IPPB 2025 Info in Marathi:”कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी – इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ५१ पदे भरती प्रक्रियेत!”

IPPB 2025 Info in Marathi: जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती

IPPB 2025 Info in Marathi: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank – IPPB) ने तरुण उमेदवारांसाठी एक अत्यंत आकर्षक संधी उपलब्ध केली आहे. संस्थेने ५१ पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामध्ये कार्यकारी पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२५ आहे. या भरतीची सर्वात  विशेषबाब म्हणजे यामध्ये कोणत्याही लिखित परीक्षेची आवश्यकता नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात कारकीर्द करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि कौशल्यांचा वापर करून मुलाखतीत यश मिळवायचे आहे. तर, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि २१ मार्च २०२५ च्या आत तुमचे अर्ज लवकर सबमिट करा!

IPPB 2025 Info in Marathi: आज या लेखांमध्ये पाहूया तुम्हाला पडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जसा की अर्ज प्रक्रिया कशी? असेल पात्रता काय?  यामध्ये वेतन किती मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया.

कशी असेल अर्ज करण्याची प्रक्रिया?

Apply Online


इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ippbonline.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. 

(SC/ST)अनुसूचित जाती/जमाती आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५० रुपये तर सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी ७५० रुपये आहे.

हे पहा>>>> रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

पात्रता

अर्जदार उमेदवार हा पदवीधर असावा असणे आवश्यक आहे. 

निवड प्रक्रिया

उमेदवारांनी कोणत्याही पदवीधर असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रियेत पदवीतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता काढली जाईल आणि त्यानंतर मुलाखत घेण्यात येईल.

राज्यातील अधिवास असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वेतन आणि कराराचा कालावधी

Contract period with salary

निवड झालेल्या उमेदवारांना मासिक ३०,००० रुपये वेतन मिळेल.

कराराचा प्रारंभिक कालावधी १ वर्षाचा असेल, जो समाधानकारक कामगिरीनुसार ३ वर्षांपर्यंत वाढवता येईल.

या संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी लवकरच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट भेट द्या, आणि ये सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

हे पहा>>>>“सुवर्णसंधी! बीज भांडवल महामंडळ योजना खास युवकांसाठी”

Loading