Unified Pension Scheme 2025 In Marathi: जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती
Unified Pension Scheme 2025 In Marathi: केंद्र सरकारने एकीकृत पेन्शन योजना (UPS) म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम जो 1 एप्रिल 2025 पासून लागु होईल. या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर गॅरंटी असलेली पेन्शन प्रदान करणे आहे. UPS ही योजना ओल्ड पेन्शन स्कीम (OPS) आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) यामध्ये संतुलन साधण्यासाठी सादर करण्यात आली आहे.
एकीकृत(युनिफाईड )पेन्शन योजना (UPS) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, जी निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. UPS च्या माध्यमातून, सरकारने कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, ज्यामुळे त्यांना स्थिर आणि नियमित उत्पन्नाचा लाभ मिळेल. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
Unified Pension Scheme 2025 In Marathi: केंद्र सरकारने २४ ऑगस्ट २०२४ रोजी एकीकृत पेन्शन योजना (UPS) मंजूर केली आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शनचा लाभ मिळेल. महाराष्ट्र हे UPS लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे.

सीएम डॅश बोर्ड शासनाच्या सर्व विभागांची माहिती एकाच ठिकाणी
UPS चा मुख्य उद्देश
Main Purpose UPS
UPS अंतर्गत, सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित आणि स्थिर पेन्शन मिळेल. या योजनेत, कर्मचाऱ्यांच्या बेसिक कमाईच्या 18.5% इतके योगदान सरकारच्या वतीने पेन्शन खात्यात जमा केले जाईल, जे सध्याच्या 14% च्या तुलनेत अधिक आहे.
भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?
UPS म्हणजे काय?
What does UPS mean?
Unified Pension Scheme 2025 In Marathi: UPS या योजनेअंतर्गत, जी निवृत्त कर्मचाऱ्यांना स्थिर आणि नियमित उत्पन्न प्रदान करते. कर्मचाऱ्याच्या एकूण सेवेला अनुसरून निवृत्तीनंतर निश्चित रक्कम दिली जाईल. यामध्ये भांडवल बाजाराशी संलग्नता कमी ठेवण्यात आलेली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळते.
UPS चा लाभ कोणाला होणार?
Benefits of UPS
केंद्र सरकारने 23 लाख कर्मचाऱ्यांना या यूपीएससी प्रभाव हा केंद्र सरकारच्या 23 लाख कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. UPS अंतर्गत, निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या बेसिक कमाईच्या 50% इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळेल, परंतु यासाठी किमान 25 वर्षे काम करणे आवश्यक आहे.
UPS अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये महागाई भत्ता (DR) देखील समाविष्ट केला जाईल, ज्यामुळे पेन्शनची रक्कम महागाईच्या प्रमाणानुसार वाढेल.
किमान पेन्शनची सुविधा
किमान नोकरी कालावधी: किमान २५ वर्षांची नोकरी असलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या ५०% रक्कम मिळेल.
किमान १० वर्षे नोकरी: १० वर्षे नोकरी झालेल्या कर्मचाऱ्यांना सरासरी मासिक १०,००० रुपये पेन्शन मिळेल.
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या ६०% रक्कम त्याच्या कुटुंबीयांना दिली जाईल.
UPS आणि (एनपीएस) NPS यामध्ये संबंध
Relationship between UPS and NPS
नवीन पेन्शन योजनेअंतर्गत (एनपीएस) निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना UPS च्या तरतुदी लागू केल्या जातील. एनपीएस अंतर्गत थकबाकीची रक्कम पीपीएफच्या व्याजदरानुसार व्याजासह दिली जाईल. एकदा कर्मचाऱ्याने UPS योजना स्वीकारली, तर तो एनपीएसकडे जाऊ शकणार नाही. तथापि, सध्या एनपीएस योजना घेतलेले किंवा व्हीआरएस घेतलेले कर्मचाऱ्यांना UPS योजना घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना
UPS च्या लागू होण्याची प्रक्रिया
UPS admission process
सरकारने 25 जानेवारी 2025 रोजी UPS संदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोटिफिकेशननुसार, UPS त्या कर्मचार्यांना लागू होईल, जे NPS अंतर्गत आहेत, परंतु त्यांनी UPS चा पर्याय निवडला आहे.
UPS अंतर्गत पेन्शन कशी मोजली जाईल?
सेवा कालावधी: जर एखाद्या कर्मचाऱ्याची सरकारी नोकरी २५ वर्षे झाली असेल, तर त्याला शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या ५०% रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल.
पेन्शनची रक्कम महागाई भत्त्याशी संलग्न राहील, ज्यामुळे चलनवाढीचा प्रभाव कमी होईल.
केंद्र सरकार या योजनेत १८.५% योगदान देईल, जे पूर्वीच्या १४% पेक्षा अधिक आहे.
हे पहा>>>>>१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
निवृत्तीच्या वेळी काय मिळेल?
Unified Pension Scheme 2025 In Marathi: निवृत्तीनंतर, कर्मचाऱ्याला नियत सेवावधी (सुपरअन्युएशन) नुसार एकत्रित रक्कम मिळेल, जी उपदानासह (ग्रॅच्युइटी) दिली जाईल. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या मासिक वेतन व महागाई भत्त्याच्या एक दशांश प्रमाणात मोजली जाईल.
Unified Pension Scheme 2025 In Marathi: हे पहा>>>>> “शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”