Ganpati special aarti in Marathi: सुखकर्ता दुखहर्ता आरतीतील तिसरं कडवं
Ganpati special aarti in Marathi: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असून, गणेश चतुर्थी म्हणजे चैतन्य आणि आनंदाचा सोहळा सुरू होणार आहे.’सुखकर्ता’ आरती म्हटल्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती सगळ्यांना तोंडपाठ आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, याच आरतीमध्ये नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात एक खास कडवं म्हटलं जातं, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल? तुमच्या आरतीमध्ये ‘चरणीच्या घागरिया रुणझुण वाजती’ हे कडवं नाहीये, पण नागपूरच्या आरत्यांमधून गणपती बाप्पाच्या पायातील घुंगरांचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.
Ganpati special aarti in Marathi: जे गणपती आरती मधलं कडवं इतर ठिकाणी सहसा ऐकू येत नाही. या अनोख्या कडव्यामुळे ही आरती आणखी गोड आणि खास वाटते. या लेखात आपण याच तिसऱ्या कडव्याची आणि ‘ओवाळा ओवाळा’ यासारख्या स्थानिक आरत्यांची ओळख करून घेणार आहोत, ज्या विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
“गणपती इलोय”बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली का?
चला, पाहूया श्रीगणेशाची अनोख्या कडव्यासह संपूर्ण आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची ।। धु ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शन मात्रे मनः कामना पूर्ती ।।१।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुम केशरा ।।
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।२।।
चरणीच्या घागरिया रुणझुण वाजती ।
तेथे नांदे देव अंबर गर्जती ।।
टाचा ठुमकत ठुमकत नाचे गणपती ।
शंकर पार्वती कौतुक पाहती ।।३।।
लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निवार्णी रक्षावे सुरवर वंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।।४।।
लयबद्ध म्हटल्या जाणारी ओवाळा ओवाळा आरती
Wovala wovala Aarti
ओवाळा ओवाळा माझ्या सतगुरु राया माझ्या सावळ्या राया,
पांचही तत्वाचा ज्योती लावल्या राया निरंकार वस्तु कशी आकारा आली ।।२।।
सर्वांगतीया प्रकट माझी सतगुरु माऊली
सोळा सत्रह बाहत्तर कोटी काया रंचली
नव खिडक्याचा डोर आंत मुर्ती बसविली
सप्त सागराचा वेडा कशा घातला तुका म्हणे बाप माझा कैवाड्डु आला
अखंड माझ्या सावळ्या राया पांचही तत्वाचा ज्योती लावण्या राया!
Ganpati special aarti in Marathi: “चला ग सख्यांनो, करूया हरतालिकाचे ‘हे’ व्रत, जे पार्वतीने केलं होतं शंकरासाठी”