Table of Contents
ToggleDohaljewan Colorful Attires 2024: चांदण्याची चोळी, तांबड फुटायची चोळी
Dohaljewan Colorful Attires 2024: एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिच्यात होणारे सतत बदल आणि बदलणारे भाव हे अगदी तिच्या जीवनात येणाऱ्या नवीन अनुभव असतो. अशा वेळेस प्रेमाने होणारे बदल स्वीकारताना आपल्या संस्कृतीत गर्भवती स्त्रीस आनंदी ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या चोळ्या घातल्या जातात.म्हणजे डोहाळे जेवण केल्या जाते.
हौसेला मोल नसतं म्हणतात तसं विविध प्रकारच्या चोळ्या घालण्याची संस्कृती आपल्या आपल्याकडे आहे. त्यात चोरी चोरी, बागेतली जोडी, चांदण्याची चोळी, तांबड फुटायची चोळी म्हणजे (ऊन सूर्योदयाच्या वेळी) असे कार्यक्रम केले जातात जेणेकरून गर्भवती स्त्रीचे मन हे प्रफुल्लित होते.
Dohaljewan Colorful Attires 2024: बागेतील चोळी
बागेत तिच्या सर्व मैत्रिणी व नातेवाईक मिळून तिला गर्भवती स्त्रीला फुलांचा साज घालून डोहाळे म्हणतात आणि तिच्या आवडीचा पदार्थ तिला खायला तात आणि सर्वांना देखील व त्यावेळेस तिला साडी घरची मंडळी साडी देऊन कौतुक करतात आणि ओटी भरतात.
Dohaljewan Colorful Attires 2024: चांदण्याची चोळी
चांदण्याची चोळी ही पौर्णिमेच्या रात्री घेतल्या जाते गर्भवती स्त्री. त्यावेळेस तिला पांढऱ्या रंगाची चमकणारी साडी ही मुद्दामून दिल्या जाते. आणि त्यावर नक्षी केलेली असल्यास ती चमकते जेणेकरून ती चांदण्याची चोळी वाटते. त्यावेळेस नातेवाईक मंडळींना दूध किंवा अनारसे असा पदार्थ खावयास देतात आणि गर्भवती स्त्री देखील पांढरा पदार्थ खाण्यास देतात.
Dohaljewan Colorful Attires 2024:तांबड फुटायची चोळी (सकाळच्या उन्हाची चोळी)
ही चोळी तिच्या नावाप्रमाणेच सकाळच्या वेळेस घातल्या जाते त्यावेळेस घरातील मंडळी तिला पिवळ्या व केशरी रंगाची चोळी म्हणजेच साडी देतात,ओटी भरतात व त्यावेळेस पिवळ्या रंगाची जिलेबी किंवा अनारसा हे खावयास देतात आणि डोहाळे म्हणतात.
गरोदरपणी बदलणारे हा भाव आणि होणारा शारीरिक बदल हा सुखावणारा असतो तर थोडा त्रासदायक देखील. सासरचे मंडळी व माहेरची मंडळी आपल्या लाडक्या लेकीला, सुनेला, नंदीला, भावजयला, आपल्या वहिनीला, हा परोपरीने आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तिची काळजी घेतात तिला हवं नको ते बघतात. ती आनंदी राहिली बाळ देखील निरोगी आणि आनंदी राहील, तिचे खाण्याचे आवड, व्यवस्थित वेळोवेळी घेतल्या जाणारी औषधे, फळ योग्य तो आहार आणि बाळावर गर्भसंस्कार चांगले होण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती हा गर्भवती स्त्रीची काळजी घेतो.
त्यानंतर दिला सातव्या महिन्यात किंवा नव्या महिन्यात चोळीचा कार्यक्रम केला जातो. डोहाळ जेवण देखील या कार्यक्रमाला म्हटले जाते हा कार्यक्रम अगदी आनंदात आणि हर्ष उल्लासात घरातली मंडळी पार पाडतात. तिची ओटी भरणे, तिला फुलांनी सजवणे अगदी तिला फुलांचा टोप बाजूबंद व तिच्या गर्भाला देखील म्हणजेच पोटाला देखील फुलांनी सजवतात आणि तिचे डोहाळे पुरवतात,
Dohaljewan Colorful Attires 2024: खेळल्या जाणारा छोटासा गेम त्यावेळेस तिला आता मुलगा होईल की मुलगी म्हणून यासाठी लपून दोन वाट्यांमध्ये वेगळे पदार्थ ठेवले जातात त्यामध्ये एका वाटीत पेढा आणि बर्फी ठेवतात किंवा जिलेबी.
पेढा जर गर्भवती स्त्रीने काढला तर तिला मुलगा होईल असे मानले जाते तर गर्भवती स्त्रीने बर्फी किंवा जिलेबी काढली तर तिला मुलगी होईल असे मानतात. सर्वेजन काळजी घेतात.
Dohaljewan Colorful Attires 2024: डोहाळे १
मंदमंद पाऊले कैसे तुझे डोहाळे। सांग सखे साजणी ग सांग सखे साजणी ।। धृ।।
पहिल्यात वाटे पितच झाले। दुसऱ्यात मात्र चिन्हाची वेगळे ।। तिसऱ्यात तुझे मंद स्मीत हासणे ।। १ ।।
चौथ्या मासाची आवड पुसती । मैत्रीणी तुझ्या विनोद करीती ।। काजुन मुरडून वाकुन चालने सागसरू ।। २।।
पाचव्यात चांदणी सहाव्यात अंधारी। चोळ्याघालीती सासरी माहेरी ।। होसने नदी काठी बागेत जवेणे ।। ३।।
सातव्यात तेज किती आठवण्यात व्यास होती।। तुझ्या मनामध्ये बाळ कसे हासरे।। बाळ कसे साजरे ।। ४ ।। नऊ मास नऊ दिन होता ।। पुत्ररत्न जन्मले ।। बाळाचे तेज कसे सुर्य किरणा वाणी ।। ५ ।।
Dohaljewan Colorful Attires 2024: डोहाळे (२)
लाजेची गळाली गाळी का तुझ्या उमटली ।। काय तुझी ती गोष्ट नवी ग। आज आम्हाला कळली ।।
पहिले मासी पित झाकले। अशी का ग मनी कल्पना ।।
दुसरे मासी वास ये तसे। अन्नमुळीच जाइनं ।।
तिसरे मासी चोर चोळी। करूनी हौस पूरवी ।।
चौथे मासी सखी या माझी। लाजुनी बघसी खाली ग।।
पाचवे मासी हिरवा चुडा। हिरवी साडी चोळी ग।।
बागेमध्ये मंडप देवुनी। झोल्यावरती बसविली ।।
सहावे मासी तेज चढतसे। सातवे मासी मंदत ।।
आठवे मासी आई पुसत से। वदनी नाही सांगत।।
गोड गोड त्या मधुस्वादाने। गर्दि मी केली।।
नऊ मासे हे पुर्णची होता। कोमेजुनी सखी जात से।।
प्रेम आईच्या प्रिय सहवासी। गोड घीरावयतसे ।।
शिशुवद जाते पाहूनी। नव तेजाने उजळली ।।
Dohaljewan Colorful Attires 2024: डोहाळे (३)
गर्भिणी झाला बाला। आनंद हा मनाला ।। धृ ।।
पहिले मासी लाजे बाळा। सांगेना ती कोणाला ।।१।।
दुसरे मासी ओळखीला हा हा हा गर्भाचा तो सोहळा ।।२।।
तिसरे मासी चोर चोळी। चौथ्यात चोळी पिवळी ।। पाचवे मासी चुडा भरा। हा हा हा रे गर्भिणी या नारीला ।।३।।
सहावे मासी हिची काया। गर्भाची पडली छाया ।। सातवे मासी ओटी भर हा हा हा। गर्भिणी या नारीला ।।४।।
आठवे मासी आठ अंगोळी घाला उंबराची माळ। करीता ती आहेराला गर्भिणी या नारीला ।।५।।
नऊ मासी नऊ दिन। पुत्र जन्मले सुदीन ।। सासरी ही माहेरी हा हा हा रे आंनद तो झाला ।।६।।
गर्भिणी झाला बाला।।७।।
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….