ATM Update 2025 In Marathi: ATM शुल्क वाढ? जाणून घ्या तुमच्या खिशावर किती परिणाम होणार!

ATM Update 2025 In Marathi: जाणून घेऊया, ATMमधून पैसे काढताना द्यावे लागतील जास्त पैसे?

ATM Update 2025 In Marathi:आजकाल देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी अनेकजण रोख रकमेसाठी एटीएमचा वापर करतात. पण आता एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँक ग्राहकांसाठी शुल्क आणि एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याच्या विचारात आहे.

 चला तर मग जाणून घेऊया आता एटीएम (ATM)मधून पैसे काढल्यावर किती शुल्क लागेल? या संदर्भात पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये पाहूया.

आता किती वाढणार शुल्क?

एटीएममधून पाच व्यवहारांनंतर, रोख रक्कम काढण्यासाठी आता  २१ रुपयांऐवजी २२ रुपये शुल्क लागू शकते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) याबाबत शिफारस केली आहे. तसेच, एटीएम इंटरचेंज शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपये करण्याची शिफारस NPCI ने केली आहे. नॉन-कॅश ट्रांजेक्शनसाठी हे शुल्क ६  रुपयांवरून ७ रुपये होऊ शकते.

एटीएम (ATM)इंटरचेंज फीस म्हणजे काय?

एटीएम इंटरचेंज चार्ज म्हणजे जेव्हा एखादी बँक दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरते, तेव्हा त्यासाठी लागणारी रक्कम. हे शुल्क ग्राहक बँकेला देतात, कारण बँक ती रक्कम ग्राहकांकडून वसूल करते.

खर्च वाढणार?

Expenses will increase.

NPCI च्या प्रस्तावाला बँक आणि व्हाईट लेबल एटीएम(ATM) ऑपरेटर दोघांनीही मान्यता दिली आहे. त्यामुळे, ही वाढ फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नसून, देशभरातील लहान-मोठ्या गावांसाठी आणि शहरांसाठीही लागू होईल. आरबीआय, इंडियन बँक असोसिएशनचे सीईओ, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी अधिकाऱ्यांच्या समितीने बँकिंग क्षेत्राच्या खर्चाचे मूल्यांकन करून ही शिफारस केली आहे.

निर्णयाचे कारण काय?

ATM Update 2025 In Marathi: देशभरात एटीएम चालवण्याचा खर्च वाढला आहे. महागाई, व्याजदर, रोकड भरण्याचा खर्च आणि अनुपालन खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बँकिंग तज्ञांचे म्हणणे आहे.

अंतिम निर्णय बाकी

आरबीआय किंवा NPCI कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण जर हा प्रस्ताव लागू झाला, तर एटीएममधून पैसे काढणाऱ्यांच्या खिशाला नक्कीच ताण पडेल.

ATM Update 2025 In Marathi: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?

रहस्य नागा साधूंचे!

Loading