Navratri 2025 time table; “यंदा देवीचा नवरात्रोत्सव १० दिवसांचा! जाणून घ्या कसा?”

Navratri 2025 time table; म्हणजेच एक तिथी सलग दोन दिवस असणार आहे.

Navratri 2025 time table; सध्या घरोघरी, कॉलनीत आणि मंदिरांच्या अंगणात एक वेगळीच लगबग आहे, कारण येणार आहे नवरात्रोत्सवाची. आदिशक्ती, आदिमाया, या शक्तिरूपिणी देवीच्या आगमनाने संपूर्ण वातावरण प्रसन्न, पवित्र आणि भक्तिमय होत आहे.यावर्षी २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार आहे. तर २ ऑक्टोबर (गुरुवार) रोजी विजयादशमी (दसरा)

हा नऊ दिवसांचा पर्व  म्हणजे देवीच्या विविध रूपांची आराधना, जागरण, कीर्तन, रंगीबेरंगी वेशभूषा, आणि  स्त्रीशक्तीचा अभिमान. Navratri 2025 time table देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून सत्याचा, चांगल्याचा विजय मिळवला, त्या विजयाच्या गौरवासाठीच हे नऊ दिवस साजरे केले जातात. कोणत्याही जातीभेदाशिवाय, वय, प्रदेश, सामाजिक स्थितीचा फरक न बाळगता, ही शक्ति-उपासना सर्वत्र एकसमान आणि मंगलमय वातावरणात केली जाते.

Navratri 2025 time table; मात्र, यंदाच्या नवरात्रोत्सवात एक खास दुर्मिळ योग जुळून आला आहे,कारण या वेळी नवरात्रोत्सव केवळ नऊ नव्हे, तर दहा दिवसांचा आहे! हे कसे? तिथीत झालेला बदल, पंचांगानुसार खास योग आणि त्यायोगे मिळणारा वाढीव भक्तीचा झरा याविषयी आपण या लेखात सविस्तर माहिती मिळवणार आहोत.

का आहे यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा?

Navratri festival 10 days long this year


हिंदू पंचांगानुसार, तिथींच्या क्षय किंवा वृद्धीमुळे सणांच्या दिवसांमध्ये बदल होतो. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार आहे. मात्र, पंचांगानुसार यंदा तृतीया तिथीची वृद्धी झाली आहे, म्हणजेच तृतीया तिथी सलग दोन दिवस असणार आहे. त्यामुळे जो उत्सव नऊ दिवसांचा असतो, तो एक दिवस वाढून दहा दिवसांचा झाला आहे. हा एक विशेष योग मानला जात आहे.
नवरात्रोत्सव २०२५: संपूर्ण तिथीनुसार वेळापत्रक
यंदा दहा दिवसांच्या नवरात्रीमुळे तिथींची रचना खालीलप्रमाणे असेल.

२२ सप्टेंबर (सोमवार): प्रतिपदा तिथी (घटस्थापना, पहिली माळ)

२३ सप्टेंबर (मंगळवार): द्वितीया तिथी (दुसरी माळ)

२४ सप्टेंबर (बुधवार): तृतीया तिथी (तिसरी माळ)

२५ सप्टेंबर (गुरुवार): तृतीया तिथी (वाढीव दिवस, तिसरी माळ)

२६ सप्टेंबर (शुक्रवार): चतुर्थी तिथी (चौथी माळ)

२७ सप्टेंबर (शनिवार): पंचमी तिथी (पाचवी माळ)

२८ सप्टेंबर (रविवार): षष्ठी तिथी (सहावी माळ)

२९ सप्टेंबर (सोमवार): सप्तमी तिथी (सातवी माळ)

३० सप्टेंबर (मंगळवार): अष्टमी तिथी (आठवी माळ)

१ ऑक्टोबर (बुधवार): नवमी तिथी (नववी माळ)

२ ऑक्टोबर (गुरुवार): विजयादशमी (दसरा)


आता पोरांची बारी! जेमिनी एआयवर रेट्रो लुकमध्ये फोटो करणार, हा नवीन ट्रेंड सुरू आहे!

वाढीव तृतीया तिथीला घटाला कोणती माळ घालावी?


नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या ‘चंद्रघण्टा’ रूपाची पूजा केली जाते. या देवीला झेंडूची फुले अत्यंत प्रिय आहेत. यंदा तृतीया तिथी २४ आणि २५ सप्टेंबर या दोन्ही दिवशी असल्याने, भाविक दोन्ही दिवशी देवीच्या घटाला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करू शकतात. यामुळे देवीची विशेष कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.


“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”

शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!

१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

Loading