Table of Contents
ToggleAntyeshti Sanskar In Marathi 2024: जाणून घ्या जीवनाच्या अंतिम निरोपाची परंपरा
Antyeshti Sanskar In Marathi 2024: हिंदू धर्मातील सोळा संस्कार या शृंखलेत विविध असे संस्कार आपण पाहिले असून, आता या शृंखला पूर्णत्वास आली आहे. १६ संस्कारातील हा सर्वात आखरीचा आणि महत्त्वपूर्ण संस्कार आहे.
याआधी आपण या सोळा संस्काराच्या शृंखलेत जसे,,गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन, सीमंतोन्नयन ,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म, कर्णवेध संस्कार,उपनयन संस्कार ,वेदारंभ संस्कार,समावर्तन’ संस्कार , विवाह संस्कार,वप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम विषय देखील आपण माहिती पाहिली आहे.आता या लेखात जीवनाचा अंतिम अध्याय म्हणजे अंतिम संस्कार याबद्दल माहिती पाहणार आहोत.
Antyeshti Sanskar In Marathi 2024: ‘अंत्येष्टी’ संस्कार
मृत झालेल्या शरीराला अग्निसंस्कार देतात त्या ‘अंत्येष्टी’ संस्कार असे म्हणतात. अग्निहोत्राचे दहन ज्याच्या यज्ञ प्रवास करतात अंत्येष्टी या शब्दाचा अर्थ शेवटचा यज्ञ असा होतो असा देखील होतो.
Antyeshti Sanskar In Marathi 2024: अंत्यसंस्कार:
आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृत जेवण पद्धती जगण्यासाठी विविध असे १६ संस्कार म्हणजे विधी आहेत या संस्कारांबद्दल हिंदू धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये इतर अनेक वेली आपल्याला पाहायला मिळतात याचा उल्लेख सध्याच्या वेदांमध्ये पण काळानुसार या विधीमध्ये अनेक बदल करण्यात आल्याचे देखील पाहण्यात आले आहे.
प्रत्येक समाजात वेगवेगळ्या परंपरा असून थोडाफार फरक हा आपल्याला पाहायला मिळतो. किंवा अनेक विधींची नावे ही वेगळी असतात.
Antyeshti Sanskar In Marathi 2024:या संस्कारांमध्ये गर्भधारणेचा विधी प्रथम येतो त्याप्रमाणे अंतिम सोळावा संस्कार येतो. अंत्येष्टी संस्कार म्हणजे संस्कार हा सर्वात शेवटची केला जाणारा संस्कार होय, जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे एकमेव सत्य असून या सत्यास आपण नाकारू शकत नाहीत, मनुष्य जन्माला येतो त्याचा मृत्यू देखील निश्चित असतो.
माणसाचा आत्मा त्याचे शरीर सोडतो. त्यानंतर मानवी शरीराचे अंतिम संस्कार केले जातात. हिंदू धर्मात या अंत्यसंस्काराला “अंत्यसंस्कार”म्हणूनही ओळखले जाते. हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला चितेवर (लाकडाच्या रचलेल्या)जाळले जाते. यासोबतच चितेवर अंत्यसंस्कारही केले जातात. मानवी शरीर पूर्णपणे जळल्यानंतर त्याची अस्थि(हाडे )जमा केली जातात.पवित्र पाण्यात विसर्जित केली जातात.
Antyeshti Sanskar In Marathi 2024:धर्मग्रंथाच्या मान्यतेनुसार विधिवत अंत्यसंस्कार केल्याने त्या मरण पावलेल्या जीवाची अदृक्त वासना शांत होते. अंत्यसंस्कार पूर्ण व विधिवत झाल्यानंतर या प्राण्याचा आत्मा पृथ्वीवरून थेट पुढच्या जगात प्रवास सुरू करतो असे देखील मानतात. तसेच ज्या प्राण्यांचे अंत्यसंस्कार केले जात नाही त्या आत्म्यांना मुक्ती मिळत नाही असे देखील सांगण्यात येते.
Antyeshti Sanskar In Marathi 2024:हिंदू संस्कृतीतील पद्धत
मनुष्य मृत पावल्यानंतर हिंदू संस्कृतीमध्ये त्याच्याजवळ बसून पवित्र स्त्रोत्र पठण करतात, मृत व्यक्तीचे डोळे मिटवतात. मृतला तीर्थ जल, किंवा गंगाजल आणि तुळशीपत्र त्याच्या मुखात घालतात. मग व्यक्ती मृत पावल्यानंतर आप्त्यांनी दुःख आक्रोश करू नये असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले असून, तरीही आप्त दुःख आक्रोश हे आपल्या व्यक्तीसाठी करतात.
अनेक जमातीत सामुदायिक आक्रोश करण्याची परंपरा व रुढी आपल्याला पाहायला मिळतात. मृत व्यक्तीस म्हणजेच प्रेत उचलल्यावर मरण स्थान सारून घेतात. मृत व्यक्तीचे प्रेत असल्या नंतर त्या जागी कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ हे टाकल्या जाते व ते साफ करून त्यावर दिवा ठेवल्या जातो, तसेच त्या दिव्यावर बांबूची दुरडी झाकल्या जाते. असे देखील म्हणतात की जर त्या पिठावर कसलीही पावलं म्हटली तर मृत व्यक्ती हा पुढच्या जन्मी त्या त्याचा जन्म घेतो.( उदा. जर त्या पिठावर मांजरीचे पाय म्हटले असतील तर मग व्यक्ती हा पुढच्या जन्म मांजरीचा मिळतो.) तसेच दहा दिवस दिवा लावतात.
Antyeshti Sanskar In Marathi 2024: थोडक्यात
एखादा मनुष्य मृत पावल्यानंतर त्याच्या शरीराला येत असे म्हणतात तसे जीवात्मा म्हणजे त्या शरीरात जीव नसतील किंवा त्या शब्दाचा अर्थ मृतदेह असा होतो देह मृतदेह हा अत्यंत अपवित्र व अस्पृश्य मानतात. मृत शरीरास दक्षिण या यम दिशेकडे तोंड करून, तर बऱ्याच ठिकाणी दक्षिणेकडे पाय करतात, त्या मृतदेहास अग्नी दहा देण्यासाठी नेत्यांना त्याला नवीन खोरे पांढरे वस्तू घालतात किंवा पांगरतात, गुलाल आणि हार सर्वकडे टाकला जातो तसेच जो व्यक्ती मरण पावला आहे त्याचा मोठा मुलगा किंवा पुढचे कार्य करणारा नातेवाईक हा पुढे असतो व त्याची अंतयात्रा निघते.साधुसंन्यासी व तीन वर्षापर्यंतची लहान अर्भके यांना पुरतात.( म्हणून तर कोरे कपडे घालून असे सांगितले जाते.)
वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा
विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा
लग्न सोहळा: संस्कार आणि परंपरेचा नवीन अध्याय
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी
जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Antyeshti Sanskar In Marathi 2024: एखाद्या संन्याशी मृत पावल्यास
संन्याशाचा मृत देह स्नान घालून अलंकृत करून त्याला पुरल्या जाते. त्याची पूजा करतात. पुरण्यापूर्वी शंखाने वा शस्त्राने मस्तक फोडतात व त्यानंतर त्या संन्याशाचा देह पुरतात. संन्याशाचा देह तीर्थात टाकण्याचीही परंपरा आहे.. त्याला ‘जलसमाधी’ म्हणतात. दहा दिवस समाधिस्थानपूजा, पायसबलिदान,दीपदान व शंखोदकतर्पण होते. अकराव्याला पार्वणश्राद्ध, बाराव्याला नारायणबली व नंतर समाराधन होते. यानंतर संन्याशाची समाधी बांधतात.
Antyeshti Sanskar In Marathi 2024: एखादी सौभाग्यवती स्त्री मरण पावल्यास
एखादी सौभाग्यवती स्त्री मरण पावल्यास, अशा स्त्रीला आंघोळ घालून त्यानंतर तिच्या अंगावर पहिल्यांदी माहेरची साडी टाकल्या जाते व त्यानंतर सासरची साडी टाकल्या जाते, असे देखील म्हणतात( जर मृत स्त्रीच्या कपाळावरील कुंकू जर सौभाग्यवती स्त्रीने लावले तर तिचे सौभाग्य दीर्घकाळ राहते). तसेच तिला सर्व बायका कुंकू लावतात, व त्या स्त्रीला नेताना हळद आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणारे हळद आणि कुंकू याचा सडा अंगणात टाकतात व त्यावरून त्या स्त्रीला नेतात.
Antyeshti Sanskar In Marathi 2024:मृतदेह आनंतात लीन करताना केला जाणारा विधी
वैकुंठ धाम असे स्मशानभूमी संबोधने हे अतिशय चांगले आहे असे मला वाटते. या विधीमध्ये मृताचे जवळचे नातेवाईक तसेच मृताचे आप्त श्रेष्ठ म्हणजे त्याचे आखरीचे तोंड पाहण्यासाठी लोक येतात. बांबू व गवत यांच्या तिरडीवर घालून प्रेत स्मशानात नेतात. नेताना मुख झाकलेले किंवा उघडे ठेवण्याची चाली आहेत. आप्तेष्टमित्र तिरडी वाहतात. पुत्र वा आप्त क्षौर करतो व अग्नी मडक्यात ठेवून, ते मडके शिंक्यात घेऊन प्रेतयात्रेत अग्रभागी चालतो. श्राद्धाचा अधिकारी आप्त नसल्यास समंत्रक दहन न करता अमंत्रक अग्नी देतात. त्यास ‘भडाग्नी’ म्हणतात.
Antyeshti Sanskar In Marathi 2024: पुरूषाला डोक्याकडून तर स्त्रीला पायाकडून अग्नी दिल्या जातो. नंतर तो पाण्याने भरलेले गाडगे खांद्यावर घेतो. दगडाने गाडग्याला भोक पाडतात, पाण्याची धार तो चितेभोवती फिरवीत तीन प्रदक्षिणा घालतो. त्याच दगडावर गाडगे फोडतो.
Antyeshti Sanskar In Marathi 2024: अंत्ययात्रे नंतर
अंत्ययात्रेत मृत व्यक्तीचा पुत्र नातेवाईक व अन्य सहकारी मित्रपरिवार परतल्यानंतर लगेचच अंगावरील वस्त्रासह अंघोळ करतात. तसेच (बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे कीअंत्ययात्रे नंतर येणारे लोक हे मृत व्यक्तीच्या घरी लिंबाचा पाला आणतात.) तसेच दहन झाल्यानंतर सुद्धा थंड झाल्यावर असती व राख बांधून आणतात, त्यानंतर त्या राखेचे विसर्जन करतात व त्यातील काही महत्त्वाची अवयवांची राख ही वेगळी ठेवल्या जाते.
Antyeshti Sanskar In Marathi 2024: ही राख स्मरण पावलेल्या व्यक्ती च्या दहाव्या दिवशी नदीमध्ये म्हणजेच एखाद्या तीर्थक्षेत्रे जाऊन विसर्जित करतात. मात्र व्यक्ती गेल्यानंतर दहा दिवस त्याचे सुतक पाळल्या जाते, म्हणजे त्यांच्या घरच्यांना कोणी लागत नाही. (याच्यामागे शास्त्र असे असावे की जर मृत व्यक्ती हा संसर्ग आजाराने दूर मरण पावला असेल तर त्याचा संसर्ग इतर लोकांना होऊ नये यासाठी ही सुतक पद्धत लावलेली असावी.)
Antyeshti Sanskar In Marathi 2024:मृतात्मा शांत व्हावा म्हणून करावयाचे विधी.
एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याचे पुढे काय होते? हे कशाला करायचे किंवा ते कशाला करायचे? ह्तेया सर्व अंधश्रद्धा आहेत वगैरे अशा काही विधी कराव्यात का या संदर्भात प्रत्येकाचा आपला आपला हा विचार असतो त्यामुळे ते विधी करायचे किंवा न करायचे हा सर्वस्वी त्या व्यक्तीच्या घरच्यांचा विषय असतो.
प्रेताचे पाय दक्षिणेकडे करण्याप्रमाणे तेथे दक्षिणाभिमुख दीप ठेवण्याची चाल सर्व हिंदूंत आहे. विधवा व निपुत्रिक यांची प्रेते तोंड झाकून नेतात. ऋग्वेदात (१०.१८.११-१३) प्रेत पुरण्याच्या परंपरेचा उल्लेख आहे. अग्निदहन-प्रथा नंतर सुरू झाली. ऋग्वेदातच ‘अग्निदग्ध’ व ‘अनग्निदहध’ असे उल्लेख आहेत. त्यांवरून दोन्ही रीती परंपरेचा होत्या असे दिसते.
११ दिवस झाल्यानंतर एखाद्या तीर्थ स्थळी म्हणजे जिथे गंगा असते,अशा स्थळी अकराव्या दिवशी चे श्राद्ध केल्या जाते व पिंडदान केल्या जातो त्यावेळेस असे पण मानण्यात येते की जर एखादा व्यक्ती एखादा मृत व्यक्तीची इच्छा जर एखाद्या गोष्टीत राहिली असेल किंवा त्याला कोणाकडून काही वचन हवे असेल तर, (अशा वेळेस अकराव्या दिवशी केलेल्या पिंडाला कावळा स्पर्श करत नाही. अशा वेळेस जी गोष्ट मृत व्यक्तीला कबूल करून घ्यायची आहे ती कबूल केल्यानंतरच कावळा त्या पिंडाला स्पर्श करतो.)ही प्रत्येकाची आपापली भावना आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी