Shree Gajanan Leela Gatha 2 Adhyay: श्री गजानन लीला गाथा २ अध्याय (लहान पोथी)

Shree Gajanan Leela Gatha 2 Adhyay: गुरु श्री गजाननाच्या पोथीचा दुसरा अध्याय

Shree Gajanan Leela Gatha 2 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज शेगाव यांचा श्री गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा दुसरा अध्याय आपल्याला वाचायला मिळणार आहे.

अध्याय दुसरा

श्रीगणेशाय नमः ।। जयजयाजी रघुनंदना। जयजय मुनी मख रक्षणा ।। जयजय सीता शोक हरणा । नमन तुला मनोभावे ।।१।। रघुराया तुझी कीर्ती । आदर्श शिष्य श्रेष्ठ पती ।। आज्ञाधारक पुत्र म्हणती । सारे वर्णिती माहात्म्य ।।२।। तुवा रक्षिले सज्जना । शिक्षा करुनी दुर्जना ।। तुझे भय पापी जना। सदैवची वाटते ।।३।। दशमुखा रावणा । तुवा केले शासना ।। राज्यी स्थापूनी विभीषणा । मित्रऋण फेडिलेसी ।।४।। रघुराया तुला नमन । मनोभावे वंदन ।। दोन्ही हात जोडोन। करुणा तुझी भाकतो ।।५।। श्रीगजानन चरित्र । लिहून व्हावे पवित्र ।। पूर्ण व्हावे मनोरथ । हेचि असे मागणे ।। ६ ।। गजानन गेले पळोन । बंकट झाला मनी खिन्न ।। देविदास दामोदरालागोन। खेद फार वाटतसे ।। ७ ।।

बंकटलाल घरी आला। परि न काही सुचे त्याला ।। तळमळ त्याच्या जीवाला । बहुतचिलागली ।।८।। म्हणे आता काय करावे । कुठे तयाचे दर्शन घ्यावे ।। स्मरण करी मनोभावे । ध्यान पिशाचे आठवून ।।९।। पिता पुसे बंकटासी । कारे बाळा सुकलासी ।। व्याधी काही शरीरासी । असे का ती सांग मज ।।१०।। बंकट काही न बोलला । मौन धरूनी राहिला ।। मानेनेच नकाराला । देत असे पितयाते ।।११।। असाच तो एके दिनी। जाई कीर्तना लागोनी ।। वाटेत गजानन पाहूनी । धावूनि गेला सवेचि तो ।।१२।। पाय धरी आनंदाने । अभिषेकी अश्श्रुने ।। चुन -भाकरी आणूनी त्याने । श्री गुरुसी अर्पिली ।।१३।।

सवे होता पितांबर । बंकट स्नेही साचार ।। त्यास गुरुने नाल्यावर । पाणी आणण्या पाठविले ।।१४।। पाण्यात तुंबा बुडवावा । ओंजळीनी ना भरावा ।। तसाच मला आणून द्यावा । गुरु तयास आज्ञापिती ।।१५।। परी त्या नाल्यास । नव्हते जल उदास ।। स्मरूनी गजाननास। बळेचि तुंबा बुडविला ।।१६ ।। तुंबा बुडविता पितांबरे । स्वच्छ जले तो भरे ।। घेऊनिया सत्वरे । गुरुपाशी पातला ।।१७।। नाला तो खोल नव्हता । पाण्याचाही पत्ता नव्हता ।। तरीही झाला बुडता । तुंबा हेच आश्चर्य ।।१८। कीर्तनासी दाटी झाली। गोविंदद्युवाची स्वारी आली ।। निरूपणी गुरुमाऊली । साह्य करी तयासी ।।१९।। बुवा झाले चकित। धावे, आले जेथे संत ।। पाय धरी अकस्मात । मंदिरी चला विनविती ।। २० ।।

परी गुरु स्थिर होते। मुळीही न हालले ते ।। गोविंदबुवा आले परते । अवघ्या जनास सांगती ।।२१।। थोर भाग्य शेगावीचे । थोर भाग्य जनांचे ।। पंढरीच्या सावळयाचे । झाले येथे आगमन ।।२२।। तुम्ही त्यास जपावे । भजन पूजन करावे ।। भेदभाव सोडोनी जावे । शरण तयाला तात्काळ ।। २३ ।। बंकट घरी परतला। वडिलांनाही बोलला ।। बाबा गावी असे आला । अवलिया एक अधिकारी ।।२४ ।। घेवोनि यावे घरास । पिता सांगे बंकटास ।। भक्त गुरुच्या शोधास । एकचित्ते लागला ।।२५।।

बंकट मूर्ती घेऊन । घरी परतला आनंदून ।। पित्यानेही पाहता तत्क्षण। नमन साष्टांग केले की ।। २६ ।। पिसा करी भोजन। तेथेच करी शयन ।। बंकटाने स्नान घालोन । गादीवरी बैसविला ।। २७ ।। वार होता सोमवार। इच्छा विनवी जोडोन कर ।। दोन घास गुरुवर । खावे आपण भक्ताचे ।।२८ ।। गजानने जेवण केले । तृप्त मनाने ढेकर दिले ।। तेथेच मग राहिले । नित्य गुरु गजानन ।।२९।। गणगण गणात बोते । गुरु करी भजनाते ।। गजानन नाव त्याते । त्यावरून पडले की ।। ३० ।। अशी ही गुरुकथा। पुढील अध्यायी बोलू आता ।। जानराव नामे एक होता । त्याचा मृत्यू टाळिला ।।३१ ।।

इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ द्वितीयोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।

Shree Gajanan Leela Gatha 2 Adhyay: श्री गजानन लीला गाथा १ अध्याय (लहान पोथी)

Shree Gajanan Leela Gatha 2 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?

रहस्य नागा साधूंचे!

Loading