Jivant Satbara Mohim 2025: जाणून घेऊया सविस्तर माहिती
Jivant Satbara Mohim 2025: नमस्कार,तुम्ही ऐकले आहे का? आपल्या राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे, जी आहे Jivant Satbara Mohim. या मोहिमेचा उद्देश मृत खातेदारांच्या वारसांची नोंद अधिकार अभिलेखामध्ये वेळेत करणे आहे, ज्यामुळे त्यांना शेतजमिनीच्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे मिळवण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल. या उपक्रमामुळे वारसांना त्यांच्या हक्कांची जपणूक करण्याची संधी मिळणार आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांना रोजच्या कामकाजात सुधारणा होईल.
या जिवंत सातबारा मोहीम बद्दल माहिती घेऊया की काय आहे जिवंत सातबारा मोहीम?कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात तसेच या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तरी हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा.

काय आहे जिवंत सातबारा मोहीम?
What is the living seven-twelve?
Jivant Satbara Mohim 2025: महाराष्ट्र राज्यात जिवंत सातबारा मोहीम ही एक महत्त्वाची उपक्रम आहे, ज्याचा उद्देश मृत खातेदारांच्या वारसांची नोंद अधिकार अभिलेखामध्ये वेळेत करणे आहे. या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. वारसांची नोंद विहित कालावधीत न झाल्याने त्यांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून वारसांना आवश्यक कागदपत्रांमध्ये अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
काय आहे हे घिबली ॲनिमेशन? कुठून आला आहे हे?
“यंदाचे वर्ष काय घेऊन येणार आहे तुमच्यासाठी?”
कोणाला होणार लाभ?
Who will be Benefiters?
Jivant Satbara Mohim 2025: या मोहिमेचा मुख्य लाभ मृत खातेदारांच्या वारसांना होणार आहे. वारसांची नोंद अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने त्यांना विविध दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. जिवंत सातबारा मोहिमेमुळे या अडचणींवर मात करता येईल.
कागदपत्रांची आवश्यकता कोणती?
Important documents
वारसांच्या नोंदीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील:
- मृत्यू दाखला
- वारसाबाबत सत्यप्रतिज्ञालेख/स्वयंघोषणापत्र
- पोलिस पाटील/सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला
- सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक
- रहिवासीबाबतचा पुरावा
या कागदपत्रांना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावे लागेल. त्यानंतर स्थनिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर केला जाईल.

या मोहिमेचा कालावधी किती आहे?
How long is this campaign?
महाराष्ट्र राज्य सरकारची जिवंत सातबारा मोहीम १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाणार आहे.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना
Jivant Satbara Mohim 2025:ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर म.ज.म.अ. १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा. यामुळे सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदविलेल्या असतील.
संपर्क कुठे करायचा?
Where to contact?
गावातील शेतकरी व जमीनमालकांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क साधून आपल्या वारसांबाबतची नोंद अधिकार अभिलेखात करून घ्यावी. काही अडचण आल्यास मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
Jivant Satbara Mohim 2025: हे पहा >>>>> १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.
अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!
Jivant Satbara Mohim 2025: “मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”
“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”