Vasant Panchami 2025 In Marathi: जाणून घेऊया, वसंत पंचमीबद्दल सर्व माहिती..
Vasant Panchami 2025 In Marathi: ज्ञान, कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीच्या आराधनेचा उत्सव, म्हणजे माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमीचा सण. या दिवशी ज्ञान, कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गात नवचैतन्य येते आणि याच काळात हा सण साजरा केला जातो.
वीणापाणी, शारदा, हंसवाहिनी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या सरस्वतीचा देवीचा आराधनेचा दिवस.वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा आणि नवीन सुरुवात करण्याचा प्रतीक आहे. विनावदनी असे देखील म्हणतात देवी सरस्वतीच्या वाणीतून निघणारा मधुर संगीतामुळे जगातील सजीवांना वाणीची शक्ती मिळाली आहे असे देखील म्हटले जाते.
सरस्वती पूजनाचा दिवस
वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी ज्ञान, कला आणि विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. यंदा, २०२५ मध्ये, वसंत पंचमी २ फेब्रुवारी रोजी आहे.
वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त
Vasant Panchami auspicious time
२ फेब्रुवारी सकाळी ९:१४ पासून सुरू होऊन ३ फेब्रुवारी सकाळी ६:५२ पर्यंत असून सरस्वती पूजनाची शुभ वेळ ही २ फेब्रुवारी सकाळी ७:०९ ते दुपारी १२:३५ पर्यंत आहे.
वसंत पंचमीची पूजा कशी करायची?
Vasant Panchami 2025 In Marathi: पिवळे, वसंत ऋतूतील आणि पांढरे कपडे घाला. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा सुरू करा. उजव्या हाताने देवी सरस्वतीला पांढरे चंदन आणि पिवळे, पांढरे फुले अर्पण करा. प्रसाद म्हणून साखर, दही आणि लवंगा अर्पण करा. केशर मिसळलेली खीर अर्पण करणे चांगले राहील. त्यानंतर, सरस्वतीचा मूळ मंत्र ‘ॐ ऐं सरस्वत्यै नमः’ चा जप करा.
वसंत पंचमीचे महत्त्व काय आहे?
Vasant Panchami 2025 In Marathi: वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण ज्ञान, कला, संगीत आणि बुद्धीचे महत्त्व दर्शवतो.वसंत पंचमी हा दिवस नवीन कार्ये, शिक्षण आणि कला क्षेत्रातील उपक्रम सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो.
वसंत पंचमी का साजरी केली जाते?
Why is Vasant Panchami celebreated?
वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देवी सरस्वती ही ज्ञान, कला, संगीत, बुद्धी आणि विद्येची देवी आहे.
वसंत पंचमी हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची सुरुवात मानली जाते. या ऋतूमध्ये निसर्ग नवचैतन्यमय आणि सुंदर दिसतो.
नवीन कार्ये, शिक्षण आणि कला क्षेत्रातील उपक्रम सुरू करण्यासाठी शुभ मानल्या जाते.
वसंत पंचमी हा शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला जातो या दिवशी लोक सरस्वती देवीची पूजा करून शिक्षणात तसेच ज्ञानात प्रगती होण्यासाठी पूजा करतात.
अनेक ठिकाणी वसंत पंचमीला पतंग उडवण्याची प्रथा आहे.
याव्यतिरिक्त, वसंत पंचमी हा सण सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील ठेवतो. या दिवशी लोक एकत्र येतात, उत्सव साजरा करतात.
वसंत पंचमीच्या दिवशी हे देखील करा.
Do this also on Vasant Panchami
एकाग्रतेसाठी दररोज सकाळी सरस्वती वंदना चे पाठ घ्यावे. सरस्वती देवीचे चित्र हे अभ्यासाच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतात.
ज्यांना ऐकण्यात किंवा बोलण्यात समस्या आहेत त्यांनी सोन्याच्या किंवा पितळाच्या चौकोनी तुकड्यावर ये लिहून ते धारण केल्यास लाभ मिळतो.
Vasant Panchami 2025 In Marathi: तसेच, या दिवशी बाळाच्या आईने किंवा मोठ्या धार्मिक व्यक्तींकडून बाळाच्या जिभेवर दर्भाच्या काडीने मधामध्ये बुडवून “ॐ ऐं ” लिहावे हे देखील शुभ असते ते आईने किंवा मोठ्या धार्मिक व्यक्तींकडून लिहावे.
देवी सरस्वतीला आपण लिहिण्यासाठी एखादा पूजेच्या वेळेस ठेवा आणि तोच पेन तुम्ही वर्षभर वापरावा.
वसंत पंचमीच्या दिवशी काळे किंवा निळे कपडे घालू नये,या दिवशी फक्त सात्विक अन्न घ्यावे.
देवी सरस्वतीची कहाणी
story
Vasant Panchami 2025 In Marathi:अशी कहाणी सांगितल्या जाते की, या तिथीला देवी सरस्वतीचा अवतारीख झाली होती. ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूच्या परवानगीने सृष्टीची सुरुवात केली. एकदा ब्रह्मदेवांनी विश्वभ्रमण करण्यासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना संपूर्ण जग निःशब्द आढळले. सर्वत्र शांतता होती.
ब्रह्मादेव त्यांच्या निर्मितीवर समाधानी नव्हते. मग श्री हरि विष्णूंची परवानगी घेतली आणि त्यांच्या कमंडलूतून पाणी शिंपडले. पाण्याचे थेंब जमिनीवर पडताच ते कंप पावू लागले आणि एक अद्भुत शक्ती प्रकट झाली. हे रूप एका चार भुजांच्या सुंदर स्त्रीचे होते, जिच्या एका हातात वीणा होती आणि दुसऱ्या हातात वर मुद्रा होती. इतर दोन्ही हातात एक पुस्तक आणि जपमाळ होती.
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
Vasant Panchami 2025 In Marathi: हे तुम्ही वाचले आहे का?
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?
महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?