Aadhaar Card name change after marriage:ऑनलाइन प्रक्रिया जाणून घेऊया कशी.
Aadhaar Card name change after marriage: लग्नानंतर नववधूंच्या आडनावात बदल होतो,अनेक वेळा आधार कार्डवर हा बदल न केल्यामुळे पुढे अनेक अडचणी येतात. ह्या समस्येपासून मुक्ती व्हायची असेल, तर लग्नानंतर आधार कार्डवर नाव बदलणे खूप गरजेचे आहे.
भारत सरकारच्या UIDAI यंत्रणेमुळे ही प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. आता तुम्ही तुमच्या घरातून बसून, फक्त काही क्लिकवर हे काम पूर्ण करू शकता. चला, तर मग आज या लेखातून या ऑनलाइन प्रक्रियेची स्टेप-बाय-स्टेप माहिती सोप्या शब्दात जाणून घेऊया.
नाव बदलण्यापूर्वीची ‘ही’ महत्त्वाची सूचना
important note before changing the name.
· आधार कार्डवर तुम्ही तुमचं नाव फक्त दोनच वेळा बदलू शकता. म्हणून नवीन नाव नीटपणे आणि काळजीपूर्वक टाइप करा.
· ऑनलाईन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने अर्ज करताना तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड (पुरावा म्हणून) असणे अनिवार्य आहे.
“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”
घरी बसून ऑनलाईन प्रक्रिया
Online process step by step
- सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा https://uidai.gov.in/
- ‘My Aadhaar’ या सेक्शनमधून ‘Update Demographics Data’ या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता तुमचा १२-अंकी आधार नंबर टाका आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल्या OTP द्वारे लॉगिन करा.
- ‘Name’ या पर्यायावर क्लिक करून तुमचे नवीन नाव (लग्नानंतरचे नाव) अचूकपणे भरा.
- स्कॅन केलेले विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड यांची PDF फाइल अपलोड करा.
- शेवटी, ₹५० हे शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरा. झालं! तुमचा अर्ज दाखल झाला.
ऑफलाइन प्रक्रिया (जर ऑनलाईन अडचण असेल तर)
Offline process if online application has been received
· तुमच्या जवळच्या कोणत्याही आधार सेवा केंद्राकडे जा.
· तेथे आधार सुधारणा फॉर्म घ्या आणि तो काळजीपूर्वक भरा.
· फॉर्मसोबत विवाह प्रमाणपत्राची प्रत आणि इतर आवश्यक दस्तऐवज जोडा.
· ₹५० शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक अर्ज पावती (Acknowledgement Slip) मिळेल. यावर एक URN (Update Request Number) नंबर असतो. हा नंबर वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची प्रगती ऑनलाईन तपासू शकता.
व्हेरिफिकेशन आणि नवीन आधार
Verification and new Aadhaar
सर्व दस्तऐवजे योग्य असल्यास, साधारणपणे ९० दिवसांच्या आत तुमचे नाव आधार डेटाबेसमध्ये अपडेट होते.
अपडेट झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS मिळवू शकता आणि ऑनलाईनच तुमचा नवीन e-Aadhaar कार्ड डाउनलोड करू शकता. छापील कार्ड पोस्टद्वारे तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येते.
महत्त्वाचे सूचना: अर्ज करताना दिलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे Active असणे खूप गरजेचे आहे, कारण सर्व अपडेट्स आणि OTP त्याच नंबरवर येतात
Aadhaar Card name change after marriage: