HSRP Maharashtra Info 2025: राज्यात HSRP नंबर प्लेट अनिवार्य!

HSRP Maharashtra Info 2025: १ एप्रिल पासून नंबर प्लेट बंधनकारक जाणून घेऊया याविषयी

HSRP Maharashtra Info 2025: महाराष्ट्र राज्य सरकारने १ एप्रिल २०२५ पासून राज्यातील सर्व वाहनांसाठी एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. एच एस आर पी म्हणजे(High Security Registration Plate) हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहनांच्या ओळखीची खात्री करण्यासाठी घेतला गेला आहे.

चला तर मग, या निर्णयाचे महत्त्व, फायदे आणि प्रक्रिया जाणून घेऊया.

एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजे काय? 

What is an HSRP number plate?

HSRP Maharashtra एक अत्याधुनिक सुरक्षा नंबर प्लेट आहे, जी साध्या नंबर प्लेट्सपेक्षा अधिक सुरक्षित आहे. यामध्ये होलोग्राम, लेझर चिन्हांकित ओळख क्रमांक, आणि नॉन रियूजेबल लॉक यांचा समावेश आहे. यामुळे वाहनांची ओळख पटकन केली जाऊ शकते आणि चोरी किंवा फसवणूक कमी होऊ शकते.

एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची आवश्यकता का आहे?

 Requirement to install HSRP number plate?

 महाराष्ट्र राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोटरसायकल, रिक्षा, टमटम, ट्रॅक्टर इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. यामुळे:

 एच एस आर पी नंबर प्लेट लावल्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होईल.

चोरी आणि फसवणूक थांबवता येईल.

खोटी प्लेट्स आणि फसवणूक टाळता येईल.

वाहन चोरी होण्यास अडथळा निर्माण होईल.

एचएसआरपी नंबर प्लेटच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती

 Features HSRP number plate

एचएसआरपी नंबर प्लेटमध्ये अनेक विशेष गोष्टी आहेत, जसे की,

लेझर तकनीक प्रत्येक प्लेटवर एक अद्वितीय लेझर चिन्हांकित ओळख क्रमांक असतो.

एच एस आर पी नंबर प्लेटवर होलोग्राम स्टिकर एक होलोग्राम स्टिकर बसवले जाते, ज्यामुळे प्लेटची ओळख आणि प्रमाणिकरण कळवता येते.

 एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ही नंबर प्लेट एकदाच लावल्या जाते ती पुन्हा दुसऱ्या वाहनांवर बसवता येत नाही. त्यामुळे वाहन बदलणे किंवा बनावट प्लेट तयार करणे अवघड होते.

नॉन रियूजेबल लॉक या लॉकमुळे प्लेट फुकट किंवा बदलता येत नाही.

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा?

 How to apply for HSRP number plates?

तुम्हाला एचएसआरपी नंबर प्लेट मिळवायची असल्यास, तुम्ही अधिकृत फिटमेंट सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता लागेल, जसे की वाहनाचा रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, इंजन नंबर, आणि चेसिस नंबर. अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन देखील केली जाऊ शकते.

विभाग आणि अधिकृत फिटमेंट सेंटर

राज्य सरकारने तीन प्रमुख विभाग तयार केले आहेत, जिथे तुम्हाला तुमच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसवता येईल. यामध्ये १२, १८, आणि २० आरटीओ कार्यालयांचा समावेश आहे.

किती पैसे द्यावे लागतील? 

How much will you have to pay?

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शुल्क वाहनांच्या प्रकारावर आधारित असते:

दुचाकीसाठी ₹850

तीन चाकी किंवा व्यावसायिक वाहनांसाठी साधारण ₹1350

रंगकोंडीत स्टिकर साठी  साधारणता शुल्क ₹100

अधिक माहितीसाठी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या HSRP – मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र

मुदतीचे पालन न केल्यास काय होईल?

What Will happen if help is to be sought?

ज्या वाहन धारकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्च २०२५ पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवले नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ प्रमाणे कडक कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला निश्चित केलेल्या कालावधीत तुमच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे महत्त्वाचे आहे.

आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!

 घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

Loading