Kartiki Purnima 2024:कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!

Kartiki Purnima 2024:

Kartiki Purnima 2024:मत्स्य अवतार,ब्रह्मदेवाचा अवतार आणि या दिवशी पांडवांनी केले होते दीपदान

Kartiki Purnima 2024: कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते, तसेच या त्रिपुरारी पौर्णिमेचे अनेक विशेष महत्त्व आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अनेक देवी देवतांच्या मंदिरात सुंदर आणि आकर्षक असा दीप उत्सव करण्याची परंपरा आपल्याला पहावयास मिळते.

या दिवशी अनेक मंदिरात आपल्याला हजारो दिवे लावलेले पहावयास मिळतात त्यामुळे मंदिर अगदी दिव्याच्या उजेडाने उजळून निघते. 

Kartiki Purnima 2024: महत्त्व

Kartiki Purnima 2024: या दिवशी श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. आणि आषाढी कार्तिकी पासून सुरु होणाऱ्या देव श्रेणी एकादशीची समाप्ती ही देवउठणी एकादशीला पूर्ण होते. व हिंदू संस्कृतीतील चातुर्मास हा एक वर्षातील येणारा महत्त्वाचा आणि विशेष असा सणवाराचा काळ संपतो.

कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला महत्त्व असले, तरी कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते.

हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या स्नान केल्याने जीवनात आनंद मिळतो. 

तसेच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. यावेळी कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होत आहेत. जाणून घेऊया या दिवशी दान केल्यानेही विशेष लाभ होतो.

Kartiki Purnima 2024:

Kartiki Purnima 2024:कार्तिक पौर्णिमा कधी?

कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुरु होईल. कार्तिक महिन्याची पौर्णिमा तिथी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजून ५९ मिनिटांनी संपेल.

Kartiki Purnima 2024:काही पौराणिक माहिती

कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात, या दिवशी भगवान श्री शंकर यांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. कार्तिक पौर्णिमा हा सण पाच दिवस चालणारा असून, हा सण देव उठणे एकादशी पासून सुरू होऊन, कार्तिकी पौर्णिमेला संपतो. या दिवसांमध्ये काही उपाय हे सांगितले गेले आहेत. जे केल्याने धन, आरोग्य, आणि माणसं मनात वृद्धी होते असे देखील अनेक उपाय आपल्याला सांगितल्या जातात.

प्रबोधिनी एकादशी ही एकादशी चातुर्मासातील शेवटची एकादशी आहे. एकादशीनंतर चातुर्मास संपतो. देव प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम आणि श्री लक्ष्मी स्तोत्र चे वाचन करावे, तसेच संध्याकाळच्या वेळी दिव्याचे दान केले पाहिजे असे देखील सांगितले जाते. असे केल्याने जीवनातील सतत होणाऱ्या त्रास दूर होण्यास मदत होते आणि सन्मान देखील मिळतो. जर आपल्याला श्री विष्णुसहस्रनाम वाचता येत नसेल तर किंवा श्री लक्ष्मी स्तोत्र आपणास वाचता येत नसल्यास आपण सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते नियमित ऐकावे.

 नियमित ऐकल्याने श्री लक्ष्मीनारायण यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो.

तसेच अजून आपल्या गावाच्या आजूबाजूला असलेल्या नदीत लाव तलाव आपल्या गावाच्या आजूबाजूला असलेल्या तलावाजवळ प्रबोधिनी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दररोज पाण्यात दिवा लावावा. जर ही शक्य नसेल तर दररोज तुळशीजवळ दिवा ठेवावा. तर नदी किंवा तलावाच्या जवळ किंवा पाण्यात सोडलेल्या दिल्यामुळे अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे देखील म्हटले जाते. तसेच पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर शनि यम राहू केतू इत्यादी ग्रहांचे वाईट प्रभाव आपल्या पासून दूर राहतात आणि दिवादान करणे हे देखील या काळात अतिशय चांगले मानल्या जाते.

Nishkramana 6th Hindu Rites 2024: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा https://marathionlinetimes.com/entertainment/nishkramana-6th-hindu-rites-2024/

पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/

Justice Sanjiv Khanna 2024;

Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/

Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/

सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/

अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/

पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/

हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Kartiki Purnima 2024:

Kartiki Purnima Dev Deepavali 2024: हे करावे आंघोळ करताना 

प्रबोधिनी एकादशी पासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज सकाळी पाण्यामध्ये थोडेसे तीळ व गंगाजल टाकावे त्यामुळे अनेक रखडलेली कामे ही मार्गी लागतात तसेच हे केल्याने आपणास सुख समृद्धी लाभते.

Kartiki Purnima 2024: या गोष्टी दान करा

त्रिपुरारी पौर्णिमेच्या तिथीला तांदूळ साखर दूध आणि पांढऱ्या वस्तूचे दान केल्याने साधकाला मिळते असे देखील मानल्या जाते. 

या पौर्णिमेस दिवा दान करण्याचे विशेष महत्त्व असून या दिवशी संध्याकाळी दीपदान अवश्य करावे. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्याने आपल्या घरातील सर्व दुःख दूर होतात असे देखील मानले जाते.

Kartiki Purnima 2024:या करू नका चुका

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत, मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी मांसाहार टाळावा.

तसेच मद्यप्राशन करू नये. 

Kartiki Purnima 2024:मत्स्य अवतार

मत्स्य अवतार हा भगवान श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी हा पहिला अवतार मानला जातो. प्रलयकाळात वेदांचे रक्षण करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूने माशाचे रूप धारण केले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. कार्तिक महिन्यात नारायण माशाच्या रूपात पाण्यात राहतात आणि या दिवशी आपला मत्स्य अवतार सोडून वैकुंठ धामला परत जातात, अशीही मान्यता आहे.

Kartiki Purnima 2024: या दिवशी पांडवांनी केले होते दीपदान

कुरुक्षेत्रावर झालेल्या महाभारताच्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर गौरव आणि पांडवांनी आपल्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर झाल्यामुळे पांडवांना अतिशय दुःख झाले नातेवाईकांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल या विचारात पांडवांची चिंता काहून भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या पूर्वजांना आनंदी करण्यासाठी एक मार्ग सांगितला, तो मार्ग म्हणजे कार्तिकी पौर्णिमेला पांडवांनी त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती प्राप्त होण्यासाठी तर पण आणि त्यानंतर दीपदान केले, असे देखील सांगण्यात येते. या काळापासून गड मुक्तेश्वरमध्ये गंगा स्नान आणि पूजा करण्याची परंपरा सुरू आहे.

Kartiki Purnima 2024:ब्रह्मदेवाचा अवतार

या त्रिपुरारी पौर्णिमेस ब्रह्म सरोवर पुष्कर मध्ये ब्रह्मदेवाचा अवतार झाला. या पुष्कर नगरीत पवित्र तलावात स्नान केल्यानंतर ते ब्रह्मदेवाच्या मंदिरात प्रार्थना देखील करण्यात येते. देवांनी दिवाळी साजरी केली.

Kartiki Purnima 2024:विष्णू जागृत झाले

देवाधिदेव श्री विष्णू या दिवशी योगनिद्रातून  जागृत होतात. प्रसन्न होऊन सर्व देवी-देवतांनी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी-नारायणाची महाआरती करून दिवे लावले. हा दिवस देवांची दिवाळी आहे, म्हणून या दिवशी आपण दिवे दान, उपवास, पूजा इत्यादी करून देवांच्या दिवाळीत सहभागी होतो

अमेय वाघ Amey Vagh Talented Actor :https://marathionlinetimes.com/entertainment/amey-vagh-talented-actor/

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

प्राजक्ता माळी  https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram