Bornahan 2026 Marathi Info: आपले बालपण बाळात पाहण्याचा आनंद म्हणजे बोरन्हाण; झाली का तयारी मग आनंदाच्या लुटीची?

Bornahan 2026 Marathi Info: जाणून घ्या महत्वपूर्ण थोडक्यात माहिती

Bornahan 2026 Marathi Info: मकर संक्रांतीची गडबड काही वेगळीच,घरोघरी तिळगुळाचे लाडू, सुवासिनींची वाण देण्याची लगबग व आकाशात झेपावणारे रंगीबेरंगी पतंग.पण ज्यांच्या घरी लहान बाळ आहे, त्यांच्याकडची ‘बोरन्हाणाची’ (Bornahan) गडबड तर काही औरच असते,
संक्रांत म्हटलं की सुवासिनींचा सण म्हणून होणारी धावपळ असतेच, पण या दरम्यान ज्यांच्याकडे लहान बाळ आहे, त्यांच्याकडची बोरन्हाणाची मजा अगदी आवर्जून पाहण्यासारखी असते. खरंच, हे बोरन्हाण म्हणजे आपल्याला आपले स्वतःचे बालपण बाळात पुन्हा एकदा पाहण्याचा आनंद देणारा सोहळा! बोरं, उसाचे गंडे आणि चॉकलेट लुटण्याची मजा काही वेगळीच असते. चला तर मग, आज आपण आपलं बालपण परत एकदा थोडक्यात डोळ्याखालून घालूया… आजचा हा विशेष लेख खास तुमच्या लाडक्या बाळाच्या ‘बोरन्हाण’ सोहळ्यासाठी.

“न खाई भोगी, तो सदा रोगी”,जाणून घ्या २०२६ मध्ये भोगी कशी साजरी करावी? महत्त्व, मुहूर्त आणि पारंपारिक रेसिपी!


बोरन्हाण म्हणजे नक्की काय?

(What is Bornahan?)


बोरन्हाण किंवा ‘बोरनहाण’ हा लहान मुलांसाठी (जन्मलेल्या बाळापासून ते ५ वर्षांपर्यंत) केला जाणारा एक पारंपरिक संस्कार सोहळा आहे. महाराष्ट्रात याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. थंडीच्या दिवसांत येणारी फळे आणि पौष्टिक पदार्थ लहान मुलांनी आनंदाने खावेत आणि त्यांना आशीर्वाद मिळावा, या हेतूने हे ‘फळांचे स्नान’ घातले जाते.


बोरन्हाण कधी करावे? (मुहूर्त आणि महत्त्व २०२६)

(when Bornahan celerbrats?)


बऱ्याच लोकांचा असा समज असतो की बोरन्हाण रथसप्तमीपर्यंत कधीही चालते, पण अभ्यासपूर्ण माहितीनुसार:

किंक्रांत (करिदिन) विशेष: मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला ‘किंक्रांत’ किंवा ‘करिदिन’ म्हणतात. प्रामुख्याने किंक्रांतीच्या दिवशीच बोरन्हाण करण्याची मुख्य परंपरा आहे.

तारीख: यंदा १४ जानेवारीला संक्रांत असून १५ जानेवारी २०२६ (किंक्रांत) हा दिवस बोरन्हाणासाठी सर्वात उत्तम आहे.

अंतिम मुदत: संक्रांतीपासून सुरू करून १८ जानेवारी २०२६ (अमावस्या) पर्यंत शक्यतो बोरन्हाण उरकले जाते. त्यानंतर ते करू नये, असा संकेत आहे.


बोरन्हाणाची पारंपरिक विधी: ‘शेर’ आणि ‘मापाची’ पद्धत
बोरन्हाण घालण्याची ही अस्सल जुनी पद्धत आजही ग्रामीण आणि शहरी भागात आवर्जून पाळली जाते.


साहित्याचे मिश्रण:

बोरन्हाण म्हणजे केवळ बोरं नसून त्यात अनेक गोष्टींचे मिश्रण असते. घरातील तांदूळ मोजण्याचे तांब्याचे किंवा पितळाचे ‘माप’ (ज्याला शेर किंवा आदली म्हणतात) घेतले जाते. यात खालील गोष्टी भरल्या जातात:

मोसमी फळे: डहाळीची ताजी गोड बोरं, उसाचे छोटे तुकडे, गाजराच्या चकत्या.

नवे पीक: ओला हरभरा (ज्याला हरभऱ्याचे घाटे म्हणतात), चिरमुरे आणि हलवा.

मुलांचा खाऊ: छोट्या रंगीबेरंगी गोळ्या, विविध प्रकारची चॉकलेटे आणि छोटी बिस्किटे.


बाळाचे नटणे:

बाळाला आवर्जून काळ्या रंगाचे नवीन कपडे (काळा झबला किंवा परकर-पोलके) घातले जातात. त्यावर पांढऱ्या शुभ्र हलव्याचे दागिने (जसे की मुकुट, हार, कंबरपट्टा, अंगठी आणि वाकी) घालून बाळाला अगदी कृष्णकन्हैयासारखे सजवले जाते.


सर्वप्रथम बाळाला पाटावर बसवून त्याचे प्रेमाने औक्षण (ओवाळणी) केले जाते. त्यानंतर आई किंवा आजी ते भरलेले ‘शेर’ किंवा ‘माप’ दोन्ही हातांनी पकडून, त्यातील सर्व मिश्रण बाळाच्या डोक्यावरून अगदी हळुवारपणे ओततात.

तुमच्या लाडकाय लेकीचे भविष्य करा सुरक्षित! हे नवीन सुकन्या समृद्धी योजनेचे २०२६ चे व्याजदर!

आनंदाची लूट:

जेव्हा हे मिश्रण बाळाच्या डोक्यावरून खाली जमिनीवर पडते, तेव्हा आजूबाजूला जमलेली इतर लहान मुले मोठ्या उत्साहाने ती बोरं आणि चॉकलेटे गोळा करण्यासाठी तुटून पडतात. हा सोहळा पाहणे म्हणजे बालपणीच्या आठवणीत रमण्यासारखे असते.
बोरन्हाणाचे फायदे आणि महत्त्व

आरोग्यदायी: या काळात हवामान बदलते, मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना मोसमी फळांची सवय लावली जाते.

शिशुसंस्कार: मुलाच्या मनातील भीती जाऊन त्याला समूहात मिसळण्याची सवय लागते.

नकारात्मकता दूर करणे: बाळाला कोणाची वाईट नजर लागू नये, या श्रद्धेने हा सोहळा केला जातो.
महत्त्वाची खबरदारी:

लहान मुले जेव्हा ‘लूट’ गोळा करण्यासाठी धावतात, तेव्हा बाळाला किंवा इतर मुलांना ओढाताणीत इजा होणार नाही याची काळजी मोठ्या माणसांनी घ्यावी.

 “PAN–आधार लिंक झाले आहे का नाही, कसं तपासाल? लिंक नसेल तर बँक व व्यवहारांवर काय परिणाम होतो?”


बोरन्हाण हा केवळ एक सण नसून तो आपल्या संस्कृतीचा आणि बालपणीच्या निरागस आनंदाचा अनमोल ठेवा आहे. तर मग, तुमच्याही घरात लहान बाळ असेल, तर यंदाच्या किंक्रांतीला ‘मापाने’ बोरन्हाण घालून ‘आनंदाची लूट’ नक्की करा!

Loading