Table of Contents
ToggleVaikuntha Chaturdashi Puja 2024: भगवान श्री विष्णूला बेल तर भोलेनाथला वाहतात तुळस !
Vaikuntha Chaturdashi Puja 2024:वर्षाच्या जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात म्हणजेच मराठी आषाढ महिन्यात देवशयनी एकादशी येत,कार्तिक महिन्यात येते ती देवउठणी एकादशी. प्रबोधनी एकादशी असे देखील नाव आहे. कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते.
Vaikuntha Chaturdashi Puja 2024: रेवैकुंठ चतुर्दशी हा उत्सव केवळ महाराष्ट्रात केला जात असून त्याचबरोबर उज्जैन आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात केला जातो.
Vaikuntha Chaturdashi Puja 2024: कधी आहे वैकुंठ चतुर्दशी
हिंदू पंचांगानुसार कार्तिक शुक्लपक्ष चतुर्थी ही १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:४३ सुरू होईल तसेच चतुर्दशी तिथी ही १५ नोव्हेंबर सकाळी ०६:१९ असून,वैकुंठ चतुर्दशी चे व्रत हे १४ नोव्हेंबर रोजी करावे.
महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा ‘हरिहर’ पूजा केली जाते.यंदा ही चतुर्दशी १८ नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. ही पुजा मध्यरात्री केली जाते. वैकुंठ चतुर्दशी प्रारंभ १७ नोव्हेंबर सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी होईल आणि १८ नोव्हेंबर ला समाप्ती होईल.
Vaikuntha Chaturdashi Puja 2024:हरिहर भेट
ही हरिहर भेट म्हणजे आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे की देवाधिदेव महादेव आणि भगवान श्री विष्णू यांचा एकमेका प्रति असलेला आदर. मनुष्यासमोर उत्तम आदर्श आणि चांगले विचार, चांगले आचरण असले की, तो ठरवून देखील वाईट विचार आणि कृती करू शकत नाही. आपल्या संस्कृतीत कथा कहाण्या किंवा पारायण हे केली जातात त्यामागील हा चांगलाच हेतू आपल्यासमोर ठेवला आहे.
त्यातूनच आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देखील मिळते. यामध्ये एक गोष्ट अजून पहावयास मिळते की जेव्हा भगवान श्रीविष्णू हे चार महिने झोपतात तेव्हा सृष्टीचा सर्व कारभार हे भगवान श्रीशंकर पाहतात ते देखील काहीही तक्रार न करता. हे देखील कौतुकास्पद असून हाच आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर नेहमी ठेवला पाहिजे आपल्या सहकार्याबद्दल आणि जिम्मेदारी संबंधीत.
Vaikuntha Chaturdashi Puja 2024: वैकुंठ चतुर्दशी’
वैकुंठ चतुर्दशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेस च्या आधीचा दिवस. त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकी पोर्णिमा म्हणून देखील म्हटले जाते. चार महिने (आषाढ,श्रावण,भाद्रपद,अश्विन)चातुर्मासमध्ये भगवान श्री विष्णू हे विशेष नागावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार हा भगवान श्री शंकर यांच्याकडे असतो असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीशंकर हे भगवान श्री विष्णू यांच्याकडे त्यांचा कारभार सोपवतात व भगवान श्री शंकर हे कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असे देखील सांगितल्या जाते. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे देखील मानल्या जाते.
वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री श्री भगवान श्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि भगवान श्री विष्णू यांची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते.
ही वैकुंठ चतुर्दशी ची पूजा ही अनेक घरांमध्ये केली जाते तसेच विविध मंदिरांमध्ये देखील केली जाते.
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Vaikuntha Chaturdashi Puja 2024: वैकुंठ चतुर्दशी कथा आणि महत्त्व –
एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान श्रीविष्णू यांनी काशी येथे महादेवाला १००८ कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. त्यावेळी भगवान श्री शंकराने भगवान श्री विष्णू यांची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले होते. अशा अवघड परिस्थितीमध्ये भगवान श्री विष्णू यांनी एक कमळ कमी पडत असल्याचे पाहता भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. भगवान श्री विष्णू यांची भक्ती पाहून भगवान श्री शंकर हे प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान श्री विष्णू यांना वर दिला, की कार्तिक मासा नंतर येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखले जाईल. जो कोणी या दिवशी हे व्रत करेल त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल.
Vaikuntha Chaturdashi Puja 2024:अशी केल्या जाते पूजा
विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते,असे सांगितले जाते.
वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते.
Vaikuntha Chaturdashi Puja 2024:या तिथीच्या ब्रह्म मुहूर्तावर भगवान श्री महाविष्णू हे वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर स्नान केले होते व भगवान श्री शंकर यांची प्रार्थना केली होती, या पूजेने भोलेनाथ हे खूप प्रसन्न झाले होते.
वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.
Vaikuntha Chaturdashi Puja 2024:कृतज्ञ म्हणून भगवान श्री विष्णू महादेवाला फळे,फुले आणि बेल वाहतात तर महादेवाला देखील विष्णप्रिय असलेली तुळस वाहिली जाते. ही हरिहर भेट म्हणजे प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून
देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले की माता पार्वती प्रसन्न होते, आणि भगवान श्री विश्व प्रसन्न झाले की आपोआपच देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते त्यामुळे घरातील दुःखदरीद्र नाहीसे होते व मनुष्य जीवन तपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद मिळतो.
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….