Holi Skin Tipes 2025: जाणून घेऊया काही महत्वपूर्ण टिप्स खास तुमच्यासाठी!
Holi Skin Tipes 2025: नमस्कार, होळी म्हटली की, आनंद,उल्हास आणि एकमेका एकमेकांना विविध रंग लावून धमाल करायचा हा सण. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा सण असतो आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी याच दिवशी रंग खेळला जातो रंगपंचमी तसेच आनंद उत्सव साजरा केला जातो. तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी रंगपंचमी या दिवशी हा एकमेकांना रंग लावण्याचा आणि जल्लोष करण्याचा सण साजरा करतात.
आणि त्यानंतर त्रास होतो तो रंग काढतानाचा, जसे की रंग काढताना आपल्या होते, त्वचा निस्तेज होते तसेच अनेक वेळा त्वचेला खाज देखील येते अशा अनेक समस्या निर्माण होतात.
Holi Skin Tipes 2025: रंग खेळताना फक्त मजा-मोज म्हणून अनेक वेळा केसांमध्ये कोरडा रंग किंवा बाजारातून मिळणारा पक्का रंग त्यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक जण होळीच्या वेळेस पक्का रंग लावतात, जो काढा त्वचेवरचा काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात.
“शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”
तर आज या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया होळी खेळल्यानंतर चेहऱ्यावरचा रंग काढायचा कसा आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची रंगात घेण्याच्या आधी..
1. पाण्याने धुऊन रंग काढणे
होळीचे रंग काढण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाण्याने धुणे. मात्र, गरम पाण्याने चेहरा धूूळू नका, कारण ते रंग सेट करतो. होळी खेळण्याच्या एक तास आधी कोल्ड क्रीम लावा, ज्यामुळे त्वचेवर रंग लागण्याची शक्यता कमी होते.

2. केसांचे संरक्षण
केसांचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. जर रंग लागला, तर अंड्यातील पिवळ बलक, दही किंवा कोरफड जेल 45 मिनिटे केसांमध्ये ठेवा आणि नंतर सौम्य शैम्पूने धुवा.
3. दुसऱ्या दिवशी केसांचे उपचार
Holi Skin Tipes 2025: होळी खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांची निगा राखणे आवश्यक आहे. 2 चमचे मेथी आणि शिककाई पावडर 3 कप पाण्यात उकळा, थंड झाल्यावर या मिश्रणाने केस धुवा.
हे पहा>>>>>१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
4. घरगुती उपचार
दूध किंवा दह्यात बेसन मिसळून पातळ पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये गोड तेल आणि गुलाब पाणी घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटांनंतर धुवा.
5. खोबरेल तेल
चेहऱ्यावर साबण लावण्यापूर्वी खोबरेल तेल लावा. हे हट्टी रंग काढण्यात मदत करेल. तेल आणि गव्हाचे पीठ लावून लिंबाचे तुकडे चेहऱ्यावर चोळा.
6. चेहरा जास्त धू नका
चेहरा धुण्यासाठी आमचूर पावडरचे पाणी किंवा चांगला फेसवॉश वापरा, पण जास्त प्रमाणात धुणे टाळा, कारण यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
7. मुलतानी मातीचे उपचार
मुलतानी माती पाण्यात भिजवून मऊ झाल्यावर चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावा. हा पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
8. ग्लिसरीन
ग्लिसरीन त्वचेला खाज येण्यापासून वाचवते. गुलाबपाण्यात ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
9. क्लींजरचा वापर
लिंबू आणि कोरफड असलेले क्लींजर चेहऱ्यावरचे रंग काढण्यासाठी उत्तम आहेत. हे क्लींजर त्वचेला खाज आणि जळजळ न करता रंग काढण्यात मदत करतात.
10. त्वचेची काळजी घ्या
होळीच्या रंगांपासून त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी, रंग खेळण्यापूर्वी आणि नंतर त्वचेला योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
Holi Skin Tipes 2025: या सर्व पद्धतींचा वापर करून तुम्ही होळीचा म्हणजेच धुलीवंदना चा ज्या दिवशी आपण रंग खेळतो त्या दिवशी उपयोग करून तुमच्या त्वचेची सुरक्षितता ठेवू शकता. तसेच आपल्या मित्र-परिवारासोबत आनंद घेऊ शकता आणि होळीच्या रंगात रंगून आनंद आनंद घेऊ शकता. होळीच्या रंगात रंगून आनंद साजरा करा, पण त्वचेसाठी योग्य काळजी घेणे विसरू नका!
आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!
तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.
घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!
आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !
Holi Skin Tipes 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा!
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
Hoil festival 2025 in Marathi: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!