Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा दुसरा अध्याय!

Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi: कथा सारा सहित शिवलीलामृताचा २ अध्याय 

Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi: नमस्कार वाचकहो, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट.’शिवलीलामृत’ पारायणाची माहिती आणि कथासार… ‘शिवलीलामृत’ हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्याच्या पारायणाने भक्तांना अनेक लाभ मिळतात.

 शिवरात्रीच्या काळात याचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ‘शिवलीलामृत’ पारायण कसे करावे? त्याचे लाभ काय आहेत? ‘शिवलीलामृत’ मध्ये किती अध्याय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मालिकेत मिळतील.

Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi: या लेख मालिकेत आम्ही तुम्हाला ‘शिवलीलामृत’ कथासार, प्रत्येक अध्यायाची माहिती आणि पारायणाची सोपी पद्धत सांगणार आहोत. रोज एक अध्याय वाचा आणि शिवलीलामृताच्या दिव्य अनुभवात सहभागी व्हा. तर, शिवरात्रीच्या या पवित्र काळात, ‘शिवलीलामृत’ पारायणाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आमच्या लेख मालिकेत रोज अध्याय वाचा आणि शिवकृपेचा अनुभव घ्या.

तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा दुसरा अध्याय पाहणार आहोत.

Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi:

Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा दुसरा अध्याय!

अध्याय दुसरा महिमा महाशिवरात्रीचा

सूत म्हणाले, “सजन हो। महाशिवरात्रीचे माहात्म्यही अगाध आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्यफल प्राप्त होते, त्याविषयीची एक कथा सांगतो ऐका.

विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्रीदिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला. तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत ‘शिवशिव’ ‘हरहर’ असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्ववृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एकेक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला. ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्याकहून नकळत उपोषण, जागरण, नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला.

त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तेथे पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याधाने चाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, “कृपा करून मला मारू नकोस. मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते.” तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले. त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, “मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले, शंकरांचे भजन पूजन विसरले, म्हणून शिवशापाने मी, माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. बारा वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन.” तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला, एकेक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरीण व आणखी एक हरिणी तेथे आली आणि आपापली कर्तव्ये करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. अशा प्रकारे व्याधाला जागरण ब चार प्रहरींचे शिवार्चन घडले.

सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला व शावकांसह ते सर्वजण व्याधाला ‘आधी मला मार,’ अशी विनंती करू लागले, ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले, त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याला दिव्यरूप प्राप्त झाले. हरीणांनाही मूळचे स्वरूप मिळाले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले.”

।। श्रीशिवलीलामृत अध्याय दूसरा ॥

श्रीगणेशाय नमः

।। जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे मुक्ति मुक्ति सर्वकल्याणनाना संकटें विघ्ने दारुण । न वाधती कालत्रयी ||१|| संकेते अथवा हास्येंकरून । भलत्या मिसें घडो शिवस्मरण । न कळतां परिवासी लोह जाण संघटतां सुवर्ण करी कीं ||२|| न कळतां प्राशिले अमृत। परी अमर करी की वथार्थ। औषधी नेणतां भक्षीत। परी रोग सत्य हरी की ||३|| शुष्कतृष्णपर्वत अद्भुत। नेणतां बाळक अकस्मात। अग्निस्फुल्लिंग टाकीत । परी भस्म यथार्थ करी कीं ।।४।। तैसें न कळतां घडे शिवस्मरण। परी सकळ दोषां होय दहन। अथवा विनोदेंकरोन। शिवस्मरण घडो कां ।।५।।

हे कां व्यर्थ हांका फोडिती। शिव शिव नामें आरडती । अरे कां हे उगे न राहती। हरहर गर्जती वेळोवेळां ।।६।। शिवनामाचा करिती कोल्हाळ । माझें उठविलें कपाळ। शिव शिव म्हणतां वेळोवेळ । काय येतें यांच्या हाता ।।७।। ऐसी हेळणा करी क्षणोक्षणीं। परी उमावल्लभनाम ये वदनीं। पुत्रकन्यानामेकरूनी । शिवस्मरण घडो कां ।।८।। महाप्रीतीनें करितां शिवस्मरण। आदरें करितां शिवध्यान।शिवस्वरूप मानूनि ब्राह्मण। संतर्पण करी सदा ।।९।। ऐसी शिवीं आवडी धरी। त्याहीमाजी आली शिवरात्री। उपवास जागरण करी। होय बोहरी महत्पापा ।।१०।। ते दिवशीं बिल्वदळें घेऊन । यथासांग घडले शिवार्चन। तरी सहस्रजन्मींचें पाप संपूर्ण। भस्म होऊनी जाईल ।।११।।

नित्य बिल्वदळे शिवासी वाहत। त्याएवढा नाहीं पुण्यवंत । तो तरेल हें नवल नव्हे सत्य। त्याच्या दर्शनें बहुत तरती ।।१२।। प्रातः काळीं घेतां शिवदर्शन। यामिनीचे पाप जाय जळोन। पूर्वजन्मींचे दोष गहन । माध्यान्हीं दर्शन घेतां नुरती ।।१३।। सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम । सप्तजन्मींचें पाप होय भस्म । शिवरात्रीचा महिमा परम। शेषही वर्णं शकेना ।।१४।। कपिलाषष्ठी अर्थोदय संक्रमण। महोदय गजच्छाया ग्रहण। इतुकेही पर्वकाळ ओवाळून। शिवरात्रीवरूनि टाकावे ।।१५।। शिवरात्रि आधींच पुण्यदिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष । त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाहीं ।।१६।। वसिष्ठ-विश्वामित्रादि मुनीश्वर। सुरगण गंधर्व किन्नर । सिद्ध चारण विद्याधर। शिवरात्रिव्रत करिताती ।।१७।। यदर्थी सुरस कथा बहुत। शौनकादिकां सांगे सूत। ती श्रोतीं ऐकावी सावचित्त । अत्यादरॅकरोनिय ।।१८।।

तरी मासांमाजी माघमास । ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस। मुख्य शिवरात्र जाणिजे ।।१९।। विंध्याद्रिवार्य एक व्याध। मृगपक्षिघातक परमनिषिद्ध। महानिर्दय हिंसक निषाद। केले अपराध बहु तेणें ।।२०।। धनुष्यबाण घेऊनि करी । पारधीस चालिला दुराचारी। पाश वागुरा कक्षेसी धरी। कवच लेत हरितवर्ण ||२१|| करी गोधांगुलित्राण । आणिकही हातीं शस्त्रसामग्री घेऊन। काननीं जाता शिवस्थान। शोभायमान देखिलें ||२२।। तंव तो शिवरात्रीचा दिन। यात्रा आली चहुंकडून । शिवमंदिर शृंगारून। शोभा आणिली कैलासींची ।।२३।। शुद्धरजततगटवर्ण। देवालय झळके शोभायमान । गगनचुंबित ध्वज पूर्ण। रत्नजडित कळस तळपताती ।। २४ ।।

मध्यें मणिमय शिवलिंग। भक्त पूजा करिती सांग। अभिषेकधारा अभंग । विप्र धरिती रुद्रघोषं ।।२५।। एक टाळ मृदंग घेऊन । सप्रेम करिती शिवकीर्तन । श्रोते करटाळी वाजवून । हरहर शब्दें घोष करिती ।।२६।। नाना परिमळद्रव्यसुवास । तेणें दशदिशा दुमदुमिल्याविशेष । लक्ष दीपांचे प्रकाश । जलजघोष घंटारव ||२७|| शशिमुखा गर्जती भेरी। त्यांचा नाद न माये अंबरीं। एवं चतुर्विध वाद्ये नानापरी । भक्त वाजविती आनंदें ||२८|| तों तेथें व्याध पातला । समोर विलोकी सर्व सोहळा। एक मुहूर्त उभा ठाकला। हांसत बोलिला विनोदें ।।२९।। हे मूर्ख अवघे जन । येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन । आंत दगड बाहेर पाषाण। देवपण येथे कैंचे ।। ३० ।। उत्तम अन्न सांडून । व्यर्थ कां करिती उपोषण । ऐसिया चेष्टा करीत तेथून । काननाप्रती जातसे ।।३१।।

लोक नामें गर्जती वारंवार । आपणही विनोदें म्हणे शिव हरहर । सहज सव्य घालोनि शिवमंदिर। घोर कांतार प्रवेशला ।।३२।। वाचेसी लागला तोचि वेध । विनोदें बोले शिव शिव शब्द। नामप्रतापें दोष अगाध । झडत सर्व चालिले ||३३|| घोरांदर सेवतां वन। नाढळतीच जीव लघुदारुण । तों वरुणदिग्वधूचें सदन । वासरमणि प्रवेशला ।।३४।। निशा प्रवर्तली सबळ । कीं ब्रह्मांडकरंडा भरलें काजळ । कीं विशाळ कृष्णकंबळ । मंडप काय उभारिला ।। ३५।। विगतधवा जेवीं कामिनी । तेवीं न शोभे कदा यामिनी। जरी मंडित दिसे उडुगणीं। परी पतिहीनरजनी ते ।। ३६।। जैसा पंडित गेलिया सभेतून। मूर्ख जल्पती पाखंडज्ञान। जेवीं अस्ता जातां सहस्रकिरण। उडुगणे मागे झळकती ||३७||

असो ऐशी निशा दाटली सुबद्ध। अवघा वेळ उपवासी निषाद। तों एक सरोवर अगाध । दृष्टीं देखिले शोधितां ||३८|| अनेक संपत्ति सभाग्यसदनीं । तेवीं सरोवरी शोभती कुमुदिनी। तटीं बिल्ववृक्ष गगनीं। शोभायमान पसरला ||३९|| योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन। तेवीं बिल्वडहाळिया गगर्नीहून । भूमीस लागल्या येऊन । माजी रविशशिकिरण न दिसे ।।४०।। त्यांत तम दाटलें दारुण । माजी बैसला व्याध जाऊन । शरासनीं शर लावून। कानाडी ओढोनि सावज लक्षी ।।४१।। दृष्टीं बिल्वदळें दाटलीं बहुत। तीं दक्षिण हस्ते खुडोनि टाकीत । तों तेथे पद्मजहस्तें स्थापित । शिवलिंग दिव्य होते ।।४२।।

त्यावरी बिल्वदळे पडत । तेणें संतोषला अपर्णानाथ। व्याधास उपवास जागरण घडत । सायास न करितां अनायासें ।।४३।। वाचेसी शिवनामाचा चाळा । हर हर म्हणे वेळोवेळां। पापक्षय होत चालला । पूजन स्मरण सर्व घडलें ।।४४।। एक याम झालिया रजनी। तो जलपानालागीं एक हरिणी। आली तेथे ते गर्भिणी। परम सुकुमार तेजस्वी ।।४५।। व्याध तिने लक्षिला दुरून। कृतान्तवत परम दारुण। आकर्ण ओढिला बाण। देखोनिया हरिणी बोलतसे ।।४६।। म्हणे महापुरुषा अन्यायाविण । कां मजवरी लाविला बाण। मी तंव हरिणी आहे गर्भिण। वध तुवां न करावा ।।४७।। उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान । वधितां दोष तुज दारुण। एक रथभरी जीव वधितां सान। तरी एक बस्त वधियेला ।।४८।।

शत बस्त वधितां एका वृषभहत्येचें पातका शत वृषभ तै गोहत्या देख। घडली शास्त्र वदतसे ।।४९।। शत गोहत्यांचे पातक पूर्ण। एक वधितां होय ब्राह्मण। शत ब्रह्महत्यांचे पातक जाण। एक स्त्री वधिलिया ।।५०।। शत स्त्रियांहूनि अधिका। एक गुरुहत्येचें पातका त्याहूनि शतगुणी देख। एक गर्भिणी वधिलिया ।।५१।। तरी अन्याय नसतां ये अवसरीं। मज मारिसी कां वनांतरी। व्याध म्हणे कुटुंब घरीं। उपवासी वाट पहात ।।५२।। मीही आजि निराहार। अन्न नाहींच अणुमात्र । परी मृगी होऊनि सुंदर। गोष्टी वदसी शास्त्रींच्या ।।५३।। मज आश्चर्य वाटतें पोटीं। नराऐशा सांगसी गोष्टी। तुज देखोनियां दृष्टी। दया हृदयीं उपजतसे ।।५४।।

पूर्वी तूं होतीस कोण।तुज एवढे ज्ञान कोठून। तूं विशाळनेत्री रूपलावण्य। सर्व वर्तमान मज सांगे ।।५५।। मृगी म्हणे ते अवसरीं। पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं। चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरीं। महाप्रयत्नें करूनियां ।।५६।। त्यांमाजी मी रंभा चतुर। मज देखोनि भुलती सुरवर। नाना तपें आचरोनि अपार । तपस्वी पावती आम्हांते ।।५७।। म्यां नयनकटाक्षजाळे पसरून । बांधिले निर्जरांचे मनमीन। माझिया अंगसुवासा वेधून। मुनिभ्रमर धावती ।। ५८।। माझें गायन ऐकावया सुरंग। सुधापानी धांवती कुरंग। मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग। स्वरूपें न मानी कोणासी ।।५९।। मद अंगी चढला बहुत । शिवभजन टाकिलें समस्त । शिवरात्रा सोमवार प्रदोषव्रत । शिवार्चन सांडिलें म्यां ।।६०।।

सोडोनियां सुधापान । करूं लागलें मद्यप्राशन। हिरण्यनामा दैत्य दारुण। सुर सोडोनि रतलें त्यासीं ।।६१।। ऐसा लोटला काळ अपार । मृगयेसी गेला तो असुर । त्या दुष्टासंगें अपर्णावर-। भजनपूजन विसरलें ।।६२।। मनास ऐसें वाटलें पूर्ण। असुर गेला मृगयेलागोन। इतक्यांत घ्यावें शिवदर्शन । म्हणोनि गेलें कैलासा ।।६३।। मज देखतां हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तूं परम पापिणी यथार्थ। मृगी होई मृत्युलोकीं ।। ६४ ।। तुझ्या सख्या दोघीजणी । त्या होतील तुजसवें हरिणी। हिरण्य असुर माझिये भजनीं । असावध सर्वदा ।।६५।। तोही मृग होऊनि सत्य । तुम्हांसींच होईल रत। ऐक व्याधा सावचित्त । मग म्यां शिव प्रार्थिला ।। ६६ ।।

हे पंचवदना विरूपाक्षा। सच्चिदानंदा कर्माध्यक्षा। दक्षमखदलणा सर्वसाक्षा। उःशाप देई आम्हांते ।।६७।। भोळा चक्रवर्ती दयाळ । उःशाप वदला पयःफेनधवल । द्वादश वर्षे भरतां तात्काळ । पावाल माझिया पदातें ।।६८।। मग आम्ही मृगयोनीं। जन्मलों ये कर्मअवनीं। तरी मी गर्भिणी आहें हरिणी। प्रसूतकाळ समीप असे ।।६९।। तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन । सत्वर येतें गर्भ ठेऊन । मग तूं सुर्खे घेई प्राण। सत्य वचन हैं माझें ।। ७० ।। ऐसें मृगी बोलली सावचित्त । त्यावरी तो व्याध काय बोलत । तूं गोड बोलसी यथार्थ। परी विश्वास मज न वाटे ।।७१।। नानापरी असत्य बोलोन । करावें शरीराचे संरक्षण। हे प्राणिमात्रास आहे ज्ञान । तरी तूं शपथ वर्दे आतां ||७२||

महत्पापें उच्चारून । शपथ वर्दे यथार्थ पूर्ण। यावरी ते हरिणी दीनवदन । वाहात आण ऐका ते ।।७३।। ब्राह्मणकुळीं उपजोन। जो न करी वेदशास्वाध्ययन। सत्यशीचवर्जित संध्याहीन। माझे शिरी पातक ते ।। ७४।। एक वेदविक्रय करिती पूर्ण। कृतघ्न परपीडक नावडे भजन। एक दानासी करिती विघ्न । गुरुनिंदाश्रवण एक करिती ।।७५।। रमावर उमावरांची निंदा । त्या पापाची मज होय आपदा। दान दिधले जे ब्रह्मवृंदा। हिरोनि घेती माघारें ।। ७६ ।। एक यतिनिंदा करिती। एक शाखें पहाती द्वैत निर्मिती। नाना भ्रष्टमार्ग आचरती। स्वधर्म आपला सांडूनियां ।।७७।। देवालयामाजी जाउनी। हरिकथापुराणश्रवणीं। जे बैसती विडा घेउनी। ते कोडी होती पापिये ।। ७८ ।।

जे देवळांत करिती स्त्रीसंभोग। कीं स्त्री-भ्रतारांसी करिती वियोग । ते नपुंसक होऊनि अभाग्य । उपजती या जन्मीं ।। ७९ ।। वर्मकर्मे निंदा करीत । तो जगपुरीषभक्षक काग होत। शिष्यांसी विद्या असोनि न सांगत। तो पिंगळा होत निर्धारं ।।८० ।। अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती। त्यानिमित्तं गंडमाळा होती। परक्षेत्रींच्या गाई वळूनि आणिती। ते अल्पायुषी होती या जन्मीं ।।८१ ।। जो राजा करी प्रजापीडन। तो या जन्मीं व्याघ्घ्र कां सर्प होय दारुण । वृथा करी साधुछळण । निर्वंश पूर्ण होय त्याचा||८२।। स्त्रिया व्रतनेम करीत । भ्रतारासी अव्हेरीत । धनधान्य असोनि वंचीत। त्या वाघुळा होती या जन्मीं ।।८३।। पुरुष कुरूप म्हणोनिया त्यागिती। त्या या जन्मीं बालविधवा होती। तेथेंही जारकर्म करिती । मग त्या होती वारांगना ।।८४।।

ज्या भ्रतारासी निर्भर्सिती। त्या दासी किंवा कुलटा होती। सेवक स्वामीचा द्रोह करिती । ते जन्मा येती श्वानाच्या ।।८५।। सेवकापासून सेवा घेऊन । त्यांचे न दे जो वेतन । तो अत्यंत भिकारी होऊन । दारोदारीं हिंडतसे ।।८६।। स्त्री-पुरुष गुज बोलतां। जो जाऊनि ऐके तत्त्वतां । त्याची स्त्री दुरावे हिंडतां । अन्न न मिळे तयातें ।। ८७ ।। जे जारण मारण करिती । ते भूत प्रेत पिशाच होती। यती उपवासें पीडिती। त्यांतें दुष्काळ जन्मवरी ।।८८।। स्त्री रजस्वला होऊनी। गृहीं वावरे जे पापिणी। पूर्वज रुधिरीं पडती पतनीं । त्या गृहीं देव-पितृगण न येती ।।८९।। जे देवाच्या दीपाचें तेल नेती। ते या जन्मीं निपुत्रिक होती। ज्या रांधितां अन्न चोरोनि भक्षिती । त्या मार्जारी होती या जन्मीं ।।९०।।

ब्राह्मणांस कदन्न घालून । आपण भक्षिती षड्रस पक्वान्न । त्यांचे गर्भ पडती गळोन। आपुलिया कर्मवशें ।॥९१।। जो माता-पित्यांसीशिणवीत। तो ये जन्मीं मर्कट होत। सासू-धशुरां स्नुषा गांजीत। तरी बालकन न वांचे तियेचे ||९२।। मृगी म्हणे व्याधालागून। जरी मी न ये परतोन। तरी ही महत्पापें संपूर्ण। माझ्या माथां बेसोत ||९३|| हे मिथ्या गोष्ट होय साचार। तरी घडो शिवपूजेचा अपहार। ऐसी शपथ ऐकतां निर्धार। व्याध शंकला मानसीं ।।९४।। म्हणे पतिव्रते जाईं आतां। सत्वर येई निशा सरतां। हरिणी म्हणे शिवपदासी तत्त्वतां । पुण्यवंता जाशील ।।९५।। उदकपान करूनि वेगीं। निजाश्रमा गेली ते कुरंगी। इकडे व्याध दक्षिणभागीं। टाकी बिल्वदळे खुडूनियां ।।९६।। दोन प्रहर झाली यामिनी। द्वितीय पूजा शिवें मानुनी। अर्धपाप जळाले मुळीहुनी। सप्तजन्मींचें तेधवां ।। ९७ ।।

नामीं आवड जडली पूर्ण। व्याध करी शिवस्मरण। मृगीमुखें ऐकिलें निरूपण। सहज जागरण घडलें तया ।।९८।। तों दुसरी हरिणी अकस्मात । पातली तेथे तृषाक्रांत । व्याधं बाण ओढितां त्वरित । करुणा भाकी हरिणी ते ।।९९।। म्हणे व्याधा ऐक ये समयीं। मज कामानळे पीडिलें पाहीं। पतीस भोग देऊनि लवलाहीं। परतोनि येतें सत्वर ।।१००।। व्याध आश्चर्य करी मनांत । म्हणे शपथ बोलोनी जाईं त्वरित ।धन्य तुमचें जीवित्व । सर्व शास्त्रार्थ ठावुका ||१|| वापी तडाग सरोवर । जो पतित मोडी देवागार। गुरुनिंदक मद्यपानी दुराचार। तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ||२|| महाक्षत्रिय आपण म्हणवीत। समरांगणीं मागे पळत । वृत्ति हरी सीमा लोटीत। ग्रंथ निंदीत महापुरुषांचे ।।३।। वेदशास्त्रांची निंदा करी। संत भक्तांसीं द्वेष धरी। हरि हरचरित्रे अव्हेरी। माझे शिरीं तीं पायें ।।४।।

धनधान्य असोनि पाहीं। पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं। पति सांडोनि निजे परगृहीं। ती पापें माझिया माथां ।।५।। पुत्र स्नुषा सन्मार्गे वर्ततां । त्यांसी व्यर्थचि गांजिती न पाहतां । ते कुरूप होती तत्त्वतां । हिंडतां भिक्षा न मिळेचि ।।६।। बंधु-बंधु जे वैर करिती । ते या जन्मीं मत्स्य होती। गुरूंचे उणें जे पाहती। त्यांची संपत्ति दग्ध होय ।।७।। जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती । ते अतिशूद्र प्रेतवखें पांघरती। आम्ही तपस्वी म्हणोनियां अनाचार करिती। ते घुले होती मोकाट ।।८।। दासी स्वामीची सेवा न करी । ती ये जन्मीं होय मगरी। जो कन्याविक्रय करी। हिंसकयोनीं निपजे तो ||९|| स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजीत । त्याचा गृहभंग होत । जन्मजन्मांतरीं न सुटे।।११०।।

ब्राह्मण करी रसविक्रय। घेता देता मद्यपी होय। जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे। तो होय ब्रह्मराक्षस ।।११।। एके उपकार केला। जो नष्ट नाटयी त्याला। तो कृतघ्न जंत झाला। पूर्वकमें जाणिजे ||१२|| विप्र श्रार्दी जेवुनी। स्त्रीभोग करी ते दिनीं। तो श्वानसूकरयोनीं। उपजेल निःसंशये ।।१३।। व्यवहारी दहांत बैसोन। खोटी साक्ष देई गजॉन । पूर्वज नरकी पावती पतन। असत्य साक्ष देतांचि ।।१४।। दोघी स्त्रिया करून । एकीचेच राखी जो मन। तो गोचिड होय जाण । सारमेयशरीरीं ।।१५।। पूर्वजन्मीं कोंडी उदका त्याचा मळमूत्र निरोध देख। करितां साधुनिंदा आवश्यका सत्वर दंत मग्न होती ।।१६।। देवालयीं करी भोजन। तरी ये जन्मीं होय क्षीण। पृथ्वीपतीची निंदा करितां जाण। उदरीं मंदाग्नि होय पैं ।।१७।।

ग्रहणसमयीं करी भोजन। त्यासी पित्तरोग होय दारुण। परबाळे विकी परदेशीं नेऊन । तरी सर्वांगी कुष्ठ भरे ।।१८।। जी स्त्री करी गर्भपातन । ती उपजे वंध्या होऊन । देवालय टाकी पाडून । तरी अंगभंग होय त्याचा ||१९|| अपराधाविण स्त्रीसी गांजिताहे। त्याचें ये जन्मीं एक अंग जाये। ब्राह्मणाचें अन्न हरिती पापिये। त्यांचा वंश नवाढे कर्धी ।।१२०।। गुरु संत माता पिता । त्यांसी जो होय निर्भत्सिता । तरी वाचा जाय तत्त्वतां । अडखळे बोलतां क्षणाक्षणां ||२१|| जो ब्राह्मणांसी दंड मारी। त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं। जो संतांसी वादविवाद करी। दीर्घ दंत होती त्याचे ||२२|| देवद्वारींचे तरुवर। अश्वत्थादि वृक्ष साचार। तोडितां पांगुळ होय निर्धार। भिक्षा न मिळे हिंडतां ||२३||

जो सूतकअन्न भक्षित। त्याचे उदरीं नाना रोग होत। आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त । तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ||२४|| ब्राह्मणाचें ऋण न देतां । तरी बाळपर्णी मृत्यू पावे पिता। जलवृक्षछाया मोडितां । तरी एकही स्थळ न मिळे त्यातें ।। २५।। ब्राह्मणासी आशा लावून । चाळवी नेदी कदा दान। तो ये जन्मी अन्न अन्न। करीत हिंडे घरोघरीं ।। २६ ।। जो पुत्रद्वेष करीत। आणि दरिद्रियाचे लग्न मोडीत। तरी स्त्रीस सल राहे पोटांत । वंध्या निश्चित संसारी ||२७|| जेणें ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसें ताडी सूर्यनंदन। जो नायके कथाग्रंथ पावन । बधिर होय जन्मोजन्मीं ||२८|| जो पीडी माता-पितयांस । त्याचा सर्वदा होई कार्यनाश। एकास भजे निंदी सर्व देवांस। तरी एकचि पुत्र होयत्यासी ।।२९।। जो चांडाळ गोवध करी। त्यासी मिळे कर्कशा नारी। वृषभवधितां निर्धारीं। शतमूर्ख पुत्र होय त्यासी ।।१३०।।

उदकतृर्णेवीण पशु पतिव्रतेसी भोगू इच्छित। तरी मारीत। तरी मुक्याच प्रजा होती समस्त । जो कुरूप नारी कर्कशा मिळे ।।३१।। जो पारधी बहु जीव संहारी। तो फॅपरा होय संसारी। गुरूचा त्याग जो चांडाळ करी। तो उपजतांचि मृत्यू पावे ||३२|| नित्य अथवा रविवारीं मुते रवीसमोर। त्याचे बाळपणीं दंत भन्न केश शुभ्र । जे मृत बाळासाठीं रुदती निर्धार। त्यांस हांसता निपुत्रिक होय ||३३|| हरिणी म्हणे व्याधालागून। मी सत्वर येतें पतीस भोग देऊन । न ये तरी हीं पायें संपूर्ण । माझ्या माथां बैसोत पैं ।। ३४ ।। व्याध मनांत शंकोन । म्हणे धन्य धन्य तुमचें ज्ञान। सत्वर येई गृहास जाऊन । सत्य संपूर्ण सांभाळीं ।॥३५॥ जलपान करोनि वेगीं। आश्रमा गेली ते कुरंगी। तों मृगराज तेच प्रसंगीं। जलपानार्थ पातला ।। ३६ ।। व्याधें ओढिला बाण। तों मृग बोले दीनवदन। म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण । त्यांसी पुसोन येतों मी ।। ३७ ।। शपथ ४ तो कधारंग मोडिता निर्वंश होत। तें ऐकै त्वरित । कीर्तन करिती प्रेमळ भक्ता

पाप सत्य मम माथां ||३८|| ब्रह्मकर्म वेदोक्ता शूद्र निजांगे आचरत। तो अधम नरकीं पडत । परधर्म आचरतां ।।३९।। तीर्थयात्रेसी विघ्नें करी। श्र वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी। तरी सर्वांगीं व्रण अघोरी। नरकीं पडे कल्पपर्यंत ।।१४०।। शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण । कूटकविता करी क्षुद्र लक्षून। हरिती ब्राह्मणांचा मान। तरी संतान तयांचें न वाढे ।।४१।। हरिदिनीं शिवदिनीं उपोषण। विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण। तरी हस्त-पाद क्षीण। होती त्याचे निर्धारं ।।४२।। एक शिवहरिप्रतिमा फोडिती। एक भगवद्भक्तां विघ्नें करिती । एक शिवमहिमा उच्छेदिती। नरकीं होती कीटक ते ।।४३।। मातृद्रोही त्यासी व्याधी भरे। पितृद्रोही पिशाच विचरे। गुरुद्रोही तत्काळ मरे । भूतप्रेतगणी विचरे तो ।।४४।। विप्र आहार बहुत जेविती । त्यांस जो हांसे दुर्मती। त्याचे मुखीं अरोचक रोग निश्चितीं । न सोडिती जन्मवरी ।।४५।।

एक गोविक्रय करिती। एक कन्याविक्रय अर्जिती। ते नर मार्जार मस्त होती। बाळें भक्षिती आपुलीं ।।४६।। जो कन्या भगिनी अभिलाषी। कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी। प्रमेह रोग होय त्यासी। कीं खडा गुह्यांत दाटत ।।४७।।प्रासादभंग लिंगभंग करी। देवांची उपकरणे अलंकार चोरी। देवार्मा अव्हेरी। पंडुरोग होय तेथे ।।४८ ।। एक मित्रद्रोह विश्वासघात करिती। मा पितृहत्या गुरूसी संकटी पाडिती। ब्रह्मवध गोवध न वारिती। अंगीं साम असोनियां ।।४९।। ब्राह्मण बैसवोनि बाहेरी। उत्तमान्न जेविती गृहांतरे सोयऱ्यांची प्रार्थना करी। संग्रहणी पोटशूळ होती तया ।।१५०।। एक कर्मग्रा पंचयज्ञ न करिती । एक ब्राह्मणांची सदने जाळिती। एक दीनासी मार्ग नागविती। एक संतांचा करिती अपमान ||५१||

एक करिती गुरुछळण। एक म्हणती पाहों याचे लक्षण । नाना दोष आरोपिती अज्ञान। त्यांचे संतान न वाढे ।।५२।। जो सदा पितृद्वेष करी। जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी। शिवकीर्तन ऐकतां त्रासे अंतरीं। तरी पितृवीर्य नव्हे तो ।।५३।। शिवकीर्तनीं नव्हे सादर। तरी कर्णमूळरोग निर्धार। नसत्याच गोष्टी जल्पे अपार। तो दर्दुर होय निर्धार ।।५४।। शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण । तेथें शयन करितां सर्प होय दारुण। एक अतिवादक छळक जाण। ते पिशाचयोनी पावती ।।५५।। एका देवार्चनीं वीट येत। ब्राह्मण पूजावया कंटाळत । तीर्थप्रसाद अव्हेरीत । त्याच्या आंखुडती अंगशिरा ।।५६।। मृग म्हणे ऐसीं पापे अपार। मम मस्तकीं होईल परम भार। मग पारधी म्हणे सत्वर। जाई स्वस्थाना मृगवर्या ।।५७।। व्याध शिवनामें गर्जे ते क्षणीं। कंठ सद्गदित अश्रु नयनीं। मागुती बिल्वदळे खुडोनी। शिवावरी टाकीतसे ।। ५८ ।।

चौप्रहरांच्या पूजा चारी। संपूर्ण झाल्या शिवजागरीं। सप्तजन्मींचीं पायें निर्धारीं। मुळींहूनी भस्म झार्ली ।।५९।। तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळीत । सुपर्णाग्रज उदय पावत। आरक्तवर्ण शोभा दिसत । तेंचि कुंकुम प्राचीचें ।।१६०।। तंव तिसरी मृगी आली अकस्मात। व्याध देखिला कृतान्तवत । म्हणे मारूं नको मज यथार्थ। बाळांसी स्तन देऊनि येतें मी ।।६१।। व्याध अत्यंत हर्षभरित । म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ। तो ऐकावया म्हणत । शपथ करूनि जाय तूं ।। ६२ ।। यावरी मृगी म्हणे व्याधा ऐका जो तृणदाहक ग्रामदाहका गोब्राह्मणांचे कोंडी उदका क्षयरोग त्यासी न सोडी ।।६३।। ब्राह्मणांचीं सदने हरिती देख । त्यांचे पूर्वज रौरर्वी पडती निःशंका मातृ-पुत्रा विघडती एका स्त्रीपुरुषां विघड पाडिती ।।६४।। देव-ब्राह्मण देखोन। खालती न करिती कदा मान। निंदिती बोलती कठोर वचन ।यम कर-चरण छेदी तयांचे ॥६५।।

परवस्तु चोरावया देख। अखंड लाविला असे रोख। साधुसन्माने मानी दुःख। त्यास नेत्ररोगतिङका न सोडिती ॥६६ महिष होती। पुस्तकचोर ते मुके होती। रत्नचोरांचे नेत्र जाती। अत्यंत गर्मी ते पारधी निश्चित श्येनपक्षी ।।६७।। भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित। जो माता-पितयांसी ताडित। तुला होत यालागीं ।॥६८॥जा अत्यंत कृपण। धन न वेंची अणुप्रमाण। तो महाभुजंग होऊन। घुसघुमीत बैसे तेथे ।।६९।। भिक्षेसी यतीश्वर आला। तो जेणें रिता दवडिला। शिय त्यावरी जाण कोपला। संतति संपत्ति ध होय ||१७०।। ब्राह्मण बेसला पात्रावरी। उठवूनि घातला बाहेरी। त्याहूनियां दुराचारी। दुसरा कोणी नसेचि ।।७१।।

ऐसा धर्माधर्म ऐकोन। पारधी सद्गद बोले वचन । स्वस्थळा जाई जलपान करोन। बाळांसी स्तन देऊन येई ॥७२।। ऐसे ऐकोनि मृगी लवलाह्यां। गेली जलप्राशन करूनियां। बाळे स्तनीं लावूनियां। तृप्त केलीं तियेने ॥७३।। वडील झाली प्रसूत। दुसरी पतीची कामना पुरवित । मृगराज महणे आतां त्वरित। जाऊं चला व्याधापासीं ॥७४।। मृग पाडसांसहित सर्वही। व्याधापासीं आलीं लवलाहीं। मृग म्हणे ते समयीं। आधीं मज वधीं पारधिया ।।७५।। मृगी म्हणे हा नव्हे विधी। आम्ही जाऊं पतीच्या आधीं। पाडसें म्हणती त्रिशुद्धी। आम्हांसी वीं पारधिया ।।७६।। त्यांचीं वचने ऐकतां ते क्षणीं। व्याध सद्गद झाला मनीं। अश्रुधारा लोटल्या नयनीं। लागे चरणीं तयांच्या ।। ७७।।

म्हणे धन्य जिणें माझें झालें। तुमचेनि मुखें निरूपण ऐकिलें। बह‌ता जन्मींचें पाप जळालें। पावन केलें शरीर ।। ७८ ।। माता पिता गुरु देव। तुम्हीच आतां माझे सर्व। कैंचा संसार मिथ्या वाव। पुत्र-कलत्र सर्व लटकें ।। ७९।। व्याध बोले प्रेमेंकरून । आतां कधीं मी शिवपद पावेन। तो अकस्मात आलें विमान । शिवगण बैसले त्यावरी ||१८०।। पंचवदन दशभुज। व्याघ्रांबर नेसले महाराज । अद्भुत तयांचे तेज। दिक्चक्रामाजीं न समाये ।।८१।। दिव्य वाद्ये वाजविती किन्नर । आलाप करिती विद्याधर। दिव्य सुमनांचे संभार। सुरगण स्वयं वर्षती ।।८२।। मृगें पावर्ती दिव्य शरीर। व्याध करी साष्टांग नमस्कार। मुखें म्हणे जय जय शिव हर हर। तो शरीरभाव पालटला ।।८३।। परिसीं झगटतां लोह होय सुवर्ण। तैसा व्याध झालादशभुज पंचवदन। शिवगणीं बहुत प्रार्थन। दिव्य विमानीं चैसविला ।।८४।।

मृगें पावर्ती दिव्य शरीर। तीही विमानी आरूढली समग्र । व्याधाची स्तुती वारंवार। करिती सुरगण सर्वही ॥८५॥ व्याध नेला शिवपदाप्रती। तारामंडळीं मृर्गे राहती। अद्यापि गगनीं झळकती। जन पाहती सर्व डोळां ।।८६।। सत्यवतीहृदयरत्नखाणी। रसभरित बोलिला लिंगपुराणीं । तें सज्जन ऐकोत दिनरजनीं। ब्रह्मानंदेंकरूनिया पातक दग्ध होत। जे हैं पठण करिती सावचित्त । धन्य पुण्यवंत नर तेचि ।।८७।। धन्य ते शिवरात्रिव्रत । श्रवणे ।।८८।। सज्जन श्रोते निर्जर सत्य । प्राशन करोत शिवलीलामृत। निंदक असुर कुतर्की बहुत । त्यांस प्राप्त कैंचें हैं ।।८९।। कैलासनाथ ब्रह्मानंद। तयाचे पदकल्हार सुगंध । तेथे श्रीधर अभंग षट्पद। रुंजी घालीत शिवनामें ।।१९०।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड। परिसोत सज्जन अखंड। द्वितीयाध्याय गोड हा ।।१९१।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।

।। शुभं भवत् ।।

Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi:‘ १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

Shivleelaamrit Adhyay 2 In Marathi: आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

 accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

https://marathionlinetimes.com/uncategorized/shree-gajanan-leela-gatha-7-adhyay/embed/#?secret=8adMYaXqEF#?secret=TKNkGzkzua

Loading