Table of Contents
ToggleDhantrayodashi Festival 2024: जाणून घ्या धनत्रयोदशीचे मुहूर्त व संपूर्ण माहिती
Dhantrayodashi Festival 2024: भारतीय संस्कृतीमध्ये विविध उत्सव असून, आता वर्षाचा दिवाळी म्हटलं की दारासमोर रांगोळी. संध्याकाळी घरात समोर लावल्या जाणारे दिवे,आकाश कंदील,विविध पद्धतीची रोशन आपल्याकडे दिवाळीला करतात.
तिमिरातून तेजाकडे, अंधःकाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दीपोत्सवाला वर्षभरात येणाऱ्या सण-उत्सवांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवाळीचा सण हा चातुर्मासातील अखेरचा मोठा सण.
धनत्रयोदशी किंवा धनतेरस दोन शब्दांपासून बनलेली आहे, पहिला शब्द ‘धन’ म्हणजे संपत्ती आणि दुसरा ‘तेरस किंवा त्रयोदशी’. धनतेरसचा दिवस धन्वंतरी त्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो.
Dhantrayodashi Festival 2024: दिवाळी हा सण पाच दिवसांचा असून त्यात वसुबारस पासून दिवाळी हा सण सुरुवात होतो त्यानंतर येतो तो म्हणजे धनत्रयोदशीचा सण.
Dhantrodashi Festival 2024:धनत्रयोदशी
धनत्रयोदशी हा सण भगवान श्री विष्णू यांच्या धन्वंतरी या अवताराच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू यांनी यांचा धनवंतरी या अवताराची पूजा केली जाते.
विश्वातील पहिली चिकित्सक देवता आहे.
Dhantrayodashi Festival 2024:कधी धनत्रयोदशी कधी आहे धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात.दिवाळीतील धनत्रयोदशी किंवा धनतेरस दोन शब्दांपासून बनलेली आहे, पहिला शब्द ‘धन’ म्हणजे संपत्ती आणि दुसरा ‘तेरस किंवा त्रयोदशी’. धनतेरसचा दिवस धन्वंतरी त्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव मानले जातात.
Dhantrayodashi Festival 2024:धनत्रयोदशी प्रारंभ आणि समाप्ती
धनत्रयोदशी तिथीची सुरुवात २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३१ मिनिटांपासून होईल. ते धनत्रयोदशीची समाप्ती ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे. मात्र उदया तिथीनुसार, धनत्रयोदशी २९ ऑक्टोबरला साजरी केली जाईल.
Dhantrayodashi Festival 2024: धनत्रयोदशी पूजेचा मुहूर्त
यंदा पूजेचा शुभ मुहूर्त २९ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजून ४ मिनिटे ते ८ वाजून २७ मिनिटापर्यंत असेल, अशात तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे १ तास २३ मिनिटांचा वेळ मिळेल.
प्रदोष काळ – १७:३८ ते २०:१३ मिनिटापर्यंत राहील.
Dhantrodashi Festival 2024:धन्वंतरी या आरोग्याची देवता संबोधल्या जाणाऱ्या अवताराची पूजा केल्या जाते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक क्षेत्राला आणि क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींना महत्त्व आहे. प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता यांची पूजा करते.
धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक ठिकाणी संगीत रजनीच्या मोठा कार्यक्रम केला जातो. तसेच अनेक परिवार धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा देखील करतात.
Dhantrayodashi Festival 2024: केल्या जाते सोन्याची पूजा
आपल्या घरी असलेल्या सोन्याची देखील या दिवशी पूजा केली जाते. घरातील सोने एका तामनामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवले जाते, दूध आणि पाण्याने पूजा केल्यानंतर हळदीकुंकू वाहून फुल वाहिले जाते, अशा पद्धतीने थोडक्यात सोन्याची देखील पूजा केली जाते.
Dhantrayodashi Festival 2024:आख्यायिका
धनत्रयोदशी या सणामागे एक आख्यायिका देखील आहे ती आख्यायिका अशी आहे, कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो, आपल्या पुत्राचे जीवन सर्व सुख उपभोगीत म्हणून हेम राजा आपल्या पुत्राचे लग्न करतो, लग्नानंतर चौथ्या दिवशी राज्याचा मुलगा मृत्यूमुखी पडणार असतो, या रात्री राजाची राणी त्याला झोपू देत नाही.
अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा या राजाच्या बाजूला ठेवल्या जातात, महालाच्या प्रवेशद्वारही असे सोन्याच्या चांदी ने भरून ठेवले जातात, सर्व महालात मोठ्या मोठ्या दिव्यांनी प्रकाश केला जाते. राणी ही राजाला विविध गोष्टी आणि गाणी सांगून जागी ठेवते तेव्हा एम हा राजकुमाराच्या खोलीत सर्व रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा त्याची डोळे हे सोन्या चांदीने दिपतात.
यमदेवाचे डोळे सोन्या-चांदीने आपल्या दिपल्यानंतर यामध्ये बदाही यमलोकात परतून जाते. अशा पद्धतीने राजकुमाराचे प्राण वाचवले जाते म्हणून या दिवसास यमदीपदान असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराच्या बाहेर दिवे लावले जातात. व दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे केली जाते त्यामुळे मृत्यू टाळतो असे देखील म्हणतात.
Dhantrayodashi Festival 2024:दंतकथा
इंद्रदेवाने जेव्हा असूरांबरोबर संबंध मंथन केले त्यावेळेस त्यातून लक्ष्मी देवी प्रकट झाली, त्याच वेळेस धन्वंतरी अमृतकुंडातून कुंभ घेऊन बाहेर आली. आरोग्य प्राप्ती हीच खरी लक्ष्मी आहे. समुद्रमंथनातून दुधाच्या सागरात एक रत्न अवतरले ते रत्न म्हणजे धनगरी देव. असुरांनी मंदार पर्वत वादकीय सर्वांनी केल्यानंतर मंथनातून अमृताचा कलश घेऊन अवतरली देवता म्हणजे धन्वंतरी जिल्हा चार हातांपैकी एका हातात शंख,एका हातात चक्र,एका हातात जळू तर एका हातात अमृताचा कलश आहे.
अमृताच्या वर्षाचा मोह असुरांना होता म्हणून त्यांनी तो हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस भगवान श्री विष्णू यांनी मोहिनीचा अवतार घेऊन अमृत कसे कलश असूरांकडून परत हिसकावून घेतला अशी देखील आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो.
Dhantrayodashi Festival 2024: धन्वंतरी
आपल्या चार हातात अवघ्या भूतलावर असलेल्या प्राण्यांचे आरोग्य संपदा ही धन्वंतरी सामावून घेते, पृथ्वीतला वरती प्रथम 14 प्रज्ञांपैकी एक पहिले चिकित्सक मनुष्याच्या शरीर मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी अवतरलेले भगवान श्री विष्णू यांचे धन्वंतरी रूप, ज्यावेळेस प्रकट झाले तो दिवस म्हणजे धनतेरस.
धन्वंतरी शस्त्रक्रियेचे ज्ञान भगवान सुश्रुताचार्यांना दिले. सुश्रुताचार्य हे शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात.आयुर्वेदाचे धन्वंतरींकडून मिळालेले ज्ञान चरकाचार्यांनी वृद्धिंगत केले.
Dhantrayodashi Festival 2024: भूतलावरील सर्व पंचभौतिकांच्या प्रयोगाने चरकसंहिता चिकित्सा ग्रंथ निर्माण झाला. चरकाचार्यांच्या या ग्रंथात कोणत्याही युगात निर्माण झालेल्या, होणाऱ्या व्याधींचे वर्णन दिसून येते सुश्रुताचार्य भूल देऊन अनेक शस्त्रक्रिया ह्या सफल करून दाखवण्याचा उल्लेख देखील आपल्या ग्रंथात आढळतो.धन्वंतरींना विष्णूचा अवतार मानले जाते. धन्वंतरींच्या वडिलांचे नाव होते दिर्धात्मा ,ज्यांचा आणखी एक पुत्र असल्याचा उल्लेख आढळतो. धन्वंतरींना केतुमान नावाचा पुत्र होता भीमरथ हा धन्वंतरीचा नातू, केतुमानचा पुत्र. भीमरथपुत्र दिवोदास दिवोदासचा पुत्र द्युमन, ज्यास प्रतर दान नावानेही ओळखले जात असे. धन्वंतरींच्या परिवारात आयुर्वेद एवढा रुजलाच नाही, तर आयुर्वेद भगवान धन्वंतरींकडून गुरू-शिष्य परंपरेने प्रसारित झाला, ही आयुर्वेदाची परंपरा आजही भारतात दिसून येते.
वसुबारस दिवाळीचा शुभारंभhttps://marathionlinetimes.com/entertainment/vasubaras-diwali-2024/
डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
Dhantrayodashi Festival 2024:धनवंतरी चे मंदिर
धनवंतरी देवाचे मंदिर हे आपल्या भारतात असून, ते गुजरात राज्यामध्ये आहे. गुजरात राज्यामध्ये एकमेव धन्वंतरीचे मंदिर असून परंतु त्यामध्ये धन्वंतरीची मूर्ती आढळत नाही.
तसेच दक्षिणेस धन्वंतरी मूर्ती आढळतात व त्याची पूजा ही देखील नियमितरीत्या केली जाते.
देशा आपल्या देशातील तमिळनाडू राज्यात श्री रंगनाथ स्वामी मंदिरात देखील धन्वंतरीचे देव असून, नितीन नेमाने पूजा केली जाते. हे धन्वंतरी देवी देवाचे मंदिर 12 व्या शतकात कोरलेले असावे असा देखील अंदाजा आहे.
हे मंदिर 12 व्या शतकात कोरलेले काळातील प्रसिद्ध वैद्य गरुड वाहन भत्तर ह्यांची माहिती आढळते. या मंदिरात आजही धन्वंतरीचा प्रसाद म्हणून विविध वनस्पतींचे उकळलेले मिश्रण तीर्थ म्हणून भक्तांना दिले जाते.
उत्तरेत मात्र केवळ भगवान धन्वंतरीचे मंदिर आढळत नाही त्याचे कारणसुद्धा स्पष्टपणे सांगता येत नाही. वाराणसीतील संस्कृत विद्यालयात धन्वंतरीची मूर्ती तेथील संग्रहालयात आढळते, केरळमध्ये मंदिर स्वरूपात ही मूर्ती दिसून येते. त्यावरून भक्तीचे प्रमाण पुरण काळापासून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गुजरातमध्ये भगवान धन्वंतरीची समाधी असल्याची कथा असून, त्यांचा शास्त्रीय उल्लेख इतिहास पुराणात आढळत नाही. (ज्या व्यक्तींना याबद्दल निश्चित माहिती असेल त्यांनी पुराव्यासह त्या जरूर लोकांसमोर मांडाव्यात.)
भगवान धन्वंतरी आज केवळ महाराष्ट्र भारतापुरते मर्यादित नसून, जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या गुणांनी प्रसिद्ध झाले आहे.त्यांच्या विविध रूपांचे, चित्रांचे अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटनमध्ये पूजन होताना दिसते. आजही सर्वत्र सर्व वैद्य, चिकित्सक चिकित्सा बल, शक्ती वाढविण्यासाठी धन्वंतरीकडे प्रार्थना करतात. परंतु, सामान्य व्यक्ती आरोग्य रक्षणासाठी, दोषमुक्तीसाठी इच्छा प्रदर्शित करतील. आज विविध विषाणूंच्या वाढीच्या काळात, मानवासाठी धोकादायक व्याधींच्या प्रसाराच्या काळात भगवान धन्वंतरींचे आशीर्वाद सर्वांसाठी हवेत तशी प्रार्थना या विश्वातील प्रथम चिकित्सकाकडे करूया.
श्रीधन्वंतरी ये नम:
कासास्य कसी तत पुरो ,राष्ट्रो दीर्घतम: पिता धन्वंतरी दीर्घतमसा, आयुर्वेद प्रवर्तक: यज्ञ भुग वसुदेवा:, स्मृता: मात्र आर्तिनाशक !
इति शम…
चातुर्मासातील प्रत्येक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना जसे महत्त्व आहे, तसेच दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे. वसुबारसनंतर दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.