Table of Contents
ToggleGhatasthapana The Goddess Arrival 2024: जाणून घेऊया, सर्व विधीवत पूजा .
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: पाहता पाहता आली आपल्या देवीच्या आगमनाची वेळ, अतिशय उत्साही वआनंदी वातावरणात नवरात्र उत्सव सुरू होणार. आपल्या सांस्कृतिक नेहमीच देवी देवतांची पूजा ही अगदी थाटामाटात आणि उत्साही वातावरणात केली जाते. नवरात्र हा उत्सव त्यापैकी एक.
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: नवरात्र म्हटलं की घटाची स्थापना. घट कसे मांडायचे हा पडणारा प्रश्न जे आपण आज या लेखन पाहणार आहोत.जसे घट कसा मांडायचा, घटाची पूजा कशी करायची. नैवेद्य कसा देवाला अर्पण करायचा.
उत्सव | नवरात्र देवीचा उत्सव |
कधी सुरू होत आहे नवरात्र उत्सव | ३ ऑक्टोबर 2024 |
मुहूर्त | सकाळी ०६:१५ मिनिटांपासून ०७:२२ मिनिटांपर्यंत आहे. अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी ते दुपारी १२:३३असेल. |
सप्तधान्ये | तांदूळ, गहू, ज्वारी, मूग, हरभरा, उडीद, कर्डी |
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: घटस्थापनेचे मुहूर्त
अश्विन शुद्ध प्रतिपदेला कलशाची स्थापना करतो. यंदा या कलश स्थापनेचे मुहूर्त हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:१५ मिनिटांपासून ०७:२२ मिनिटांपर्यंत आहे.
तसेच घटस्थापनेसाठी एक अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी ते दुपारी १२:३३असेल.
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: घटस्थापनेची विधिवत पूजा
देवघर स्वच्छ धुवावे, जमत असल्यायास सुशोभित करावे.ला वेदिका (शेत) स्थापन करणे म्हणतात. या वेदिकेवर घट (तांब्याचा कलश) ठेवावा. त्यात आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवावीत. कलशात पाणी टाकावे व त्यावर एका ताह्मणात तांदूळ घालून त्यावर आपल्या कुलदेवतेचा (देवीचा) टाक ठेवावा. वेदी करताना खालील मंत्र म्हणावा.नवरात्राचा पहिला दिवस यादिवशी शेतातून काळी माती आणावी. त्या मातीत गहू मिसळून देव्हाऱ्यात हे मिश्रण बांबूच्या टोपलीत ठेवावे.
ॐ महीद्यौः पृथ्वीचन इमं यज्ञमिमिक्षितां । पिपृर्तानो भरी मभिः ।।
कलशात पाणी घालताना खालील मंत्र म्हणावा
ॐ स्योना पृथ्वि भवानृक्षरानिवेशवीः । यच्छानः रु शर्मसप्रथः ।।
यानंतर खालील मंत्र म्हणावा.
ॐ इमं मे गंगे यमुने सरस्वती । शुतुद्रिस्तोमं सचता परुष्ण्या । असिकन्या मरुद वृधे वितस्तयार्जीकिये शृणुह्या सुषोमया ।।
कलशाला गंध लावताना खालील मंत्र म्हणावा
ॐ गंधद्वारां दुराधर्षा नित्यपुष्टां करीषिणी ।
ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपव्हये श्रीयम् ।।
कलशात हळद, आंबेहळद, नागरमोथा, दुर्वा आदी टाकावे, मंत्र म्हणावा ॐ या औषधीः पूर्वाजाता देवभ्यस्त्रियुगं पुरा ।
मनैनुबभ्रूणामहं शतं धामानि सप्त च ।।
कलशात २ सुपाऱ्या टाकाव्यात मंत्र म्हणावा. कलशात ५ नाणी टाकून मंत्र म्हणावा
ॐ याः फलिनीर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः।
ती बृहस्पतिप्रसूता स्तानो मुञ्चन्त्वंहः ।। निलि
कलशात रुपयाचे किंवा सुवर्ण नाणे टाकून म्हणावे.
ॐ सहिरत्नानि दाशुषे सुवाति सविता भगः। तं भागं चित्रमीमहे ।।
आता कलशात गंधाक्षता, हळद-कुंकू पंचामृत टाकावे. म्हणावे
ॐ हिरण्यरुपः सहिरण्य संहगपान्नपात्सेदुहिरण्यवर्णः।
हिरण्ययात् परियोनेर्निषद्या हिरण्यदाददत्यन्नमस्मै ।।
आंब्याच्या ५ पानांची डहाळी कलशावर ठेवावी किंवा आंब्याची ५ पाने कलशात ठेवावीत. कलशाला लाल धागा बांधावा व खालील मंत्र म्हणावा.
ॐ युवासुवासाः परिवीत आगात् । स उ श्रेयान् भवती जायमानः ।। तं धीरासः कवय उन्नयंति । स्वाध्योऽऽऽ मनसा देवयंत ।।
ताह्मणात तांदूळ भरून ते ताह्मण कलशावर ठेवावे म्हणावे
ॐ अश्वत्थेवो निषद्नं पर्णेवोवसतिष्कृता ।
गोभाजड़त्कीलासथ यत्सवनथ पुरुषं ।।
ॐ पुर्णा दर्वि परापत सुपूर्णा नूररापत । वस्ने विक्रीणावहा इषमुर्जे शतक्रतो ।।
याप्रमाणे केलेली हीच घटस्थापना प्रतिपदेस करावी व नऊ दिवस तशीच ठेवावी. स्थापनेनंतर ताह्मणातील तांदळावर कुंकवाने पुढील मंत्र म्हणत अष्ट दल काढावे श्री वरुणाय नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी ।।
या कलशाला बाहेरून गंध, अक्षता, फूल वाहावे. नंतर ताह्मणातील तांदळावर टाकाची किंवा देवीची मूर्ती स्थापन करावी.
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: घट मांडणी
अंकुररोपण – वरीलप्रमाणे घट व देवी स्थापित झाल्यावर घटाभोवती माती पसरावी. त्या मातीत सप्तधान्ये तांदूळ, गहू, ज्वारी, मूग आदी धान्य पेरावे. माती पसरताना मंत्र म्हणावेत.
ॐ स्योना पृथिविभवाभृक्षरानिवेशवी । यच्छानः शर्मसप्रथः ।।१।।
ॐ येनतोकाय तनयाय धान्यं । बीजं वहध्वे आक्षितं ।
अस्मभ्यं तद्धत्तन यद्वईमहे राधो विश्वायु सौभागम् ।।२।।
ॐ पर्जन्याय प्रगायत दिवस्पुत्राय मीळहुषे । स नोयवसमिच्छतु ।।३।।
ॐ वर्षतुते विभावरी दिवो अभ्रस्य विद्युतः । रोहंतु सर्व बीजान्यव ब्रह्मद्विषो जहि ।।४।। नंतर त्यावर हळदीचे पाणी शिंपडा.
घट प्रार्थना – देवदानवसंवादे मध्यमाने महोदधौ। उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम् ।। त्वत्तोये सर्व तीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः । त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि
प्राणाः प्रतिष्ठिताः ।। शिवः स्वयं त्वमेवासी विष्णुस्त्वंच प्रजापतिः। आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवाः सपैतृका ।। त्वयि तिष्ठन्ति सर्वेऽपि यतः कामफलप्रदाः । त्वत्प्रसादादिमं यज्ञं कर्तुमीहे जलोभ्ट्व । सांनिध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा ।। आगच्छ वरदे देवि दैत्यदर्प निषूदनि । पुजां गृहाण सुमुखि नमस्ते शंकरप्रिये ।। सर्वतीर्थमयं वारि सर्व देव समन्वितम् ।। इमं घट समागच्छ सांनिध्यमिह कल्पया ।।
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: माळ सोडणे
यानंतर वरून झेंडूच्या फुलांची किंवा इतर फुलांची माळ सोडावी. बऱ्याच ठिकाणीज नागवेलीच्या पानांचीही रोज एक माळ घालतात. अशा पद्धतीने नऊ दिवस विविध फुलांच्या माळा आपणास नऊ दिवस व्हायच्या आहेत.आता ९ दिवस देवीला बाहेर काढू नये. पुढच्या दिवसांची पूजा दुरूनच करावी व आरती करावी.
नवरात्राच्या नऊ माळा कोणते फुल घालायची प्रथा काही समाज गटात आहे ती खालील प्रमाणे
पहिली माळ: सोनचाफ्यात सारख्या किंवा शेवंती च्या पिवळ्या फुलांची माळ
दुसरी माळ:चमेली अनंत मोगरा किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला वाहतात.
तिसरी माळ:गोकर्णाची फुले जी की निळा रंगाची असतात किंवा कृष्णकमळ फुलांची माळ ही देवीला अर्पण केली जाते.
चौथी माळ :अबोली किंवा तेरडा म्हणजेच केशरी रंगाची फुलांची माळ देवीला अर्पण केली जाते.
पाचवी माळ :बेल (जो भगवान शंकरास प्रिय) किंवा कुंकवाची माळ वाहतात.
सहावी माळ :सहाव्या माळेला कर्दळीच्या फुलांची माळ देवीला वाहतात.
सातवी माळ:नारंगी फुलांची म्हणजेच झेंडूची माळ देवीला अर्पण करतात.
आठवी माळ :जास्वंद कनेर कमळ किंवा गुलाबाची म्हणजेच तांबड्या रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करतात.
नववी माळ
नव्या दिवशी 23 कुंकू महाजन केल्या जाते.
नवरात्रीसाठी देवीच्या आरत्यांचा संग्रहhttps://marathionlinetimes.com/navratri-aarti-sagrah-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: नंदादीप
आपल्याकडे नंदादीप लावण्याची प्रथा आहे .घटाजवळ अखंड नंदादीप ९ दिवस ठेवावा. नंदादीपातील बात बरीच मोठी ठेवून ती कुंकवाने रंगवावी. या सर्व कार्यक्रमाला देवी घटी बसली असे म्हणतात.
दीपस्थापना (मंत्रांसहित): प्रथम दिवा ठेवण्याच्या जागेची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी. नमस्कार करावा. ज्या ठिकाणी नंदादीप ठेवायचा तो ठेवताना खालील मंत्र म्हणावा.
ॐ ऐं ह्रीं श्रीं वास्तुपुरुषाय नमः । गंधाक्षतापुष्पं समर्पयामि ।
पुढील मंत्र म्हणावा
ॐ ऐं हीं श्रीदीपाय नमः। गंधाक्षत-पुष्पं समर्पयामि ।। अखंड दीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम् । उज्ज्वालये अहोरात्रमेकचित्तो दृढव्रतः ।। अस्मिन् क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्नसिद्धिहेतवे । लक्ष्मीयंत्रस्य पूजार्थमनुज्ञां दातुमर्हसि ।।
आता नऊ दिवस या टाकाची पूजा करावी. दररोज वर एक माळ लावावी. शक्य असल्यास ९ दिवस देवीसाठी पुढील उपचार करावेत. देवीची पूजा झाल्यावर रोज आरती करावी. रोजच्या आरत्यांत देवी आरत्या, अष्टक, जोगवा, पदे म्हणावीत. (सोबत त्याची क्रमवार मांडणी केली आहे.) आरत्या झाल्यानंतर कापूर आरती, मंत्र पुष्प म्हणावे. नऊ दिवसांत रोज दुर्गा सप्तशतीतील स्तोत्रे, देवी क्षमापन स्तोत्रे म्हणावीत.
Ghatasthapana The Goddess Arrival 2024: नैवेद्य
देवीपुढे नैवेद्य ठेवताना प्रथम पाण्यात करंगळीच्या बाजूचे बोट बुडवून जमिनीवर चौकोन काढावा. त्यावर नैवेद्याचे ताट किंवा भांडे ठेवावे. पळीभर पाणी उजव्या हाताने ताटाभोवती फिरवावे. खालील मंत्र म्हणत उजव्या हाताने देवीला अन्न भरवीत आहोत, अशी हाताची हालचाल करावी.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्ति मे हृाचलां कुरू ।
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।
अर्थ :- हे देवी हा नैवेद्य घे. तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अढळ राहू दे. इहलोकी माझ्या मनोकामना पूर्ण कर व परलोकी उत्तम गती मिळू दे.
महानैवेद्य असेल तर गोड पदार्थ देवीपुढे व बाकीचे ताटात पदार्थ मांडून, पोळीचा एक तुकडा मोडून, सर्व पदार्थांना स्पर्श करून पुन्हा पोळीवर ठेवावा. तुलसीपत्र नैवेद्यावर ठेवावे. देवीला हातांनी भरवण्याची कृती करताना खालील मंत्र म्हणावा. नैवेद्याभोवती पाणी फिरवावे.
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा।
जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी पळीभर पाणी ताह्मणात टाकून खालील मंत्र म्हणावा. नैवेद्यमध्ये पाणीयं समर्पयामी। हस्तप्रक्षालनं समर्पयामी ।
मुखप्रक्षालनं समर्पयामी। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी ।
पंचखाद्य :- नैवेद्याबरोबरच देवीसमोर पंचखाद्य ठेवावे. (पंचखाद्य खडीसाखर, खसखस, खोबरे, खारीक व खवा.) नारळ, विडा, दक्षिणा, ५ प्रकारची फळे देवीपुढे ठेवून खालील मंत्र म्हणावा.
पुगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम् ।
कर्पू रैलासमायुक्तं तांबुलं प्रतिगृह्यताम् ।।
श्री महाकाली – महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिनी
पुगीफलतांबुलं समर्पयामि ।
पुढील मंत्र म्हणावा
ॐ ऐं हीं श्रीदीपाय नमः। गंधाक्षत-पुष्पं समर्पयामि ।। अखंड दीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम् । उज्ज्वालये अहोरात्रमेकचित्तो दृढव्रतः।। अस्मिन् क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्नसिद्धिहेतवे । लक्ष्मीयंत्रस्य पूजार्थमनुज्ञां दातुमर्हसि ।।
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/