Katyayani Navratri 6th day 2025;‘ संपूर्ण सुख, तेज आणि प्रगतीची देवी – कात्यायनी!’
Katyayani Navratri 6th day 2025; नवरात्रीचा सहावा दिवस, देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी देवीची उपासना केली जाते. (Katyayani Navratri) तिच्या तेजस्वी रुपामुळे प्रत्येक घरात आनंद, वैभव आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. उर्जेचा, सामर्थ्याचा आणि इच्छाशक्तीचा स्रोत असलेली कात्यायनी देवी भक्तांच्या मनात सकारात्मकता आणते. महिषासुराचा वध करणारी, सर्वत्र अभय आणि आशीर्वाद देणारी माता आज सन्मानाने पूजली जाते.
नवरात्रीचा सहावा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शक्तिपूर्ण मानला जातो, कारण या दिवशी कात्यायनी देवीची उपासना केली जाते. देवीच्या नव रूपांतील सहावे रूप म्हणून कात्यायनी मातेला उत्साह, तेज आणि इच्छाशक्तीचे प्रतीक मानले जाते. धर्मशास्त्रात म्हटले आहे की कात्यायनी देवी ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे आणि ऋषी कात्यायन यांच्या कठोर तपस्चऱ्येमुळे दुर्गेचे हे तेजस्वी रूप त्यांच्या घरी प्रकट झाले. त्याचप्रमाणे उत्तर भारतात या देवीला ‘छठ मैया’ म्हणूनही पूजले जाते.
नवरात्र स्पेशल देवी आरती संग्रह
Katyayani Navratri 6th day 2025; नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा सौख्य, विवाह आणि सुखसंवादासाठी केली जाते. धर्मग्रंथ आणि पुराणकथांमध्ये असे वर्णन आहे की देवी कात्यायनीची उपासना, मंत्रजप आणि व्रत घेतल्याने विवाह इच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतात.
फक्त अंगठा, आणि काम फत्ते! पैसे ट्रान्सफर करा एका टचमध्ये
खास करून शुभ परिणयासाठी, विवाहाच्या मार्गातील अडथळे, मांगलिक दोष दूर होण्यासाठी आणि मनासारखा जीवनसाथी मिळण्यासाठी ही देवीची भक्ती अत्यंत फलदायी गणली जाते. ब्रजमंडलातील गोपिकांनी सुद्धा कात्यायनी देवीचे व्रत करून श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त केले, असा पौराणिक उल्लेख आहे. म्हणूनच ‘सौख्य, विवाह आणि सुखसंवादासाठी कात्यायनी देवीच्या पूजनाचे विशेष महत्त्व’ आहे.
कात्यायनी देवीचे स्वरूप
Katyayani Devi’s Divine Appearance
कात्यायनी देवीचे रूप अत्यंत तेजस्वी, विराट आणि घातक म्हणून ओळखले जाते. त्या चतुर्भुज असून एका हातात तलवार, दुसऱ्या हातात कमळ, तिसरा हात अभय मुद्रा व चौथा हात वरद मुद्रा दर्शवतो. देवीचे व्यक्तित्व दयाळूपणा आणि शक्तीचे प्रतीक आहे; महिषासुराचा वध करण्यासाठी कात्यायनीने रुद्र रूप धारण केले होते. तिचा आवडता रंग लाल आहे, त्यामुळे लाल वस्त्र आणि लाल फुलांचा पूजेत वापर केला जातो.
“ज्ञान, विवेक आणि आत्मविश्वासाची जननी – स्कंदमाता”
कात्यायनी देवीच्या पूजेची वेळ
Katyayani Devi’s Puja
कात्यायनी देवीची पूजा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी केली जाते. या दिवशी सकाळी स्नान करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पूजेसाठी गंगाजल, लाल फुले, कलश, तांदूळ, नारळ, मध व मालपुआ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. पूजेनंतर तुपाचा दिवा लावावा आणि मंत्राचा जप करावा.
कात्यायनी देवीचा मंत्र
Katyayani Devi’s matra
“या देवी सर्वभूतेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।”
“कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥”
नवरात्रातील ९ दिवसाचे ९नैवेद्य
देवीला आवडता रंग
Favourite Colour, Favourite Flowers,
कात्यायनी देवीला लाल रंग विशेष आवडतो. तिच्या पूजेत लाल वस्त्र, लाल गुलाब किंवा कमळ, आणि मध व गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. लाल रंगाला शक्ती, उर्जा व विजयाचे प्रतीक मानले जाते.
देवीला कोणता नैवेद्य दाखवावा?
Katyayani Devi’s Naivedya
कात्यायनी देवीला पूजेत ‘मध’ (honny ) अत्यंत प्रिय आहे; म्हणूनच भक्तांनी नैवेद्य म्हणून मध अर्पण करणे शुभ मानले जाते. काही ठिकाणी मालपुआ (गोड तळलेला पदार्थ), मिठाई, शहद, फळे, मखाना लाडू, फलाहार, आणि कोमट दूध यांच्या नैवेद्याचा समावेश केला जातो. देवीसाठी लाल फुलांचा आणि मधाचा नैवेद्य विशेष महत्वाचा आहे. पूजेच्या शेवटी या नैवेद्याचा प्रसाद सर्वांना वाटावा, असे शास्त्रात सांगितले जाते. नैवेद्याच्या माध्यमातून भक्त आपल्या शुभेच्छा, प्रेम आणि श्रद्धा देवीसमोर ठेवतात आणि तिच्या कृपेसाठी प्रार्थना करतात.
‘विवाह इच्छुक’ देवि कात्यायनी त्यांनी पूजेचा लाभ
Katyayani Devi’s Benefits
कात्यायनी देवीच्या उपासनेला हिंदू धर्मग्रंथात विवाह-इच्छुक व्यक्तीसाठी अतिशय शुभ मानले जाते. पुराणानुसार, ब्रजमंडलातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा, यासाठी कात्यायनी देवीचे व्रत आणि उपासना केली होती. नंतरपासून अनेक विवाह इच्छुक महिला किंवा पुरुष देवीची पूजा आणि मंत्रजप करतात.
या पूजेने मनोकामना पूर्ण होते, विवाहात येणाऱ्या अडचणी, अडथळे किंवा ‘मांगलिक दोष’ दूर होतात आणि योग्य जोडीदार मिळतो, अशी श्रद्धा आहे. नियमित कात्यायनी देवीच्या मंत्राचा जप आणि व्रत भक्ताला विवाह-सौख्य, सुखी वैवाहिक जीवन आणि संबंध सुधारण्याचे आशीर्वाद प्रदान करतो.
![]()








