Ganesh Jayanti 2025 In Marathi: कशी साजरी करावी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची गणेश जयंती?
Ganesh Jayanti 2025 In Marathi: गणेश जयंती, हा एक महत्त्वाचा सण, दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. गणपतीला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम पुजले जाते. गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते.
या माघी चतुर्थीला विनायकी चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखले जाते.
2025 मध्ये,यंदा माघी गणेश जयंती १ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान गणेशाची विशेष पूजा केली जाते आणि त्यांच्या जन्माची कथा ऐकली जाते.
ही गणेश जयंती कशी साजरी करतात? या गणेश जयंतीचे महत्त्व काय? शुभ मुहूर्त कोणते या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.
गणेश जयंतीचे महत्त्व
Impotance of Ganesh Jayanti
गणेश जयंती हा दिवस गणपतीच्या उपासकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते, असे मानले जाते.
गणेश जयंतीच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्याने हे तो लाभ
ॐ गं गणपतये नमः
ॐ श्रीं गं सोभ्याय गणपतये वर वरद सर्वजन में वशमानय स्वाहा
ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा
ॐ गं क्षिप्रप्रसादनाय नमः
ॐ गणेश ऋणं छिन्धि वरेण्यं हुं नमः फट
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्
श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धितायं
अमेयाय च हेरंब परशुधारकाय ते। मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः
Ganesh Jayanti 2025 In Marathi: शुभ मुहूर्त
१ फेब्रुवारी, सकाळी ११:३८ ते दुपारी १:४० पर्यंत अजून,पूजेचा कालावधी: २ तास २ मिनिटे
गणेश जयंती पूजा विधी
Ganesh GaytnJ Puja Method
Ganesh Jayanti 2025 In Marathi: स्नान केल्यानंतर, चौरंगावर स्वच्छ कपडा ठेवावा. तसेच, गणारायाच्या मूर्तीची स्थापना करावी.
पंचामृताचा म्हणजेच पाणी दूध मध दही आणि तूप याचा अभिषेक करावा.
त्यानंतर गणपती धूप लावावा आणि दिवा लावावा दिव्याची देखील पूजा करावी.
गणपतीला आवडणाऱ्या दूर्वा व्हाव्यात. लाल फुल आणि गुळाचा देखील नैवेद्य दाखवतात.
तसेच गणपती अथर्वशीर्ष चे २१ पाठ घ्यावेत.
तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.
गणपतीचा जन्म कथा
The Birth story of Lord Ganesha
गणेश जयंतीच्या विविध कथा तसेच गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा प्रचलित आहेत.
Ganesh Jayanti 2025 In Marathi: वराहपुराणातनुसार जेव्हा भगवान शंकराची डोळे उघडले तेव्हा ते हसले आणि त्यांनी त्या हास्यातून भगवान श्री गणेशाच्या जन्म झाला. तर जो त्याच्या वडीलासारखाच होता मुलाला त्याच्या वडीलापासून वेगळे करण्यासाठी म्हटले जाते की शक्ती गणेशाला हत्तीचे डोके दिले जे भौतिक वैभवाचे प्रतीक आहे.
गणपतीच्या जन्माची कथा खूप interesting आहे. देवी पार्वतीच्या शरीरावरील हळद आणि तेलाचा लेप वापरून त्यांनी गणेशाला जन्म दिला. गणेशाला द्वारपाल म्हणून ठेवले आणि कोणालाही आत येऊ नये असे सांगितले. एकदा भगवान शिव (पार्वतीचे पती) आले असता, गणेशाने त्यांनाही अडवले.
यामुळे क्रोधीत होऊन भगवान शिवाने त्रिशुळाने गणेशाचे शीर धडले. पार्वतीला हे समजल्यावर त्यांनी भगवान शिवाला आपला मुलगा परत मागितला. तेव्हा भगवान शिवाने त्यांच्या गणांना उत्तर दिशेला जाऊन सर्वप्रथम दिसणाऱ्या प्राण्याचे मस्तक आणण्यास सांगितले. गणांना हत्तीचे मस्तक मिळाले, ते त्यांनी गणेशाच्या धडावर लावले आणि त्याला पुनर्जीवित केले. तेव्हापासून गणेशाला गजानन असेही म्हणतात.
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
Ganesh Jayanti 2025 In Marathi: हे तुम्ही वाचले आहे का?
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?
महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !