Shree Gajanan Leela Gatha 16 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा सोळावा अध्याय!
Shree Gajanan Leela Gatha 16 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा सोळावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय सोळावा
श्रीगणेशाय नमः
।। नमन तुला कृष्ण मुरारी। गोकुळीचा पुतनारी ।। स्वलीलेने प्रजा सारी । भक्ती रंगी रंगविली ।।१।। स्वर तुझ्या मुरलीचा । पडता कानी गोपिकांच्या ।। शरीरातून भक्तीचा। पूर लोटू लागतसे ।।२।। गोपिकांना वेडे केले। गोपालांना सखे केले ।। भाग्य त्यांचे उदया आले। देव सदेह मिळाला ।। ३।। धन्य ती देवकीमाता । धन्य धन्य यशोदा माता ।। वसुदेव आणि नंदताता । भाग्यवान दोघेही ।।४।। धन्य धन्य ती गोकुळनगरी। धन्य धन्य जनता सारी ।। वैकुंठीचा सुदर्शन धारी । त्यांच्यासवे बागडला ।। ५।।
असे अलौकिक भाग्य देवा । मला त्याचा लाभ व्हावा ।। जन्मो जन्मो तुझी सेवा । मम हस्ते घडावी ।।६ ।। आकोल्यासी जवाहिर । राहत होता नामे कवर ।। त्यासी दोन जबाबदार । पुत्र असती पहा हो ।।७।। त्यातीलच एक सुत । गजाननाचा असेभक्त ।। वास्तव्य हैदराबादेत । डॉक्टर होणे असे त्याला ।।८ ।। तो भाऊ एकदा सुटीसाठी। गायी येई घर गाठी।। मनी म्हणे उठाउठी। जाऊन यावे शेगावी ।।९।। गजाननाला मोजनासी। न्यावे वाटे अतिहर्षी ।। परी हे सांगावे कोणासी । प्रश्न गनी पडलेला ।।१०।।
त्या भाऊस नव्हती आई। पिता वृध्द बहिण नाही ।। वडील बंधूची पत्नी येई। परी तिथे अचानक ।।११।। हसून पाहे दीराकडे । म्हणे कां हो तोंड वाकडे ।। एवढे कसले साकडे । पडले ते मज कळू द्या ।।१२।। वहिनीला मनातली। इच्छा त्याने सांगितली ।। ती ही आनंदे लागली । स्वयंपाक तो करण्याला ।। १३।। घेतल्या भाकरी आणि चून । धावत धावत निधे जाण ।। गाठले रेल्वे स्टेशन। परी न गाडी मिळाली ।। १४।। भाऊ मनी खेतावला । पुढील गाडीने मठी आला ।। गुरु थांबले भोजनाला । भाऊ मनी खजिल तो ।। १५ ।। त्याची भाकरी आणि पिठले ।गजानने फरत कैले ।। म्हणे होते मस्त झाले । प्रसाद सर्वा मिळाला ।।१६।।
गुरु बघती मनोभाव । उपरेपणांस नसे वाव ।। भाऊचा जाणूनी भाव। पोटी त्या आलिंगिले ।।१७।। मुंडगावी पुंडलिक। फार होता भाविक ।। गजानन देव एक । मनोमनी मानितसे ।।१८ ।। त्याच गावी भागाबाई। राहातसे एक बाई ।। मन न कदा स्थिर होई। सैरावैरा धावतसे ।।१९।। तिने अनेक गुरु केले। परी न सुख लाभले ।। पुंडलिकासी विचारीले । गुरु कोण म्हणोनी ।।२० ।। म्हणे अंजनगावी जाऊ । काशीनाथा नेत्री पाहू ।। उपदेशही त्यांचा घेऊ । गुरु करु तयाला ।।२१।। पुंडलिक “हो” म्हणाला । स्वप्नी जाशी अंजनगावाला । कशासाठी प्रश्न करी ।। २२ ।। गजानन गुरु आला ।। पुंडलिक निरुत्तर । गुरु देती उत्तर ।। त्याचे जाणोनी अंतर । देती स्व-पादुका ।। २३ ।। करी म्हणे पूजन । धन्य होई जीवन ।। जागा झाला भक्त आपण । म्हणे गुरु भेटले ।। २४।।
तोच आली कानी हाक । भागाबाई बोलवित ।। पुंडलिकाच्या मनी खत। म्हणे में भी येत नाही ।। २५ ।। श्यामसिंग मुंडगावचा। दर्शनार्थ श्रीगुरुच्या ।। शेगावी गेला होता साचा। परतणे होते त्यासी ।। २६ ।। त्याच्या पाशी पादुका । गुरु धाडती पुंडलिका ।। पुंडलिका मनी शंका। श्यामसिंगा पुसतसे ।। २७ ।। प्रसादाचा विषय निघता । श्यामसिंग देई पादुका ।। शिरी धरिल्या, पुंडलिका । अत्यानंद होत असे ।। २८ ।। मनोभावे पुजन। पुंडलिकाने केले जाण ।। धन्य भक्त धन्य धन्य । गुरुने तया रक्षिले ।। २९ ।। तुकाराम शेगोकार । कर्णी छरा जोरदार ।। वेदनेने बेजार । गुरुपिडा वारिती ।।३० ।। ऐसी ही पावन कथा दूर करी सगळ्या व्यथा ।। गुरुचरणी राहो माथा । सर्वा सुखी ठेवितसे ।। ३१ ।।
श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ षोडषोऽध्यायः समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 16 Adhyay: आजच्या अनुकूल दिवसाचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा!
Shree Gajanan Leela Gatha 16 Adhyay: श्री गजानन लीला गाथा १४ अध्याय (लहान पोथी)
Shree Gajanan Leela Gatha 16 Adhyay: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)
श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)
‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
Shree Gajanan Leela Gatha 16 Adhyay: हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!