Ganesh Chaturthi Shubh Muhurat: श्री गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या!
Ganesh Chaturthi Shubh Muhurat: गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ढोल-ताशांचा गजर, मोदकांचा सुगंध आणि घराघरांत सुरू असलेली लगबग हे सारे गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी दर्शवत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती कधी आणायची, पूजा कधी करायची, असे अनेक प्रश्न गणेशभक्तांच्या मनात आहेत. पण तुम्हाला माहितेय का, यावर्षी गणपती बाप्पा गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ दिवस आधीच आपल्या भेटीला येणार आहेत! तर चला, जाणून घेऊया यंदाची नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त…
गणेश चतुर्थी 2025 नेमकी तारीख
गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. यावर्षीच्या कॅलेंडरनुसार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी (बुधवार) गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवसापासून सुरू होणारा गणेशोत्सव ११ दिवस चालतो.
अनंत चतुर्दशी (गणपती बाप्पाचे विसर्जन) ६ सप्टेंबर २०२५
यावर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या दरम्यान गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.

गणेश चतुर्थी 2025 शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi Shubh Muhurat
गणपती बाप्पाला आपल्या घरी आणून त्यांची स्थापना आणि पूजा करण्यासाठी काही शुभ मुहूर्त आहेत. या वेळेत पूजा केल्यास त्याचे शुभ फल मिळते, असे मानले जाते.
गणेश पूजा शुभ मुहूर्त सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० पर्यंत.
निषिद्ध चंद्रदर्शन वेळ सकाळी ०९:२८ ते रात्री ०८:५७ पर्यंत. (या वेळेत चुकूनही चंद्र पाहू नये.)
“चला ग सख्यांनो, करूया हरतालिकाचे ‘हे’ व्रत, जे पार्वतीने केलं होतं शंकरासाठी”
थोडक्यात गणपती बाप्पाची ओळख आणि महत्व.
Importance and identity of Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi Shubh Muhurat: गणपती ज्याला बाप्पा, विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी आपण संबोधतो तो हा गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, ६४ कलांचा अधिपती, विघ्नांचा नियंत्रक म्हणजे विघ्नहर्ता नाशकमानला जाणारा देव आहे.
गणपती वाहन उंदीर असून, गणपती बाप्पा हिरव्या तीन पान असलेल्या दुर्वा आवडतात. ज्या २१ संख्येने गणपतीच्या डोक्यावर व्हायला जातात. शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत वडील शंकर आई पार्वती पत्नी ऋद्धी, सिद्धी अन्य नावे नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण
गणपतीची महत्त्वाची बारा नावे
Twelve important names of Lord Ganesha
१.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
गणपती बाप्पाचा मंत्र ॐ गं गणपतये नमः जो अतिशय फलदायी आहे.
पुराण, मुद्गल पुराण तीर्थक्षेत्रे अष्टविनायक
Ganesh Chaturthi Shubh Muhurat: श्री गणेशाची अनेक नावे आपण ऐकले आहे. नुसते श्री म्हटल्यावर पण या गणपतीत देवतेची आराधना केल्या जाते. पुराणांमध्ये गणपती शिवहर, पार्वतीपुत्र नावाने शंकरपार्वतींचा मुलगा नावाने उल्लेखित आहे. गणपतीची इतर असंख्य अशी नावे आहेत.
“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”
Ganesh Chaturthi Shubh Muhurat: असे म्हणतात की,माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही ही देवता ओळखली जाते. कोणत्याही कार्य ची सुरुवात ही श्री गणेशाने केली जाते या देवतेस अग्रपूजेचा मान असतो. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे.
Ganesh Chaturthi Shubh Muhurat: आपल्या संस्कृतीमध्ये पुराण व साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणपती हा महाभारताचा लेखनिक होता. भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. तसेच महाराष्ट्रातील कोकण भागात देखील गणेशोत्सव हा अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
माहिती योग्य वाटल्यास आपण इतरांना देखील शेअर करू शकता.
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना,पैसे सुरक्षित ठेवून करा दुप्पट!