Table of Contents
ToggleMahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: विमा संरक्षणाच्या माध्यमातून गंभीर आजारासाठी प्रतिवर्षी 3 लाख रुपये
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: आपले राज्य सरकार हे नेहमीच आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवते. राज्य सरकारच्या वतीने अनेक आरोग्य संदर्भातील सुविधा राबवल्या गेल्या असून महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024 ही योजना राबवली आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र रेषेखालील जीवन जगत असणाऱ्या कुटुंबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.या उद्देशाने ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.ही योजना याआधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात होती. ही योजना 2 जुलै 2012 मध्ये सुरू करण्यात आली.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: या योजनेमध्ये 5 लाख रुपये पर्यंतचे सर्व वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. तसेच राज्यातील जे नागरिक दारिद्ररेषेखाले असून ज्या नागरिकांकडे पिवळे शिधापत्र असेल किंवा केशरी शिधापत्रक (रेशन कार्ड)असेल अशा नागरिकांना या योजनेचा मुख्यत्वे लाभ घेता येणार आहे.
तसेच या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यात आतापर्यंत 2.22 कोटी कुटुंबीयांना निशुल्क वैद्यकीय उपचार देण्यात येतात.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: या योजनेच्या अंतर्गत योजनेस पात्र असणाऱ्या नागरिकांना दर्जेदार वैयक्तिक सुविधा मिळणार असून त्यादेखील मोफत असतील. या योजनेत विषयी असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Bullet points
काही ठळक मुद्दे
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: In short
महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024: थोडक्यात माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: All information
महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024: संपूर्ण माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Main purpose
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मुख्य उद्दिष्ट
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Features
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे वैशिष्ट्ये
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: List of diseases
या आजारांवर मिळणार मोफत उपचार
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Benefiters
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची लाभार्थी कोण
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Benefits
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Annual insurance plan limits
महात्मा फुले जन आरोग्य योजना वार्षिक विमा योजनेच्या मर्यादा
Mahatma Phule Arogya Yojana 2024: Documents
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Terms and conditions
महात्मा फुले जन आरोग्य योजने संदर्भातील काही नियम आणि अटी
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Apply
महात्मा फुले जन आरोग्य योजना अर्ज प्रक्रिया
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: In short
महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024: थोडक्यात माहिती
योजनेचे नाव काय | महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 2024 |
ही योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासनाने |
ही योजना कधी सुरू झाली | 2 जुलै 2012 |
या योजनेचे लाभार्थी कोण | सर्व शिधापत्रिका धारक नागरिक |
लाभ काय | 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
सांकेतिक स्थळ | https://www.jeevandayee.gov.in/ |
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: All information
महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024: संपूर्ण माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: 2 जुलै 2012 या वर्षापासून प्रथम ही योजना 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती नंतर ही योजना महाराष्ट्रातील इतर 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारित स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. महाराष्ट्र सरकार ने महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना असून या योजनेद्वारे राज्यातील नागरिकांना आरोग्य कवच प्रदान केले जाणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच विमा संरक्षणाच्या माध्यमातून गंभीर आजारासाठी प्रतिवर्षी तीन लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येणार आहे. गंभीर आजार असण्यासाठी तीन लाख रुपये प्रति वर्षी विमा संरक्षण देण्यात येणार आले होते. नंतर या योजनेमध्ये सुधारणा करून आता मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांची विमा संरक्षण देण्यात याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. म्हणजेच आता कुठल्याही गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी विमा संरक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे.
मोठ्या प्रमाणावर राज्यातील नागरिक या योजनेचा उप लाभ घेताना दिसत आहेत. तसेच महात्मा फुले योजना आरोग्य योजना पिवळे शिधापत्रिका असलेल्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता, परंतु आता या योजनेचा लाभ हे राज्यातील पिवळा किंवा केशरी शिधापत्रिका असणाऱ्या सर्वच नागरिकांना या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेता येणार आहेत. तसेच या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेचा लाभ हा राज्यातील तमाम नागरिकांना निशुल्क वैद्यकीय सेवा घेण्यात झाला आहे.
आपल्या राज्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता सतत दुष्काळ नैसर्गिक आपत्ती अशा विविध समस्यांनी नागरिक हताश होतात. त्यात कुटुंबाची साधारण परिस्थिती, त्यामध्ये घरातील एखादा व्यक्ती आजारी पडल्यावर त्यांना चांगले वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी लागणारा पैसा हा सर्वसाधारण व्यक्तीकडे उपलब्ध नसतो. त्यामुळे आजारी व्यक्ती चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी खर्च परवडण्याजोगा नसतो.
अशा आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील सर्व नागरिकांना त्यांच्या या परिस्थितीला किंवा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते उपचारासाठी अनेक वेळा पैशाच्या अभावी व्यक्तींना कर्ज काढावे लागते. कर्ज काढून कुटुंबातील व्यक्तीचा उपचार करावा लागतो. या सर्व समस्यांचा योग्य विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मुख्यत्वे सुरू केली आहे.
तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने या योजनेच्या माध्यमातून शासकीय आणि खाजगी रुग्ण निवडक आजारावर सर्व शिधापत्रिका धारक नागरिकांना निशुल्क वैद्यकीय उपचार देण्यात येतात.तसेच ही हमी तत्त्वावर राबवली जाणार योजना आहे. या योजनेमध्ये 2.22 कोटी कुटुंबांपैकी सामाजिक आर्थिक व जात निहाय जनगणनेनुसार 2011 च्या यादीतील 83.63 लाख कुटुंबे या योजनेची लाभार्थी आहेत.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Benefiters
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची लाभार्थी कोण / पात्रता
या योजनेचे लाभार्थी श्रेणी क्रमांक अ, श्रेणी ब,श्रेणी क अशा वर्गवारीत केली आहे.
श्रेणी क्रमांक अ
- या योजनेमध्ये पिवळे शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, केशरी शिधापत्रिका दारू कुटुंबे, महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात जारी केले जातात.
श्रेणी ब
- महाराष्ट्रातील 14 कृषी दृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील पांढरे शिधापत्रधारक शेतकरी कुटुंबे जसे की संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा.
श्रेणी क
- शासकीय आश्रम अनाथ आश्रमातील मुले, शासकीय आश्रम शाळेतील महिला, कैदी आणि शासकीय व द आश्रमातील ज्येष्ठ नागरिक हे या श्रेणी समाविष्ट आहेत.
- डी जी आय पी आर ए ने मंजूर केलेल्या पत्रकार आणि त्या चे अश्रित कुटुंबीय सदस्य
- बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कडे नोंद असणारे कामगार
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Main purpose
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मुख्य उद्दिष्ट
- या योजनेत मोफत उपचार मिळतात.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना योग्य ती आरोग्य सुविधा पुरवणे.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना योग्य रीत्या उपचार घेण्यासाठी व त्यांना आजारावर उपचार घेण्यासाठी कर्ज काढावे लागणार नाही.
- या योजनेच्या माध्यमातून सर्व रेशन शिधापत्रिका धारकांना उत्तम आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.
- राज्यातील सर्व नागरिकांना योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Features
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे वैशिष्ट्ये
- आर्थिक दृष्ट्या मागासलेले राज्यातील सर्व नागरिकांना ही योजना एक वरदान ठरली आहे.
- राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आरोग्य विमा संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.
- या योजनेत नागरिकांना अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याचे नागरिकांना काम पडणार नाही. या योजनेचा लाभ हा तात्काळ रित्या ऑनलाईन स्वरूपात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार मिळणार आहेत.
- या योजनेअंतर्गत नोंदणीकृत खाजगी रुग्णालयामध्ये शासनातर्फे (एक प्रतिनिधी) आरोग्नाय मित्गररिकांच्या मदतीसाठी उपलब्ध केला आहे. तो प्रतिनिधी नागरिकांना मदत करतो आणि लाभ मिळवून देतो.
- या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयामध्ये नागरिकांना मोफत विविध शस्त्रक्रिया आणि उपचार उपलब्ध केले जातात.
- या योजनेचा लाभ सर्व शिधापत्रिका धारकांना दिल्या जातो.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: List of diseases
या आजारांवर मिळणार मोफत उपचार
- हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार
- जळीत
- हृदयरोग
- अकस्मित उपचार
- त्वचारोग
- अंतस्त्राव संस्थेचे विकार
- कानात व घसा रोग
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- व्याधीवर उपचार
- संसर्गजन्य आजार
- इंटरव्हेशनल रेडिओलॉजी
- जठर मार्गाचे उपचार
- कर्करोग वरील औषध उपचार व शस्त्रक्रिया
- नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- मूत्रपंड विकार
- मज्जातंतूचे विकार
- मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया
- स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र
- स्त्रीरोग शस्त्रक्रिया
- अस्थिवंग शस्त्रक्रिया
- बालरोग शस्त्रक्रिया
- बालरोग कर्करोग शस्त्रक्रिया
- प्लास्टिक सर्जरी
- आकस्मित वैद्यकीय उपचार
- कृत्रिम अवयव उपचार
- फुप्फुसाच्या आजारावरील उपचार
- किरणोत्सवाद्वारे कर्करोग उपचार
- संधिवात संबंधित उपचार
- जठर व आत्रविकाराच्या शस्त्रक्रिया
- मूत्रवह संस्थेच्या विकारावर शस्त्रक्रिया
- मानसिक आजारावर उपचार
- जबडा व चेहऱ्याच्या शस्त्रक्रिया
- या आजारांवर मिळणार मोफत आता उपचार
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Benefits
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ
- Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना देण्यात येत असे यापूर्वी केवळ पिवळे केशरी शिधापत्र क धारकांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ होत असे मात्र आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण दिले जात होते आता मात्र यात वाढ करून पाच लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देण्यात आले आहे.
- महात्मा फुले योजनेअंतर्गत एखादा नागरिक उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून घरी गेल्या वर दहा दिवसापर्यंत चालणाऱ्या विविध उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते.
- या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या लाभार्थ्याला एकही रुपया चा खर्च करण्याची आवश्यकता नाही.
- या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणारे वैद्यकीय उपचार, रोगाचे निदान आणि एखाद्या आजारासाठी आवश्यक उपचार, भोजन एक वेळेस चा परतीचा प्रवास खर्च ही देण्यात येतो.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Annual insurance plan limits
महात्मा फुले जन आरोग्य योजना वार्षिक विमा योजनेच्या मर्यादा
- Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024:महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाला प्रति वर्ष 1.5 लाख रुपये पर्यंतचे सर्व रुग्णालय खर्च हा मोफत केला जातो. तसेच प्रति पॉलिसी वर्ष 2.5 लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
- एकूण 1.5 लाख ते 2.5 लाख रुपयांचा खर्च खर्चाचा ला पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.
- या या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली असून आता पाच लाख रुपये पर्यंत केला आहे. या योजनेत अनेक आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
Mahatma Phule Arogya Yojana 2024: Documents
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- बँकेचे पासबुक
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जन्माचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्यात चा दाखला
- ज्येष्ठ नागरिक असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- लाभार्थी एक्स सर्विस मॅन असल्यास त्याचे ओळखपत्र
- राजीव गांधी हेल्थ कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Terms and conditions
महात्मा फुले जन आरोग्य योजने संदर्भातील काही नियम आणि अटी
- या योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र त राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब आणि सर्व शिधापत्रिका धारक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 2 लाखच्यावर नसावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शिधापत्रिका असणे अत्यंत आवश्यक आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024: Apply
महात्मा फुले जन आरोग्य योजना अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेत स्थळाला https://www.jeevandayee.gov.in/ भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर आता तुमच्यासमोर होम पेज येईल त्यावर ऑनलाईन अर्ज हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर महात्मा फुले जन आरोग्य योजना नोंदणी हा पर्याय दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा.
- तुम्हाला फ्रेश एप्लीकेशन हा पर्याय निवडायचा आहे.
- हा पर्याय तुम्ही निवडल्यानंतर त्यावर नोंदणीसाठी या योजनेचा अर्ज दिसेल.
- या अर्जावर विचारल्या जाणारी संपूर्ण माहिती ही तुम्हाला नीट वाचून अचूक अशी भरायची आहे.
- सर्व माहिती नीट भरल्यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीत तुम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ची अर्ज प्रक्रियेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज पूर्ण करू शकता.
मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/