New GST rates on Farm Machinery 2025: ट्रॅक्टर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र आणि इतर कृषी औजारांसाठी GST फक्त ५%!
New GST rates on Farm Machinery 2025: सध्याच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलेला हा दिलासा फार मोठा आहे. (New GST rates on Farm Machinery 2025:) तो म्हणजे ट्रॅक्टर, बी-पेरणी यंत्र, मळणी पट्टी, पेनधसंकलक, मल्चर आणि इतर कृषी औजारांवर लागणारा GST दर आता थेट १२% व १८% वरून केवळ ५% करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक यंत्रसामग्रीवर जबरदस्तीने पडणारा खर्च आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हे नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत आणि सरकारचा स्पष्ट आदेश आहे की या दरकपातीचा थेट लाभ पारदर्शकतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला पाहिजे. चला जाणून घेऊया कोणकोणत्या औजारांवर किती बचत होणार आहे आणि या बदलाचा आपल्या शेतीवर नेमका काय परिणाम होईल.
“यंदा देवीचा नवरात्रोत्सव १० दिवसांचा! जाणून घ्या कसा?”
१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
खाली केंद्र सरकारच्या जीएसटी कपातीमुळे कोणत्या कृषी औजारावर किती रुपयांची थेट बचत होणार आहे, याची वेगळी यादी दिली आहे.

कोणत्या औजारावर किती बचत होणार?
How much will be saved on which equipiment?
New GST rates on Farm Machinery 2025: ३५ एचपी ट्रॅक्टर: ₹41,000 स्वस्त
४५ एचपी ट्रॅक्टर: ₹45,000 स्वस्त
५० एचपी ट्रॅक्टर: ₹53,000 स्वस्त
७५ एचपी ट्रॅक्टर: ₹63,000 स्वस्त
विद्युत तणनाशक यंत्र (7.5 एचपी): ₹5,495 स्वस्त
मालवाहू ट्रेलर (5 टन): ₹10,500 स्वस्त
बी-पेरणी/खत यंत्र (11 फाळ): ₹3,220 स्वस्त
बी-पेरणी/खत यंत्र (13 फाळ): ₹4,375 स्वस्त
मळणी कापणी पट्टी (14 फूट): ₹1,87,500 स्वस्त
पेंढा संकलक (5 फूट): ₹21,875 स्वस्त
सुपर सीडर (8 फूट): ₹16,875 स्वस्त
हॅपी सीडर (10 फाळ): ₹10,625 स्वस्त
फिरता नांगर (6 फूट): ₹7,812 स्वस्त
चौकोनी गाठणी (6 फूट): ₹93,750 स्वस्त
मल्चर (8 फूट): ₹11,562 स्वस्त
हवेच्या दाबावर चालणारे पेरणी यंत्र (4 रांगा): ₹32,812 स्वस्त
ट्रॅक्टरवर बसवलेले फवारणी यंत्र (400 लिटर): ₹9,375 स्वस्त
लहान भात लावणी यंत्र (4 रांगा): ₹15,000 स्वस्त
मळणी यंत्र (4 टन): ₹14,000 स्वस्त
१३ एचपी पॉवर टिलर: ₹11,875 स्वस्त
या नवे दर लागु झाल्याने, शेतमाल उत्पादनाचा खर्च कमी होईल, ग्रामीण स्तरावर तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि कृषी उत्पादन वाढीस निश्चित हातभार लागेल. आधुनिक शेतीमध्ये कार्यक्षम औजारांचा उपयोग सरसकट आणि परवडणारा व्हावा, याचा नक्कीच शेतकरी बांधवांना लाभ मिळेल. माहिती योग्य वाटल्यास इतरांना देखील तुम्ही शेअर करू शकता.
आता पोरांची बारी! जेमिनी एआयवर रेट्रो लुकमध्ये फोटो करणार, हा नवीन ट्रेंड सुरू आहे!
“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”
शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!
१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून