Shree Gajanan Leela Gatha 9 Adhyay: श्री गजानन लीला गाथा ९ अध्याय (लहान पोथी)

Shree Gajanan Leela Gatha 9 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा नववा अध्याय

Shree Gajanan Leela Gatha 9 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा नववा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.

अध्याय नववा

श्रीगणेशाय नमः 

।। श्री ज्ञानेश्वर माऊली। भक्त जनांची साऊली ।। शरण आलो आपुली । कृपा असो मजवरी ।।१।। तू संतात सर्वश्रेष्ठ । संतशिरोमणी म्हणतात ।। लहान असूनी जगतात । दिगंत कीर्ती जाहली ।।२।। निवृत्तीला गुरु केले। गीता ज्ञान गायीले ।। गीर्वाण प्राकृती आले। ज्ञानोबा तव कृपेने ।।३।। येथील सर्व समाज । विप्रांवरी नाराज ।। उध्दाराचे मार्ग सहज । म्हणे त्यांनी बंद केले ।।४।। परी तुवा बंड केले। ज्ञानगंगेचे पाट काढीले ।। सर्वांसाठी खुले केले। तीर्थ ईशकृपेने ।।५।। त्यामुळे चमत्कार । घडून आले अपार ।। तुकोबा, नामदेव, गोरा कुंभार । थोर संत जाहले ।।६।। बहुत संताची मांदियाळी । भरत भू जन्मा घाली ।। त्यांनी या भूमंडळी । स्वर्ग सुख आणिले ।।७।।

म्हणूनी माऊली १९ तुझी कीर्ती। गातो मी मूढमती ।। देऊनिया प्रेरणा चित्ती । गजानन चरित्र वदवावे।।८।। गोविंदबुवा टाकळीकर । श्रेष्ठ होते कीर्तनकार ।। गावोगावी हरिनाम गजर । यज्ञ त्यांनी मांडिला ।।९।। त्यांचा घोडा नाठाळ । कसा करावा प्रतिपाळ ।। गोविंदुवा खरोखर । कंटाळुनी गेले हो ।।१०।। असेच एकदा कीर्तनासी । बुवा पातले शेगावाती ।। उत्तररात्री झोपण्यासी। गेले असती मुक्कामी ।।११।।

घोडा उमा बाहेर । बुवा मनी काहूर ।। स्थिर न हा राहिला जर। काय करावे म्हणोनि ।।१२।। रात्रीच्या त्या शांत वेळी। गजानन आले घोडयाजवळी ।। त्या अश्वाच्या चौखुरी । त्यांनी पथारी पसरली ।।१३।। आणि ऐसा चमत्कार । घडून आला सत्वर ।। नाठाळ घोडा वठणीवर । आपोआप आला असे ।।१४।। गुरु सान्निध्य परिस । अश्व लोहासी होता स्पर्श ।। सद्‌गुणरुपी सोन्यास । प्रगटणे भाग झाले की ।।१५।। बुवा बघता उठोनी । त्यास दिसले कैवल्यदाणी ।। घोडा सुधारला जागोनी। साष्टांग प्रणिपात केलासे ।। १६ ।। गजाननाची स्तुती केली ।

त्यांच्या कृपेची प्रचिती आली ।। गोविंद बुवाची निमाली । काळजी एक सहज पहा ।।१७।। बाळापुरचे द्विजद्वय । बघुनिया निजसोय ।। दर्शनाची येता सय । शेगावासी पातले ।।१८।। गुरु पुढे नमन करिता । गांजा आणू म्हणती येता ।। वारीसाठी पुन्हा येता । विसरुनिया गेले ते ।।१९।। एकदा ना दोनदा । असेच झाले सर्वदा ।। गुरु पुसती कितिकदा । होणार असे सांगावे ।।२०।। त्यांच्या मनी खंत फार । गुरु जाणिती अंतर ।। कृपा होता अपार । धन्य जगी झाले ते ।।२१।। बाळाभाऊ विप्र एक । बाळापुरी राहे देख ।। सज्जनगडासी हरेक । वर्षी वारीस जातसे ।। २२ ।।

अनेक वर्षे सेवा झाली । काया त्याची शिणली ।। नमुनिया समर्थ माऊली । म्हणे येणे कठीण आता ।।२३।। पत्नीसह दरवर्षी । येतसे मी वारीसी ।। आता न जमेल मजसी । म्हणोनी खेद करी तो ।।२४ ।। ४१ समर्थ आले स्वप्नात । म्हणती राहे बाळापुरात ।। मीच तेथे निश्चित । उत्सवासीयेईन ।।२५।। ऐसी त्याला भाक दिली । त्या योगे कळी खुलली ।। पुढील वर्षी त्याने केली । उत्सवाची तयारी ।। २६ ।। समर्थांची पहात वाट। बसला असता अवचित ।। जय जय रघुवीर समर्थ म्हणत । गजानन दारी पालला ।। २७ ।।

त्याला वाटले समर्थ आले। दारी गजानन गुरु देखिले ।। मनी चिंतीता पाहिले । रामदास स्वामीना ।।२८ ।। गजानन नाही रामदास । बाळाभाऊ मनी हर्ष ।। निरखुनिया बघता त्यास । गजानन मूर्ती समोरी ।।२१।। बाळाभाऊ घोटाळला । कशाचा ना अर्थ कळला ।। हात धरूनी तयाला । गुरु गृहात नेताती ।। ३० ।। – समर्थ मानूनी गजाननाचे । पूजन केले मनोवाचे ।। त्याच्या मनी आनंदाचे। उधाण सदा येत असे ||३१|| स्वप्नी शंका दूर केली। समर्थ कृपेची प्रतीति आली ।। मी, गजानन माऊली। एकच बोले रामदास ।। ३२ ।। बाळाभाऊच्या भक्तीला । पारावार नाही उरला ।। गजानन क्या झाली त्याला । भाग्यवान नर तो ।। ३३ ।। तशी कृपा गुरुनाथा । वाचकावरी करी आता ।। मजलाही देऊनि हाता । मुक्त जगी करावे ।।३४ ।।

इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ नवमोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।

Shree Gajanan Leela Gatha 9 Adhyay:१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Shree Gajanan Leela Gatha 9 Adhyay:तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

 accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

Shree Gajanan Leela Gatha 9 Adhyay: श्री गजानन लीला गाथा ७ अध्याय (लहान पोथी)

Loading