PM Kisan 19th 2025 Update in Marathi: जाणून घेऊया संपूर्ण माहिती..
PM Kisan 19th 2025 Update in Marathi: नमस्कार वाचकहो, देशातील केंद्र सरकार हे नेहमी योजना त्यातीलच ही एक योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे वितरित करण्यात आला. या योजनेअंतर्गत 9.7 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना 21 हजार 500 कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले, ज्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपये पोहचले आहेत.
(PMKSNY)योजनाही सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती, आज पर्यंत या योजनेचे 19 हप्ते वितरित करण्यात आले असून या योजनेचे सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 38,000 रुपये मिळाले असल्याचे कळते.
आतापर्यंत महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 18 हप्त्यांमध्ये एकूण 33,565 कोटींचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळाला असून राज्यातील आतापर्यंत 92.89 लाखशेतकरी कुटुंबाच्या खात्यात 19 हप्त्यात त्याच्या रूपात तब्बल 10,0967 कोटी जमा झाले आहेत.
PM Kisan 19th 2025 Update in Marathi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याद्वारे सुमारे २२,००० कोटी रुपये थेट ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे तुम्ही घरबसल्या पाहू शकतात अगदी सहजरीत्या. त्यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून तुमचे स्टेटस तपासावे लागेल. तसेच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी, भू-सत्यापन आणि आधार लिंकिंग पूर्ण करणे आवश्यक आहे.तसेच पात्रता असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेवर अपडेट करणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पुढील हप्ते वेळेवर मिळतील.
PM Kisan 19th 2025 Update in Marathi: हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. जर तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे बरोबर सबमिट केली असतील आणि ई-केवायसी पूर्ण केले असेल, तर हा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला असेल. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर या हप्त्याची स्थिती तपासू शकता.
चला तर मग पाहूया पीएम किसान स्टेटस कसे तपासावे.
पीएम किसान स्टेटस कसे तपासावे
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in जावे लागेल.
तुमच्यासमोर होम पेज येईल, होमपेज च्या उजव्या बाजूस लाभार्थी स्थिती म्हणजेच (Beneficiary Status) असे टॅब असेल त्यावर क्लिक करा.
इथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि ‘डेटा मिळवा’ (Get Data) बटणावर क्लिक करा.
यानंतर, आता तुमच्या स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची संपूर्ण स्थिती दिसेल. जर हप्ता जमा झाला असेल, तर त्याची माहिती येथे उपलब्ध असेल.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी
- pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.
- ‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) टॅबवर क्लिक करा.
- राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक, आणि गाव निवडा.
- ‘रिपोर्ट मिळवा’ (Get Report) बटणावर क्लिक करा.
यानंतर, तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधू शकता. अधिक माहितीसाठी, तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800-115-526 वर संपर्क साधू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा!
वृषभ- धन लाभ, आरोग्य सुधारणा आणि आनंदाच्या संधी!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!