Bailpola and tahana pola in Marathi: मुलांमध्ये उत्साह निर्माण करणारीएक अनोखी परंपरा
Bailpola and tahana pola in Marathi: नमस्कार वाचकहो,उद्या आहे बैल पोळा, महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीमध्ये बैलपोळ्याला एक खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे शेतकरी आणि त्यांच्या बैलांच्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव. शेतकरी मित्राचा जिवाभावाचा सण म्हणजे बैलपोळा (Bailpola and tahana pola). चला तर मग आज या पोळ्या आणि यास विशेष करून विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कोणता सण साजरा करतात याबद्दल या लेखांमध्ये माहिती घेऊया.
पुरणपोळी अंगावरती झुली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घागर माळा घालून आपल्या लाडक्या बैलाला शेतकरी कसा सजवतो आणि गावभर मी राहतो.पण तुम्हाला माहिती आहे का,
याच बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात एक अनोखी परंपरा साजरी होते? या सणाचं नाव आहे तान्हा पोळा (tahana pola). हा सण खास लहान मुलांसाठी असतो, जिथे त्यांच्या निरागस आनंदाला एक वेगळं रूप मिळतं.
ऐकलं का तुम्ही? आता मुख्यमंत्री, पंतप्रधानही धोक्यात! नवीन विधेयक आज संसदेत सादर

विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा तान्हा पोळा आणि ‘बोजारा’
Tahana Pola and Bojara
Bailpola and tahana pola in Marathi:विदर्भात काही ठिकाणी तान्हा पोळ्याला एक मोठा उत्सव मानला जातो. नागपूर जिल्ह्यात तर हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. अनेक ठिकाणी लहान मुलांच्या लाकडी नंदीच्या सजवलेल्या बैलगाड्यांची स्पर्धाही भरवली जाते. ज्या मुलाचा बैल सर्वात सुंदर सजवलेला असतो, त्याला बक्षीस देऊन गौरवण्यात येतं. हा सण मुलांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि सर्जनशीलता निर्माण करतो.तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुलं उत्साहाने तयारी करतात. लाकडी नंदी सजवून ते आजूबाजूच्या घरोघरी गल्लीमध्ये फिरतात.
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना,पैसे सुरक्षित ठेवून करा दुप्पट!
Bailpola and tahana pola in Marathi:या लाकडी लाकडी नंदी ची एक पायऱ्या पायऱ्या ची गाडी मुद्दामून बनवून घेतात त्याला फुलांनी व रंगीत कागदांनी आकर्षकपणे सजवले जाते. फुगे रंगीत रोशनी देखील केली जाते जेणेकरून मुलांचा नंदी हा सुंदर देखना दिसावा.मुलं ही गाडी घेऊन घरोघरी जातात. घरो घरी फिरल्यावर त्या प्रत्येक घरात त्यांचे कौतुक केले जाते.लाकडी नंदी फिरवणाऱ्या मुलाला औक्षवंत करतात, आणि त्यांना बोजारा देतात. बोजारा म्हणजे ओवाळी पैसे किंवा भेटवस्तू होय.’आज आवतन घे, उद्या जेवायला ये…’पोळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच बैलपोळ्याच्या दिवशी, शेतकरी आपल्या बैलाची पूजा करून त्याला नैवेद्य खाऊ घालतो. त्यावेळी एक म्हण मोठ्या प्रेमाने बोलली जाते.
“आज आवतन घे,
उदया जेवायला ये,
मंग कासऱ्याने आवरी,
तुतारीने ढोशीन,
राग नको मानजू नंदीबैला.”
याचा अर्थ असा की, आज जेवण स्वीकार कर, उद्या देखील जेवायला ये, नंतर कासराने आवरू, तुतारीने तुला चल म्हणेल, पण राग मानू नकोस, माझ्या नंदीबैला! ही म्हण बैलांप्रति असलेल्या प्रेमाची आणि त्यांना कुटुंबाचा सदस्य मानणाऱ्या शेतकऱ्याची भावना दर्शवते.
गोडधोड आणि बैल
बैलपोळ्याला पुरणाची पोळी, ज्वारी बाजरीच्या घुगऱ्या, अळूच्या पानाचे वडे यासारखे पदार्थ बनवले जातात.

Bailpola and tahana pola in Marathi:बुलढाणा जिल्ह्यात आणि आसपासच्या गावांमध्ये बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलं मातीचे बैल घेऊन घरोघरी जातात आणि त्यांनाही गोडधोड आणि ‘बोजारा’ मिळतो.
अशाप्रकारे, जिथे बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या आणि त्याच्या प्राण्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे, तिथे ताना पोळा हा सण लहान मुलांच्या उत्साहाचं आणि आनंदाचं दर्शन घडवतो. हा सण आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीमध्ये एक अनोखं स्थान निर्माण करतो.
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तो तुम्ही इतरांना देखील शेअर करा