Table of Contents
ToggleAnnaprashan Sanskar 2024:अन्नप्राशन संस्काराबद्दल संपूर्ण माहिती
Annaprashan Sanskar 2024: मनुष्य जीवन जगण्यासाठी अन्न हा महत्त्वाचा घटक, सोळा संस्कारा पैकी एक बाळाला अन्न प्रति रुची निर्माण करणारा आहे.तो संस्कार म्हणजे अन्नप्राशन संस्कार.
आपल्या संस्कृतीत विविध वळणावर विविध संस्कार हे मनुष्य जीवन समृद्ध करण्यासाठी योजिले असावेत. जसे की नामकरण संस्कार या संस्कारामध्ये बाळाला जगामध्ये एक विशिष्ट अशी ओळख मिळते.
अन्न हे मनुष्य जीवनात अतिशय निगडित असलेला घटक, त्याबद्दल लहानपणापासूनच रुची निर्माण व्हावी. यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार सांगितले आहेत.
Annaprashan Sanskar 2024: १६ हिंदी संस्कारा आपण सध्या रोज पाहत आहोत, सोळा संस्कारांपैकी आज आपण एका महत्त्वाच्या संस्काराबद्दल माहिती घेणार आहोत.
याआधी आपण गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण,निष्क्रमण या संस्काराची माहिती लेखात पाहिली आहे आज आपण सातवा संस्कार अन्नप्राशन संस्काराबद्दल माहिती घेणार आहोत.
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन संस्कार
बाळाची आहाराप्रती रुचीपरिचय वाढवण्यासाठी तसेच पचनशक्ती अधिक चांगली करण्यासाठी हा संस्कार आवर्जून केल्या जातो.
अन्नप्राशन हा मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.अन्नप्राशन याचा अर्थ म्हणजे शिजवलेला भात होय. तसेच अन्नप्राशन म्हणजे उष्टावन असे देखील म्हटल्या जाते.सामान्यता आपल्याकडे बाळाला पहिला आहार किंवा पहिला पदार्थ खाण्याचा समारंभ म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव आहे त्याला अन्नप्राशन संस्कार म्हटले जाते.
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन संस्कार कधी करावे?
जेव्हा मूल ६ व्या किंवा ७व्या महिन्याचे होईल तेव्हा अन्नप्राशन संस्कार करणे चांगले आहे, कारण तोपर्यंत त्याचे दात बाहेर आले आहेत. अशा स्थितीत तो हलके दाणे पचवण्यास सक्षम असतो.
Annaprashan Sanskar 2024: महत्व अन्नप्राशन संस्काराचे
अन्नप्राशन संस्कार चे महत्व हे भगवद्गीते नुसार अन्न हे केवळ शरीराचे पोषण करत नसून ते मन बुद्धी ऊर्जा आणि आत्म्याचे ही पोषण करते. अन्न हे सजीवांचे जीवन आहे.
आपल्या शास्त्रानुसार शुद्ध आहार आणि शरीर आणि मन देखील शुद्ध आणि पवित्र राहते. उत्तम आरोग्यासाठी आणि आरोग्यात वाढ होण्यासाठी शुद्ध अन्न हे अतिशय महत्त्वाचे असते. अन्नप्राशन संस्करामध्ये अन्नप्राशनाद्वारे बाळाला शुद्ध सात्विक आणि पौष्टिक आहार घेण्यास प्राप्त केले जाते, जेणेकरून बाळाच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
अन्नप्राशन संस्काराची पद्धत ही शुभमुहूर्तावर आपल्या बाळास त्यांच्या पालकांनी करायची असते. Annaprashan Sanskar 2024: पालकांनी त्यांची श्रद्धा असलेल्या कोणत्याही देवी देवतांना तसेच कुलदैवताला स्मरून पहिल्यांदी बाळाला गोड किंवा तांदळाचे खिरीचा घास हा चांदीच्या वाटीतून चांदीच्या चमच्याने खायला घालतात.
अन्नप्राशन हा संस्कार मुलांमध्ये सम महिन्यात म्हणजेच सहाव्या किंवा ८ महिन्यात केला जातो तर मुलीच्या पाचव्या किंवा सातव्या महिन्यात देखील केला जातो असे देखील सांगण्यात येते.
त्यामुळे अन्नप्राशन संस्कारात बालकाला खाऊ घालताना या मंत्राचा जप करावा.
-शिवौ ते स्तां व्रीहियवावबलासावदोमधौ । एतौ यक्ष्मं वि वाधेते एतौ मुञ्चतो अंहसः॥ है।
घरात पैसा टिकून राहण्यासाठी चाणक्याची ही नीती, संपत्तीत सतत होत राहील वाढ
अर्थात – हे बालक! जव आणि तांदूळ तुझ्यासाठी मजबूत आणि पौष्टिक असू दे. कारण या दोन्ही गोष्टी क्षय-नाशक आणि देवान्न असल्याने पाप-नाशक आहेत.
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन संस्काराची विविध नावे
- बाळाला पहिला आहार किंवा पहिले अन्न भात खाण्याचा समारंभ म्हणून ओळखल्या जातो तो म्हणजे अन्नप्राशन संस्कार.
- या संस्कारास भारतातील विविध ठिकाणी विविध नावाने ओळखले जाते जसे की केरळमध्ये चोरूनू,
- तसेच भारताच्या पश्चिम भागात देखील म्हणजेच बंगालमध्ये मुखे भात या नावाने देखील हा संस्कार केल्या जातो. गढवाल टेकडी मध्ये भातखुलाई असे देखील म्हणतात या संस्काराला.
- हिमाचल प्रदेशमध्ये भाथ खुलाई म्हटले जाते, तर नेपाळमध्ये त्याला पासनी असे म्हणतात.
- हिंदू परंपरा आणि प्रथेनुसार अन्नप्राशन ही बाळाच्या जीवनात घन अन्न पदार्थाची सुरुवात करणारा विधी होय.
- बाळाच्या रोजच्या आहारात तुम्ही आता घनपदार्थ समाविष्ट करू शकतात तसेच दुग्धजन्य पदार्थ देखील समाविष्ट करू शकतात. बाळाच्या आहारात होणारा द्रव पदार्थ पासून ते घनपदार्थ पर्यंतचे संक्रमण या प्रकारे केल्या जाते.
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन कसा करतात साजरा
अन्नप्रासन हा संस्कार बाळाच्या द्रव आहारातून घन आहाराकडे संक्रमण करण्यास तयार असते तेव्हा हा संस्कार केला जातो, जसे की ६ महिन्यापासून ते ९ महिन्यापर्यंत किंवा बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आधीपर्यंत केला जातो.
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन कुठे करू शकतो?
म्हणतात ना हौशीला मोल नसतं मुख्यत्वे अन्नप्राशन संस्कार हा घरी किंवा मंदिरात केल्या जातो. पण सध्याच्या आधुनिक युगात काही पालक आपल्या पाल्याच्या प्रेमापोटी मोठ्या प्रमाणावर हा अन्नप्राशन सोहळा करतात. जसे की एखादा हॉल घेऊन
केरळमध्ये अनेक पालक गुरुवायूर या प्रसिद्ध हिंदू मंदिरात समारंभ करण्यास प्राधान्य देतात.
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन कसे केले जाते?
अन्नप्राशन समारंभ हा एखाद्या विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट वेळी पूर्वी त्यांच्या सल्ल्याने केला जातो, या दिवशी बाळाला नवीन कपडे घातले जातात, तसेच डेकोरेशन केल्या जाते. सुरुवातीला बाळाच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी हवन केल्या जाते त्यानंतर प्रसादाचे प्रतीकात्मक आहार किंवा घट्ट अन्नाचा पहिला घास हा बाळाला भरवल्या जातो.
Annaprashan Sanskar 2024: संकल्प
सर्वप्रथम आपण म्हणजेच पालकांनी असा संकल्प करावा की,
‘माझ्या बालकाला मातेच्या गर्भातील मलाचे प्राशनापासून झालेल्या दोषांचा नाश, शुद्ध अन्न इत्यादीकांची प्राप्ती, ब्रह्मवर्चसाचा (तेजाचा) लाभ, इंद्रिये आणि आयु यांची सिद्धी, बीजगर्भापासून झालेल्या पापांचे निरसन यांद्वारे श्री परमेश्वराची प्रीती होण्याकरिता ‘अन्नप्राशन’ नावाचा संस्कार करतो. आहे माझ्या बाळाचे अंगभूत श्री गणपतिपूजन, स्वसि्तवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करतो.’असा संकल्प देखील अन्नप्राशन संस्कारामध्ये महत्त्वाचा असून तो देखील केल्या जातो.
कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!
Nishkramana 6th Hindu Rites 2024: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा https://marathionlinetimes.com/entertainment/nishkramana-6th-hindu-rites-2024/
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन संस्काराचा विधी
संकल्प झाल्यावर देवतेच्या पुढे आपल्या उजवीकडे शुभ्र वस्त्रावर आईच्या मांडीवर पूर्व दिशेला तोंड करून बसलेल्या बालकास प्रथम अन्नप्राशन करवावे. दही, मध, तूप यांनी युक्त असे अन्न सोन्याच्या अथवा काशाच्या पात्रात ठेवून ‘हे अन्नपते ईश्वरा, आम्हाला आरोग्यकारक आणि पुष्टीदायक अन्न दे’, असे म्हणून सुवर्णयुक्त हस्ताने (हातात सोने घेऊन) अन्न घेऊन पहिला घास द्यावा. मग पोटभर जेवण झाल्यावर मुख धुऊन बालकाला भूमीवर बसवावे.
Annaprashan Sanskar 2024: जीविकापरीक्षा(असे देखील करून पहा )
अनेक धार्मिक समारंभात विविध आणि मजेशीर खेळ खेळले जातात, जसे की अन्नप्राश्य विधीमध्ये केळीच्या पानावर केव्हा चांदीच्या ताटात अनेक प्रतीकात्मक वस्तू ठेवल्या जातात.
तुमच्या बाळांसमोर शिक्षणाची प्रतीक असलेली काही पुस्तके ठेवा, संपत्तीचे प्रतीक असलेले काही दागिने ठेवा, शहाणपणाचे प्रतीक असलेले पेन आणि मालमत्तेचे प्रतीक असलेली माती ही बाळाच्या समोर ठेवा. अन्न वरील प्रेमाचे प्रतीक असलेले काही खाद्यपदार्थ तुम्ही बाळाच्या समोर ठेवा. जेव्हा बाळ त्याची निवड करतो तेव्हा कुटुंब आणि मित्रांना लहानांचा आनंद देण्यात चांगला वेळ असतो असे मानले जाते आणि बाळ जे सोमवार ठेवलेले वस्तू ला हात लावतो तो त्या क्षेत्रात आपले पुढचे भव्य दर्शवतो असे देखील मानल्या जाते.
Annaprashan Sanskar 2024: अन्नप्राशन करताना बाळाला कोणते दिले जातात पदार्थ?
बाळाच्या ताटात नाना रंगी आणि नाना ढंगी असे पदार्थ ताटामध्ये दिले जातात. काही गोड आणि साधे पदार्थ तसेच रुचकर पदार्थ या पदार्थांचा समावेश केल्या जातो. मऊ मऊ असा लुसलुशीत भात आणि तू तसेच साधे वरण. जे बाळाला खाल्ल्यानंतर पचायला सोपे जाते असे पदार्थ.काहींनी विस्तृत उत्सव साजरा करणे आणि खीरसह तळलेले तांदूळ ,पुलाव, भाज्या, ह्या देखील ठेवल्या जातात बाळाच्या समोर.
अमेय वाघ Amey Vagh Talented Actor :https://marathionlinetimes.com/entertainment/amey-vagh-talented-actor/
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….