Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा पंधरावा अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा पंधरावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय पंधरावा
श्रीगणेशाय नमः
।। नमन माझे रघुराया । नमन माझे कौसल्या तनया ।। नमन माझे रामासखया । करी कृपा मजवरी ।।१।। रामा तू रघुनंदन | दशरथ कौसल्या जीवप्राण ।। कैकयी सुमित्रा तुज लागोन । क्षणभरी न विसंबती ।।२।। तुझे होण्या दर्शन । तप करीती मुनिजन ।। नेति नेति म्हणोन । हात टेकिती अखेरी ।।३।। पुत्र असावा तुझ्या सम । पिता बंधु तुझ्यासम ।। मित्र असावा तुझ्यासम । शत्रुही तुझ्यासम असावा ।।४।। सर्व नात्यात आदर्श । वर्तनात तू आदर्श ।। तुझ्या चिंतने उत्कर्ष । सहज होतसे सर्वांचा ।।५।। रामा तुला विनंती । स्थिर राहो माझी मती ।। तव चिंतनी रमो ती। गोडी तव नामी असो दे
।। ६ ।। विसर तव नामाचा । कधी न मला पडो साचा ।। तव नामे मम वाचा | सदैव शुध्द असावी ।।७।। शुध्द असावे अंतःकरण । पवित्र असावे जीवन ।। कधी कोणाचा अवमान । घडू नवे गम हस्ते ।1८।। अवगुण अवघे लोपावे । सदगुणांनी पुढती यावे ।। सत्त्वगुणांनी धावावे । मला भेटवावा श्रीराम ।।९।। असो बहु विनवणी । करीतसे करुणा वथनी ।। गजानन चरित्र गायनी । साहाय्यभूत व्हावे तू ।।१०।। लो. टिळक एकवेळ । शिवजयंती साधून वेळ ।। अकोल्यास काही काळ । येऊनिया गेले हो ।।११।।
संधी त्यांच्या दर्शनाची । वन्हाड वासियांना खचितची ।। आली चालून भाषणाची। जन सर्व आनंदले ।।१२।। गजाननाला व्याख्यानाचे | निमंत्रण ते द्यावे साचे ।। ऐसे मत काही जणांचे। त्या समयी पडले हो ।।१३।।कोणी त्यास विरोध केला। कोणी म्हणती बोलवा त्याला ।। बाळ गंगाधर टिळकाला आशीर्वाद लाभो दे ।।१४।। उत्साहाने मंडळी । शेगावासी येती झाली ।। समर्थ सांगती हर्षभरी। आम्ही येऊ अवश्य ।।१५।। शिवजयंती उत्सवाला । सारा होता गाव जमला ।। गजानन गुरुही सभेला । उपस्थित होते की ।।१६।। टीका केली टिळकांनी। कळली संतालागोनी ।। आनंदले बहु मनी। परी शिक्षा टिळकाला ।।१७।।
ब्रम्हदेशी मंडाल्यास । टिळका धाडिले शिक्षेस ।। तेथेच लिहिले गीतारहस्य । अलौकिक ग्रंथ तो ।।१८।। या ग्रंथाने टिळकांना । जगदगुरुचा मान मिळाला ।। ज्ञानी वाचूनी टीकेला । धन्य धन्य म्हणताती ।।१९।। शिक्षा नव्हे वरदान । वाटे टिळकाकारण ।। त्यांनी अर्जुनी तन मन ग्रंथ पूर्ण केला तो ।।२०।। काळे श्रीधर गोंविद । गरीब होता उदंड ।। नोकरी साठी अखंड । वणवण त्यांची चालतसे ।।२१।। कोल्हापुरी निवास । मित्र त्याचा भंडाऱ्यास ।। जाई त्या गावास । मित्रालागी भेटावया ।। २२ ।।
कोल्हापुरी परतता। शेगावी आले दर्शनाकरिता ।। गजानन पायी माथा । भक्तिभावे नमविला ।।२३।। गुरु जाणली मन त्याचे। त्याला होते जायचे ।। विलायतेला, अभ्यासाचे | कारण होते त्याकडे ।। २४।। नको जाऊ, गुरु त्याला । करीताती उपदेशाला ।। श्रीधर पुढे एम. ए झाला। गजाननाच्या कृपेने ।।२५।। नोकरी कॉलेज प्राचार्याची | श्रीधरास मिळे साची ।। तेणे वृत्ती अवधिची। आनंदमय जाहली ।।२६ ।। असे हे गजानन चरित्र । ग्रंथात श्रेष्ठ परमपवित्र ।। याते जो नियमे वाचित | त्यास भेटती ऋध्दी सिध्दी ।। २७ ।।
इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ पंचदशोऽध्यायः समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay: श्री गजानन लीला गाथा १४ अध्याय (लहान पोथी)
Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay:
Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay: श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)
‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !
Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay: १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
Shree Gajanan Leela Gatha 15 Adhyay: accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!