Atul Kulkarni Story in Marathi:जाणून घेऊया या बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्याबद्दल..
Atul Kulkarni Story in Marathi: नमस्कार, सोमवारी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल लागला, आणि अनेक विद्यार्थ्यांना यश मिळालं, तर काहींना अपयश आलं. या क्षणी, यश आणि अपयशाच्या या दोन्ही बाजूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की, परीक्षेत आलेले यश किंवा अपयश हे अंतिम नाही. यापुढे देखील आपण यशाची शिखरे गाठू शकतो.
आज आपण पाहणार आहोत एक प्रेरणादायी गोष्ट, जी अतुल कुलकर्णीच्या (Atul Kulkarni Story) जीवनावर आधारित आहे. हा अभिनेता बारावीमध्ये नापास झाला होता, पण त्याने हार मानली नाही. आज तो बॉलीवूडमध्ये आपले नाव निर्माण करून यशाच्या शिखरावर आहे.
अतुल कुलकर्णी यांची ओळख ‘नटरंग’ या चित्रपटामुळे घराघरात झाली. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, जसे की ‘रंग दे बसंती’. त्याचबरोबर, दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे.
Atul Kulkarni Story in Marathi:बारावीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे तुमचं भविष्य थांबलं असं समजण्याची गरज नाही. आपल्याकडे आगळीवेगळी कला असू शकते, जी आपल्याला जीवनात एक वेगळा उंचीवर घेऊन जाऊ शकते. अनेक कलाकार आहेत, जे अभ्यासात टॉपर नव्हते, पण त्यांनी त्यांच्या विशेष गुणांना ओळखून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.
अतुल कुलकर्णी एका मुलाखतीत म्हणाले, “जर मी बारावीत उत्तम गुण मिळवून इंजिनिअरिंगला पास झालो असतो, तर कदाचित मी वेगळा माणूस झालो असतो. पण बारावीतल्या अपयशाचा काळ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. याच काळानं मला खरा माणूस बनवलं.”
Atul Kulkarni Story in Marathi:परीक्षेत अनेक जण पास झालेत, तर काही नापासही झालेत. यश आणि अपयशाच्या या क्षणी अनेकांना भविष्यात काय होईल याची चिंता सतावते. पण, परीक्षेतील यश हे सर्वस्व नसतं. गुण म्हणजे गुणवत्ता नाही. आपल्याकडे वेगळी कला असेल, तर आपण आयुष्याच्या परीक्षेत नक्कीच टॉप करू शकतो.
अतुल कुलकर्णी यांनी अपयश पचवून पुढे इंग्रजी साहित्यात बीए पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला आणि आज ते एक लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी ‘सागरीका गाडगे’ या अभिनेत्री सोबत, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘नटरंग’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!
अतुल कुलकर्णी यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की, अपयश आलं म्हणून थांबू नका. आयुष्याची शर्यत फक्त गुणांनी नाही, तर जिद्दीनेही जिंकता येते. त्यांच्या यशाची गोष्ट आपल्याला प्रेरणा देते की, आपल्याला आपल्या क्षमतांचा विश्वास ठेवावा लागतो आणि आपल्या स्वप्नांच्या मागे धावावे लागते.
अतुल कुलकर्णी यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्याला शिकवतो की, यशाची खरी व्याख्या म्हणजे आपल्या मेहनतीत आणि जिद्दीत आहे.
तसेच याचअभिनेत्याने आता झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून स्वतः कश्मीरमध्ये जाऊन सर्वांना ठरवलेली कश्मीरची सहल रद्द न करता आपण कश्मीर पाहायला यावे असे आवाहन केले.
Atul Kulkarni Story in Marathi:हाच बारावी नापास झालेल्या अभिनेता यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, वेगवेगळ्या भूमिका मधून हा आपल्या अभिनयाचा ठसा तसेच, अपयश आलं म्हणून न थांबता,आयुष्याची शर्यत फक्त गुणांनी नाही, तर जिद्दीनेही जिंकता येते सांगणारा!
मानसिक शांतता देणारे आणि संकटे दूर करणारे स्तोत्र! श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र!
“स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?”
“साडेतीन मुहूर्तापैकी शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया”
“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?
उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?