Angarika yog Rajur 2026: वारीची महत्वपूर्ण थोडक्यात माहिती
Angarika yog Rajur 2026:२०२६ वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी ६ जानेवारी रोजी असून, हा योग मात्र महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणजे जालन्यातील प्रसिद्ध ‘राजूर गणपती’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. जालन्यात अंगारकी चतुर्थीला होणारी(Angarika yog Rajur) ‘राजूरची पायी वारी’ हा केवळ एक प्रवास नसून तो लाखो भाविकांच्या श्रद्धेचा सोहळा असतो. या दिवशी बाप्पाचे दर्शन घेतल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
तर आज या लेखांमध्ये जाणून घेऊया या वारीबद्दल, राजुरच्या गणपतीची वारी ही नेहमी भक्तांना संकटातून, तसेच इच्छापूर्तीचा मार्ग प्रदान करते.
अंगारकी चतुर्थीची पौराणिक कथा
(Legend of Angarki Chaturthi)
Angarika yog Rajur 2026:‘अंगारकी’ हे नाव मंगळ देवावरून पडले आहे. ऋषीपुत्र अंगारक (मंगळ देव) यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले होते. ज्या चतुर्थीला मंगळवार येतो, ती ‘अंगारकी’ म्हणून ओळखली जाते. या दिवशी केलेल्या गणपती पूजनाचे फळ इतर चतुर्थींच्या तुलनेत २१ पटीने अधिक मिळते, असे मानले जाते.
“PAN–आधार लिंक झाले आहे का नाही, कसं तपासाल? लिंक नसेल तर बँक व व्यवहारांवर काय परिणाम होतो?”
राजूर वारीची वेळ आणि मार्ग
(Schedule and Route of Wari)
अंतर: जालना (भोकरदन नाका) ते राजूर मंदिर हे अंतर साधारण २५ ते २८ किमी आहे.
Angarika yog Rajur 2026: राजूरच्या या ऐतिहासिक वारीला अंगारकी चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सुरुवात होते. साधारणपणे संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास भक्तगण आपल्या वेळेनुसार पायी चालायला सुरुवात करतात. जालन्यातील ‘भोकरदन नाका’ हे या पायी वारीचे मुख्य केंद्र मानले जाते. इथून राजूरपर्यंतचे साधारण २५ ते २८ किलोमीटरचे अंतर कापताना भाविकांच्या उत्साहाला उधाण येते. ही वारी राजूरला साधारणतः रात्री २ ते २:३० वाजता, म्हणजेच अंगारकी चतुर्थी लागताच पोहोचते. पहाटेच्या मंगल समयी बाप्पाला नमस्कार करून ही वारी पूर्ण केली जाते.
पत्नीच्या नावावर पोस्टात संयुक्त खाते उघडा, कमवा ₹९,२५० प्रतिमाह! सुरक्षित सरकारी योजना
सेवा आणि भक्तीचा संगम
(Service to Devotees)
Angarika yog Rajur 2026: जालना ते राजूर या मार्गावर माणुसकीचे अनोखे दर्शन घडते. रावरभर चालणाऱ्या या भाविकांची सर्व व्यवस्था म्हणून रस्त्यावर जागोजागी अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था मदतीसाठी सज्ज असतात. पिण्याच्या पाण्याची, गरम दुधाची तसेच फराळाची सोय ठिकठिकाणी केली जाते. ही वारी पायी असते आणि रस्त्यावर भाविकांची अलोट गर्दी असते. भाविकांच्या मते, न थांबता ही वारी सतत केल्याने पाय दुखत नाहीत आणि बाप्पाच्या ओढीने हे अंतर सहज पार होते.
“घरबसल्या 2 लाखांपर्यंत पीक कर्ज: जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांसाठी नवी सुविधा”
वारीचा नवस आणि मनोकामना
(Vow and Wish Fulfillment)
राजूरचा हा महागणपती ‘मनोकामना वारी’ साठी ओळखला जातो. भाविक श्रद्धेने बाप्पाला वारीचा नवस बोलतात.
‘माझी ही इच्छा पूर्ण झाली की मी ५ किंवा ७ अंगारकी वारी पायी करेन’,
असा संकल्प भक्त करतात. नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भक्त न चुकता या कठीण वारीला पूर्ण करतात. अंगारकी योगाच्या दिवशी राजूरच्या पावन भूमीत माथा टेकवल्यावर मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
अंगारकी राजूर वारी म्हणजे भक्ती, शक्ती आणि सेवेचा त्रिवेणी संगम आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या वारीत सहभागी होऊन आपणही बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना.
आपल्यालाही माहिती आवडली असल्यास आपण इतरांना देखील शेअर करू शकता.
अधिक माहितीसाठी आपण या गणपती मंदिराच्या साईटला भेट द्या श्री क्षेत्र राजुर
![]()








