करुणा का येईना वो | तारी अथवा मारी धरिले चरण मी सोडीना वो | कृपा केलियावाचुनी विन्मुख परतुनी मी जाईना वो | तुजवीन जगी कोणाचे वद पद प्रार्थावे अंबीके वो || ३ || पळभर ।।धृ .।।
ऐकूनी करुणा वाणी ह्दयी सप्रेम द्रवली हो । प्रसनमुख जगदंबा अंबा प्रसन्न जाहली हो । अजरामर वर द्याया प्रगटुनी पुढे उभी राहिली हो । भक्तांकित अभिमानी विष्णुदासाची माऊली हो ।|जी निज इच्छा मात्रे सुत्रे हालवी कवतुके हो || ४ ||पळभर ।। धृ .।।
Gauri Ganpti An Inseparable Pair: आरती रेणुका देवीची
जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे || धृ ||
अनुपम स्वरुपाची | तुझी घाटी | अन्य नसे या सृष्टी | तुझ सम रूप दुसरे | परमेष्टी || करिती झाला कष्टी | शशी रसरसला | वदनपुटी | दिव्य सुलोचन दृष्टी | सुवर्ण रत्नांच्या ||शिरी मुकुटी लोपती | रविशशी कोटी | गजमुखी तुज स्तविले | हेरंभे मंगल सकलारभे || जय जय || १ ||
कुमकुम शिरी शोभे | मळवटी | कस्तुरी तिलक ललाटी | नासिक अति सरळ | हनुवटी ||रुचीरामृत रस ओठी | समान जणू लवल्या | धनकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी | शशी नित भांग वळी| उपराटी ||कर्नाटकाची घाटी | भुजंग नीळरंगा | परी शोभे वेणी पाठी वरी शोभे ||जय जय ||२ ||
कंकणे कनकाची | मनगटी | दिव्य मुंद्या | दश बोटी बाजूबंद नगे | बाहुबटी ||चर्चुनी केशर उटी | सुगंध पुष्पानचे हार कंठी | बहु मोत्यांची दाटी | अंगी नवचोळी | जरीकाठी ||पीत पितांबर तगटी | पैजन पदकमली | अति शोभे | भ्रमर धावती लोभे || जय जय ||३ ||
साक्षप तू क्षितिजा | तळवटी | तुज स्वये जगजेठी | ओवाळीन आरती |दीपताटी ||घेउनी कर समपुष्टी | करुणामृत हुदयी | संकष्टी | धावती भक्तांसाठी विष्णू सदा | बहु कष्टी ||देशील जरी नीजभेटी | तरी मग काय उणे | या लाभे | धाव पाव अविलंबे || जय जय || ४ ||
Gauri Ganpti An Inseparable Pair: जय जय जगदंबे
जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे | जय जय || धृ ||
अनुपम स्वरुपाची तुझी धाटी | अन्य नसे या सृष्टी |तुज सम रूप दुसरे, परमेष्टी | करिता झाला कष्टी |शशीरस रसरसला ,वदनपुटी | दिव्य सुलोचन दृष्टी |सुवर्ण रत्नांच्या, शिरी मुकुटी | लोपती रविशशी कोटी |गजमुखी तुज स्तविले हेरंबे | मंगल सकळारंभे || जय जय || १ ||
कुमकुम चिरी शोभे मळवटी | कस्तुरी टिळक लल्लाटी |नासिक अति सरळ, हनुवटी | रुचिरामृत रस ओठी |समान जणू लवल्या, धनुकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी |शिरी नीट भांगवळी, उफराटी | कर्नाटकची घाटी |भुजंग नीळरंगा, परी शोभे | वेणी पाठीवर लोंबे || जय जय || २ ||
कंकणे कनकाची मनगटी | दिव्य मुद्या दश बोटी |बाजूबंद जडे बाहुबटी | चर्चुनी केशर उटी | सुगंधी पुष्पांचे हार कंठी |बहु मोत्यांची दाटी | अंगी नवी चोळी, जरीकाठी | पीत पितांबर तगटी |पैंजण पदकमळी, अति शोभे | भ्रमर धावती लोभे || जय जय ||३ ||
साक्षप तू क्षितिच्या तळवटी | तूचि स्वये जगजेठी |ओवाळीत आरती, दिपताटी | घेऊनी कर संपुष्टी |करुणामृत हृदये, संकटी | धावसी भक्तांसाठी |विष्णूदास सदा, बहुकष्टी | देशील जरी नीजभेटी |तरी मग काय उणे, या लाभे |धाव पाव अविलंबे || जय जय || ४ ||
Gauri Ganpti An Inseparable Pair: काशी आमची रेणुका
काशी आमुची रेणुका, मुळपीठ नायीका ।जे जे कल्पिले ते देसी, इच्छा पुरवीसी ।।
म्हणुनी प्रार्थना अंबेसी, पावे मज दिनासी ।। ध्रु।।
अणिमा महिमा महिमा, बाळा बगळा शामा।सिता सावित्री, हिचं आमुची यमा ।।ऐसे करुणेच् उत्तर मातापुर सुंदर ।।१।।
पायी पैंजण वाजती, कानी बाळ्या शोभती ।माथा बिंदल्या झळकती, त्याची प्रभा फाकती ।।कुंकुम लाविले लल्लाटी, हार शोभतो कंठी ।।२।।
अंबे नाव तुझे चांगले, मन माझे रंगले ।अंबे नाव तुझे, भवानी जपतो हा निर्वाणी ।।३॥
Gauri Ganpti An Inseparable Pair:रेणुका देवीची आरती
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी। कन्या-सुख दाता, धन माझे मिथ्या वदतो वाणी। अंती नेतील यमदुत। संगे न ये कोणी। निर्गुण रेणुका भवानी जपतो हा निर्वाणी।। लोलो।।१।।
पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर। नयनी रक्षिता आकार। अवघा तो ईश्वर। नाही सुख – दुःख देहाला भासे शून्याकार।। लोलो।।२।।
निद्रा लागली अभिध्यानी लागे अणुसंधनी | लीला वर्णिता स्वरूपाची शिणली वेद वाणी। देखूनी जगदंबा भवानी, त्रैलोक्य तारणी || लोलो ||३||
गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा। दिवट्या उजळल्या सदोदित पोत चैतन्याचा। आहं सोहं उदो उदो उदो बोलती चारी वाचा।।। लोलो।।४।।
पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत। तेथे भोपे भट। तेथे उंजाळ मोहाळ, तेथे पाणी अलोट देशमुख तानाजी, झाला ब्रम्हरूप ||।५।।
Gauri Ganpti An Inseparable Pair: जय जय भवानी
जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || घृ ||
नैसुनी पाटाउ पिवळा, हार शोभे गळा | हाती घेउनिया त्रिशूळा | भाळी कुमकुम टिळा || जय जय भवानी || १ ||
अंगी लयुनिया काचोळी, वर मोत्यांची जाळी | ह्रुदयी शोभतसे पदकमली | कंठी हे गरसोळी || जय जय भवानी || २ ||
पायी घांगरीया रुण झुन, नाकी मुक्ताफाळ | माथा केश हे कुरळ | नयनी हे काजळ || जय जय भवानी || ३ ||
सिंहावरी तू बैसुनी, मारिती दानवगण | तुजला विनवितो | निशी दिन गोसावी नंदन || जय जय भवानी || ४ ||
Gauri Ganpti An Inseparable Pair:लक्ष कोटि चंड किरण
लक्ष कोटि चंड किरण सुप्रचंड बिलपति,अंब चंद्र वदन बिंब, दीप्ती माजी लोपती,सिंह शिखर अचलवासी मूळपीठ नायिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 1
अकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले,डोलताती पुष्प-हार भार फार दाटले,अष्टदंडी बाजूबंदी कंकणादि मुद्रिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 2।
इंद्रनीळ पद्म राग पांच हीर वेगळा,पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा,पैंजणादि भूषणे ती लोपल्या ती पादुका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 3।
इंद्र चंद्र विष्णु ब्रम्ह नारदादी वंदिती,आदि अंत ठावहीन आदिशक्ती भगवती,प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 4।
पर्वताग्र वासी पक्षी अंब-अंब बोलती,विशाल शाल वृक्ष राणी भवानी ध्यानी डोलती,अवतार कृत्य कार जडमुठादि तारिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 5।
अनंत ब्रम्हांड कोटी पूर्वमुखा बैसली, अनंत गुण अनंत शक्ति विश्वजननी भासली,सव्य भागी दत्त-अत्री, वाम भागी कालिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 6।
पवित्र मातृ क्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी,अंब दर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी,म्हणूनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका…।7। ||
Gauri Ganpti An Inseparable Pair: उदो उदो जगदंबे माते
उदो उदो ग जगदंबे माते ।
महालक्ष्मी आई घेई देते माना ते ।।१ ।।
थोर त्रिलोकी भाग्य लाभले आश्विन मासाते ।
नवरात्रातील अष्टमीच्या दिनी येणे तव घडते ।।
उदो . || २ ||
तांदुळ पीठीचा करिती मुखवटा भक्ती भावाने ।
पुजा करिती सुवासिनी मग मोदा ये भरते ।।
उदो || ३ ||
धूप सुवासिक कोणी त्या जिती घेती कलशाते ।
कलश फुकिता खेळ खेळतां झुम्मा – फुगडी ते ।।
उदो ।।४ ।।
निवास तुमचा होता झाला भूवरी क्षेत्राते ।
तुळजापूर कोल्हापूर तैसे माहूर पवित्र ते ।।
उदो || ५ ||
Gauri Ganpti An Inseparable Pair: जय जय नदिपति प्रिय तनये
जय जय नदिपति प्रिय तनये । भवानी, महालक्ष्मि, माये ॥ध्रु०॥
आदि क्षिरसागररहिवासी । जय जय कोल्हापुरवासी
अंबे भुवनत्रयिं भ्रमसी । सदा निजवैकुंठीं वससी
दुर्लभ दर्शन अमरांसी । पावसि कशि मग इतरांसी
( चाल ) करुणालये मोक्षदानीं
भक्त जे परम – जाणती वर्म – सदा पदिं नरम
कृपेनें त्यांसी सदुपायें । संकटीं रक्षिसि लवलाहे ॥१॥
अमरेश्वर विधिहरिहर । मिळाले असुरांचे भार
मंदाचल नग रवि थोर । केला वासुकिचा दोर
ढवळिला सागर गर – गर । रगडिले जलचर मीन मगर
( चाल ) लाजती कोटि काम पोटीं
तुझें सौंदर्य – गळालें धैर्य – म्हणती सुर आर्य
जाळितो रतिपति सोसुं नये । होतां जन्म तुझा सुनये ॥२॥
त्रिभुवनस्वरुपें तूं आगळी । वरिलासी त्वां वनमाळी
तुजसम न मिळे वेल्हाळी । शंकर मकरध्वज जाळी
न मिळे स्पर्शहि पदकमळीं । पदरज लागो तरि भाळीं
( चाल ) पितांबर शोभतसे पिवळा
बहारजरतार – हरिभरतार – तरि मज तार
स्तवितां तुज जरि गुणग्रहे । दशशतवदनांही भ्रम ये ॥३॥
सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण तुझे ध्यानीं
दृढासन घालुनि निर्वाणीं । बैसले महामुनि तपिं – ध्यानीं
तरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुण वर्णुं कसे वदनीं
( चाल ) जरी हा विष्णुदास तूझा
बहु अपात्र – करी सुपात्र – कृपा तिळमात्र
करोनी मोक्षपदीं वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥४॥
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/