Vihir Anudan Yojana 2025: जाणून घेऊया अनुदान आणि याबद्दल सविस्तर माहिती.
Vihir Anudan Yojana 2025: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याची मोठी समस्या असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशाच परिस्थितीत निसर्गात होणारे बदल वेळी अवेळी पाऊस तसेच दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली पाण्याची समस्या या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने Vihir Anudan Yojana अनुदान योजनेची घोषणा केली आहे.
Vihir Anudan Yojana 2025:महाराष्ट्र शासन हे आपल्या शेतकरी मित्रासाठी विविध योजना राबवत असून आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना असून,या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी( 2.5) अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे.
या योजनेद्वारे अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता आणि स्वावलंबन मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. योग्य कागदपत्रे आणि पात्रता पूर्ण करून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यास हरकत नाही.
या योजनेसंदर्भात पडणारे विविध प्रश्नांची उत्तरे जसे की अर्ज कसा करायचा? त्याची कार्यपद्धती कशी आहे? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तरी आपण पूर्ण वाचावा.
कशी असते योजनेची कार्यपद्धती?
How does this scheme work?
या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे केली जाते, तर अनुदान समाज कल्याण विभागाद्वारे प्रदान केले जाते. प्रत्येक वर्षी अनेक विहिरी खणल्या जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना जलस्रोतांचा अधिक प्रभावी वापर करता येतो.
उन्हाळ्यात विहिरींची खोदकाम का करतात?
Vihir Anudan Yojana 2025:विहिरींची खोदकाम उन्हाळ्यात केली जाते कारण पावसाळ्यात चिखल आणि पाण्यामुळे काम करणे कठीण होते. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना इतर शेतीच्या कामांमध्ये कमी व्यस्तता असते, ज्यामुळे त्यांना विहिरींच्या कामांसाठी वेळ मिळतो.
हे पहा>>>>>भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?
अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना
१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
हे पहा>>>>> “शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”
लाभार्थी निवड प्रक्रिया
Beneficial selection process
लाभार्थ्यांची निवड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाते. या समितीत सहा सदस्य कार्यरत असतात, जे योग्य लाभार्थ्यांची निवड करतात.

अनुदानाची रक्कम
Grant amount
Vihir Anudan Yojana 2025: योजनेतून लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या अनुदानाची सुविधा उपलब्ध आहे:
- नवीन विहीर खोदण्यासाठी: २,५०,००० रुपये
- जुनी विहीर दुरुस्तीसाठी: ५०,००० रुपये
- इनवेल बोरिंगसाठी: २०,००० रुपये
- कृषिपंपासाठी: २०,००० रुपये
- वीज जोडणीसाठी: १०,००० रुपये
- शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी: १,००,००० रुपये
- ठिबक सिंचनासाठी: ५०,००० रुपये
- तुषार सिंचनासाठी: २५,००० रुपये
युनिफाईड पेन्शन स्कीम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार
हे पहा>>>>>भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?
हे पहा>>>>अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काही अटींची पूर्तता करावी लागते:
शेतकरी नवबौद्ध किंवा अनुसूचित जातीमधील असावा.
सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला असावा.
नवीन विहीर खोदण्यासाठी कमीत कमी एक एकर जमीन असावी.
शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे, आणि यामध्ये कोणतीही कमाल मर्यादा नाही.
Vihir Anudan Yojana 2025:लाभार्थी शेतकऱ्याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी; यासाठी शाखा अभियंता किंवा उप अभियंता भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करून अहवाल तयार करतील.
अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनांमधून विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी यांचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थ्याकडे किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे; त्याहून कमी क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यास विहीर मंजूर होणार नाही. तथापि, दोन किंवा तीन लाभार्थ्यांनी सलग जमीन असल्यास, सामुदायिक विहीर मिळवण्यासाठी ते पात्र ठरतील.”
पाण्याच्या वापर आणि हिस्सेवारीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर करार करणे आवश्यक आहे.”
लाभार्थी शेतकऱ्याच्या नावे सात बारा, आठ अ असावा.
विहिरीशिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी २० गुंठे जमीन असावी.
वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आतील असणे आवश्यक आहे.
“ई-नाम योजना” शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि व्यापाराचे नवे युग!
आवश्यक कागदपत्रे कोणती?
Important Documents
लाभार्थीचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत,
आधार कार्ड,
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
उत्पन्नाचा दाखला
पासपोर्ट आकाराचे फोटो
रोजगार हमी योजनेचे कार्ड
7/12 व 8अ उतारा
सामूहिक विहीर असेल तर त्याचा सलग जमीन असल्याचा पंचनामा अनिवार्य
अधिक माहितीसाठी संपर्क
कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
अर्ज कसा कराल
Apply
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या>>>>>>>>https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Scheme
Vihir Anudan Yojana 2025: या योजनेसाठी तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा पद्धतीत तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता.