Bhulabai Girls Play game: आठवते आपल्याला लहानपणीची “भुलाबाई”

Bhulabai Girls Play game: “भुलाबाई” या उत्सवाबद्गदल माहिती

Bhulabai Girls Play game: भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत एक उत्सव साजरा करतो, हा उत्सव लहान मुली तसेच बायका देखील आनंदाने साजरा करतात. त्यालाच आपण भुलाबाई किंवा काही ठिकाणी गुलाबाई असेही संबोधले जाते. भुलाबाई म्हणजे आपली बाहुली.

Bhulabai Girls Play game: भाद्रपद पौर्णिमेपासून म्हणजे आपला गणपती बाप्पाचे विसर्जन झालेल्या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पासून सर्व मुली व स्त्रिया देखील खेळ खेळतात व गाणी गातात. या गाण्यांमध्ये देखील आपल्या जुन्या काही परंपरा या बोलून दाखवल्या जातात.

Bhulabai Girls Play game: हा उत्सव वेगवेगळ्या नावाने देखील पूर्ण महाराष्ट्रभर ओळखला जातो. मराठवाड्यात या उत्सवाला भुलाबाईची या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये या सणास या उत्सवास गुलोजी देखील म्हणतात.

Bhulabai Girls Play game: या उत्सव बऱ्याच ठिकाणी भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत म्हणजे एक महिनाभर साजरा करतात. तर काही ठिकाणी हा उत्सव ११ दिवस किंवा २१ दिवस देखील साजरा करतात.

Bhulabai Girls Play game: हा खेळ मुली सर्व एकत्रित मिळून गाणे म्हणतात, व आपापल्या डब्यात येताना खाऊ घेऊन येतात व तो एकमेकींनी ओळखायचा असतो. त्यासोबत गाणे म्हणता म्हणता त्या टिपऱ्या देखील खेळतात.

Bhulabai Girls Play game: भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस ते आश्विन पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या किंवा मातीच्या बाहुल्या बसवून साजरा करतात.

विद्या अभ्यासाची प्रगती व्हावी, शंकरा ( महादेव ) सारखा पती मिळावा, मुलींना खेळायला मिळावे, मैत्रिणींच्या संगतीत सहजीवन जगता यावे

Bhulabai Girls Play game: Bullet points

काही ठळक मुद्दे

Bhulabai Girls Play game: In short

भुलाबाईची माहिती थोडक्यात

Bhulabai Girls Play game: Story about Bhulabai

भुलाबाईची प्रसिद्ध आख्यायिका

Bhulabai Traditional Girls Play game: More information

भुलाबाईची अधिक माहिती

Bhulabai Girls Play game: Pooja

भुलाबाईची पूजा

Bhulabai Girls Play game: Songs

भुलाबाईची गाणी

Bhulabai Girls Play game: In short

भुलाबाईची माहिती थोडक्यात

उत्सवाचे नाव भुलाबाईचा उत्सव
हा उत्सव कधी सुरू होतो १८ सप्टेंबर ते १६ ऑक्पटोबर भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी
हा उत्सव कधी संपतो कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच अश्विनी पौर्णिमा
या उत्सव कशाचे प्रतीक आहे हा उत्सव भगवान शंकर आणि पार्वतीचे प्रतीक आहे

Bhulabai Girls Play game: Story about Bhulabai

भुलाबाईची प्रसिद्ध आख्यायिका

Bhulabai Girls Play game : भुलाबाई म्हणजे आपली पार्वती देवी. पार्बावती देवी म्ईहणजे परब्रह्मस्वरूपीनी होय. भुलाबाई च्या संदर्भातील एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ती म्हणजे म्हणजेच पाय एकदा एकदा पार्पवती आणि शंकर भगवान हे कैलास पर्वता सारीपाटाचा खेळ खेळत होते.या सारीपाटाच्या खेळामध्येये देवी पार्वती कडून शंकर भगवान हे खेळ हरले.

सारीपाटाचा खेळ हरल्यामुळे भगवान शंकर हे कैलास सोडून निघून गेले. त्यावेळेस देवी पार्वतीला रुसलेल्या शंकरास कैलास पर्वतावर वापस आणायचे होते. त्यावेळेस देवी पार्वती हिने भिल्लीनीचे रूप घेतले.

देवी पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन भगवान शंकरा समोर नृत्य केले व त्यांना प्रसन्न करून घेतले. पार्तीवती देवीच्या या सुंदर आणि मोहक भिल्लीच्या रूपाला भगवान शंकर हे भुलले म्हणून त्यांना म्हणजेच भगवान शंकराला बुलोबा किंवा भुलोजी म्हणतात. तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मुर्ती स्थापन करतात. पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पुर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता देखील मर्यादित झाला आहे.

Bhulabai Girls Play game: Pooja

भुलाबाईची पूजा

हा खेळ खेळताना रोज आधी सर्व मुली एक-एक करून आपल्या प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जमतात. त्या सर्व मुली, टिपऱ्या खेळत खेळत गाणी म्हणतात. सर्व मुली एक एक करून गुलाबाचे, व रोज हार घालतात. तसेच धूप दीप व भुलाबाईचे गाणे म्हटल्यानंतर तिला नैवेद्य देखील दाखवतात आणि आरती करतात. एक मजेशीर गोष्ट म्हणजे खाऊ खाताना मुली आपला डबा वाजवतात व बाकीच्या मुली त्या आवाजा नुसार त्या डब्यात काय आहे ते ओळखतात व “भुलाबाई भुलाबाई खाऊच काय’ ? असे म्हणतात. खाऊ ओळखणे हा देखील एक खेळाचा भाग आहे.

Bhulabai Girls Play game: More information

भुलाबाईची अधिक माहिती

पूर्वीच्या काळी स्त्रियांना काम केल्यानंतर काही मनोरंजनाचे साधन नव्हते. त्यावेळेस रिया या अशा वेगवेगळे उत्सव साजरे करून आपले मनोरंजन करीत व त्यानिमित्ताने त्यांना रोजच्या कामातून तसेच आपल्या मैत्रिणी सोबत वेळ घालवायला मिळत.

पूर्वी अगदी महिनाभर स्त्रिया व मुली ह्या साजरा करत. आता या सणाचे या उत्सवाचे स्वरूपा अगदी महिन्यासून ते आता ११ किंवा २१ दिवसांवर आले आहे. या सणासाठी पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त प्रमाणात मातीच्या मुर्त्या विकत घेऊन हाच उत्सव साजरा होत असे. या उत्सवात मुर्त्यांमध्ये कोणी भुलाबाई व भुलोजी असे संबोधल्या जात.

या मुर्त्यांना हौशी मुली व स्त्रिया या नऊवारी सहावारी किंवा नवीन प्रकारच्या किंवा गुजराती वेशभूषा करत. या मूर्तीमध्ये भुलाबाई च्या मांडीवर बाळ असते तर दुसऱ्या बाजूस भुलोजी उभा असतात.

पूर्वीच्या काळी स्त्रिया आणि मुली दोघांना रोजच्या कामातून वेळ काढून एकत्र येऊन वेळ मिळाला कि त्या एकत्र येऊन ह्या देवी पार्वती आणि शिव म्हणजेच भुलोजी- भुलाबाई , गुलाबाई आणि गुलोजी च्या रूपात त्यांचे स्मरण करतात.

श्रावण महिन्यानंतर हा भुलोजी- भुलाबाई गुलोजी, गुलाबाई हा सण स्त्रिया शिव पार्वतीचे प्रतीक म्हणून साजरी करतात .

हा उत्मसव महिनाभर अतिशय आनंदाने व प्रेमाने एकत्र येऊन गाणे गात आणि वेगवेगळे खेळ खेळत साजरा केला जातो. आणि ह्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच या पौर्णिमेला शरद पौर्णिमेला ह्या सणाचे सर्व जण मिळून रात्रभर जागरण करतात . त्त्यावेळेस सर्व मुली व स्त्रिया या भुलाबाईच्या मूर्ती एकत्र आणून एका ठिकाणी पाटावर ठेवून अगदी छान असं सजवतात.

या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आठवतात. व आटवलेल्या दुधामध्ये शरद पौर्णिमेचा चंद्र पाहतात व ते पवित्र असे दूध सर्वांना देतात. तसेच चंद्राचे पावित्र्य असणारे हे दूध चंद्राचा आशीर्वाद व चंद्रासारखी शीतलता प्राप्त व्हावी यासाठी देखील दिल्या जाते.

काही मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री फक्त चंद्राच्या उजेडामध्ये दोरा ओवतात, त्यामुळे आपले डोळे हे चांगले राहतात असे म्हणतात. व कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गाणे म्हणत म्हणत जागरण देखील करतात. तसेच वेगवेगळ्या पदार्थाचे खाऊ केल्या जाते. अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी 32 खाऊ करून भूलाबाई नैवेद्य दाखवल्या जातो. तर कुठे आणि खाद्यपदार्थ करून नैवेद्य दाखवला जातो. या उत्सवाची सांगता ही आश्विन पौर्णिमा म्हणजेच पूजागिरी पौर्णिमा या दिवशी सांगता होते.भूमी व मूर्तीचे आरती करून विसर्जन केल्या जाते.

मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या

गणपती विसर्जन https://marathionlinetimes.com/ganpati-visarjan-means-anant-chaturdshi/

गौरी गणपतीचा सण https://marathionlinetimes.com/gauri-ganpti-an-inseparable-pair/

गणपती बाप्पा मोरया द हार्ड बीटhttp://Ganpati Bappa Morya The Heartbeat:

Kartik Aryan Handsome Actor: https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/

Riteish And Genelia Cute Couple: आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Bhulabai Girls Play game:

Bhulabai Girls Play game: Songs

भुलाबाईची गाणी

  • पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे

पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे

साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा

खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी

अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी

गंगेच्या पाण्याने वेळवीला भात

जेविता कंठ राणा भुलाबाईचा.

ठोकीला राळा हनुमंत बाळा

हनुमंत बाळाचे लांब लांब झोके

टिकाऊचे डोळे हात पाय गोरे

भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी

झळकतीचे एकच पान

दुरून भुलाबाई नमस्कार

  • कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला

मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला

  • आरती जाऊ बाई खिडकीत जाऊ

अडकित जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होता होते ताम्हण

 भुलोजीला मुलगा झालानाव ठेवा वामन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता

भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता

अडकित जाऊ खिडकीत जाऊ

खिडकीत होती वांगी

भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा हेमांगी

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी

भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा गौरी

अडकित जाऊ खिडकीत जाऊ

खिडकीत होती पणती

भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा मालती

अडकित जाऊ खिडकीत जाऊ

खिडकीत होती घागर

भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सागर

Bhulabai Girls Play game:
  • सा बाई सु, सा बाई सु,

सा बाई सु, सा बाई सु,बेलाच्या झाडाखाली

महादेवा तू रे महादेवा तू

हार गुंफिला, विडा रंगीला

झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला॥

सा बाई सु, सा बाई सु,

बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू

हार गुंफिला, विडा रंगीला

गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला॥

सा बाई सु, सा बाई सु,

बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू

हार गुंफिला, विडा रंगीला मोगऱ्याची फुले माझ्या भुलाबाईला रे

माझ्या भुलाबाईला॥

  • एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू

एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू

पाचा लिंबाचा पानोठा,

माळ घालू हनुमंता

हनुमंताची निळी होडी

येता जाता कमळ तोडी

कमळाच्या पाठीमागे लपली राणी

अग अग राणी इथे कुठे पाणी

पाणी नव्हे यमुना जमुना

  • आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय 

आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय 

लेकी भुलाबाई साखरे लेवून जाय 

कशी येऊन जाय, कधी येऊ दादा, 

घरी नंदा जावा, करतील माझा हेवा, 

नंदाचा बैल येईल डोलत, 

सोन्याचं कारलं शहाजीरा बाई गोजिर,

एवढीशी गंगा झुळझुळ वाहे 

तांब्या पितळी नाय गं

हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपलीस 

सरपाआड लपली 

 दादा पेटले जाई अंबा पिकला

  • अरे भगवंता कमलाकांता

अरे भगवंता कमलाकांता असं असं कसं झालं बाई वेड्या कुड माझ्या नशिबी आलं 

वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने लाडू पाहिल

लाडू लाडू म्हणतात त्याने चेंडू म्हणून त्याने आकाशी भेटले 

अरे भगवंता कमलाकांता असं कसं झाले वेड्याच कुड माझ्या नशिबी आले 

वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या 

तिकडून आला वेड्या त्याने करंज्या पाहिल्या होडी होडी म्हणून त्याने पाण्यात टाकल्या 

अरे भगवंता कमलाकांता असं कसं झाले वेड्याच कुड माझ्या नशिबी आलं 

वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या

तिकडून आला वेड्या त्यानेच केल्या पाहिल्या

बांगड्या बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या 

अरे भगवंता कमलाकांता कमलाकांता असं कसं झालं वेड्याच कोड माझ्या नशिबी आले. 

वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड

तिकडून आला वेडा त्यांनी श्रीखंड पाहिलं 

क्रीम क्रीम म्हणून त्याने ते तोंडाला फासले 

श्रीकांता कमला कांता असं कसं झाले वेड्याचे फूड माझ्या नशिबी आलं

वेड्याची बायको झोपली होती 

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिलं 

मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली.

  • खिरापत

भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।

पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।

गेल्या बरोबर पाट बसायला । ताट जेवायला | विनंती करून यशोदेला ।

आना आना खिरापत आना

Bhulabai Girls Play game:

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-annpurna-yojana-2024/

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024

मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:

Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram