Gauri Ganpati Aarti sangrah: आरती संग्रह
Gauri Ganpati Aarti sangrah: सणासुदीच्या दिवसांत घराला एक वेगळीच शोभा येते, गौरी-गणपतीचे आगमन होते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तुम्ही पूजेसाठी तयारी करता, पण ऐनवेळी आरतीचे पुस्तक सापडत नाही आणि तुमचा हिरमोड होतो. अख्खं घर शोधा, पण ते पुस्तक काही हाती लागत नाही. तुम्ही याच समस्येवर उपाय शोधत असाल तर काळजी करू नका.
Gauri Ganpati Aarti sangrah: तुमच्यासाठी आम्ही महालक्ष्मीच्या सर्व आरत्या एकाच ठिकाणी घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही. चला, या आरत्यांच्या माध्यमातून आपल्या आराध्य देवीला वंदन करूया.
दाते पंचांगानुसार ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन
श्री गणेशाची आरती
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
श्री देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
विपुल दयाघन गर्जे
विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबर श्रीरेणुके वो |पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ।धृ .।।.।। .।।
श्रमलीस खेळुनी नाचूनी गोंधळ घालूनि ब्रह्मांगणी वो । निजलिस कशी दीनाची चिंता सोडुनी अंतःकरणी वो | उठ लवकर जगदंबे त्र्यैलोक्याची तू स्वामिनी वो । विधी हरी हर अज्ञानी पूर्ण ज्ञानी तू शहाणी वो । समर्थ परमेश्वरी तू अनंत ब्रह्मांड नायिके वो || १ || पळभर ।। धृ।।
शरणागत मी आलो परि बहू चुकलो बहु बोलावया वो | तुज जननीचे नाते लाज न वाटे लावावया वो | परि तूं दिनांची जननी अनाथांची तुज बहु दया वो । हे श्रुति सत्य की असत्य अनुभव आलो मी पहावया वो | कळेल तैसी करी परि निज ब्रीद रक्षी मम पालिके वो || २ || पळभर ।। धृ .।।
भवगदे पिडलो भारी मजला दुःख हे सोसेना वो | अजुनी अंबे तुजला माझी करुणा का येईना वो | तारी अथवा मारी धरिले चरण मी सोडीना वो | कृपा केलियावाचुनी विन्मुख परतुनी मी जाईना वो | तुजवीन जगी कोणाचे वद पद प्रार्थावे अंबीके वो || ३ || पळभर ।।धृ .।।
ऐकूनी करुणा वाणी ह्दयी सप्रेम द्रवली हो । प्रसनमुख जगदंबा अंबा प्रसन्न जाहली हो । अजरामर वर द्याया प्रगटुनी पुढे उभी राहिली हो । भक्तांकित अभिमानी विष्णुदासाची माऊली हो ।|जी निज इच्छा मात्रे सुत्रे हालवी कवतुके हो || ४ ||पळभर ।। धृ .।।
“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”
आरती रेणुका देवीची
जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे || धृ ||
अनुपम स्वरुपाची | तुझी घाटी | अन्य नसे या सृष्टी | तुझ सम रूप दुसरे | परमेष्टी || करिती झाला कष्टी | शशी रसरसला | वदनपुटी | दिव्य सुलोचन दृष्टी | सुवर्ण रत्नांच्या ||शिरी मुकुटी लोपती | रविशशी कोटी | गजमुखी तुज स्तविले | हेरंभे मंगल सकलारभे || जय जय || १ ||
कुमकुम शिरी शोभे | मळवटी | कस्तुरी तिलक ललाटी | नासिक अति सरळ | हनुवटी ||रुचीरामृत रस ओठी | समान जणू लवल्या | धनकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी | शशी नित भांग वळी| उपराटी ||कर्नाटकाची घाटी | भुजंग नीळरंगा | परी शोभे वेणी पाठी वरी शोभे ||जय जय ||२ ||
कंकणे कनकाची | मनगटी | दिव्य मुंद्या | दश बोटी बाजूबंद नगे | बाहुबटी ||चर्चुनी केशर उटी | सुगंध पुष्पानचे हार कंठी | बहु मोत्यांची दाटी | अंगी नवचोळी | जरीकाठी ||पीत पितांबर तगटी | पैजन पदकमली | अति शोभे | भ्रमर धावती लोभे || जय जय ||३ ||
साक्षप तू क्षितिजा | तळवटी | तुज स्वये जगजेठी | ओवाळीन आरती |दीपताटी ||घेउनी कर समपुष्टी | करुणामृत हुदयी | संकष्टी | धावती भक्तांसाठी विष्णू सदा | बहु कष्टी ||देशील जरी नीजभेटी | तरी मग काय उणे | या लाभे | धाव पाव अविलंबे || जय जय || ४ ||
जय जय जगदंबे
जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे | जय जय || धृ ||
अनुपम स्वरुपाची तुझी धाटी | अन्य नसे या सृष्टी |तुज सम रूप दुसरे, परमेष्टी | करिता झाला कष्टी |शशीरस रसरसला ,वदनपुटी | दिव्य सुलोचन दृष्टी |सुवर्ण रत्नांच्या, शिरी मुकुटी | लोपती रविशशी कोटी |गजमुखी तुज स्तविले हेरंबे | मंगल सकळारंभे || जय जय || १ ||
कुमकुम चिरी शोभे मळवटी | कस्तुरी टिळक लल्लाटी |नासिक अति सरळ, हनुवटी | रुचिरामृत रस ओठी |समान जणू लवल्या, धनुकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी |शिरी नीट भांगवळी, उफराटी | कर्नाटकची घाटी |भुजंग नीळरंगा, परी शोभे | वेणी पाठीवर लोंबे || जय जय || २ ||
कंकणे कनकाची मनगटी | दिव्य मुद्या दश बोटी |बाजूबंद जडे बाहुबटी | चर्चुनी केशर उटी | सुगंधी पुष्पांचे हार कंठी |बहु मोत्यांची दाटी | अंगी नवी चोळी, जरीकाठी | पीत पितांबर तगटी |पैंजण पदकमळी, अति शोभे | भ्रमर धावती लोभे || जय जय ||३ ||
साक्षप तू क्षितिच्या तळवटी | तूचि स्वये जगजेठी |ओवाळीत आरती, दिपताटी | घेऊनी कर संपुष्टी |करुणामृत हृदये, संकटी | धावसी भक्तांसाठी |विष्णूदास सदा, बहुकष्टी | देशील जरी नीजभेटी |तरी मग काय उणे, या लाभे |धाव पाव अविलंबे || जय जय || ४ ||
काशी आमची रेणुका
काशी आमुची रेणुका, मुळपीठ नायीका ।जे जे कल्पिले ते देसी, इच्छा पुरवीसी ।।
म्हणुनी प्रार्थना अंबेसी, पावे मज दिनासी ।। ध्रु।।
अणिमा महिमा महिमा, बाळा बगळा शामा।सिता सावित्री, हिचं आमुची यमा ।।ऐसे करुणेच् उत्तर मातापुर सुंदर ।।१।।
पायी पैंजण वाजती, कानी बाळ्या शोभती ।माथा बिंदल्या झळकती, त्याची प्रभा फाकती ।।कुंकुम लाविले लल्लाटी, हार शोभतो कंठी ।।२।।
अंबे नाव तुझे चांगले, मन माझे रंगले ।अंबे नाव तुझे, भवानी जपतो हा निर्वाणी ।।३॥
रेणुका देवीची आरती
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी। कन्या-सुख दाता, धन माझे मिथ्या वदतो वाणी। अंती नेतील यमदुत। संगे न ये कोणी। निर्गुण रेणुका भवानी जपतो हा निर्वाणी।। लोलो।।१।।
पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर। नयनी रक्षिता आकार। अवघा तो ईश्वर। नाही सुख – दुःख देहाला भासे शून्याकार।। लोलो।।२।।
निद्रा लागली अभिध्यानी लागे अणुसंधनी | लीला वर्णिता स्वरूपाची शिणली वेद वाणी। देखूनी जगदंबा भवानी, त्रैलोक्य तारणी || लोलो ||३||
गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा। दिवट्या उजळल्या सदोदित पोत चैतन्याचा। आहं सोहं उदो उदो उदो बोलती चारी वाचा।।। लोलो।।४।।
पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत। तेथे भोपे भट। तेथे उंजाळ मोहाळ, तेथे पाणी अलोट देशमुख तानाजी, झाला ब्रम्हरूप ||।५।।
जय जय भवानी
जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || घृ ||
नैसुनी पाटाउ पिवळा, हार शोभे गळा | हाती घेउनिया त्रिशूळा | भाळी कुमकुम टिळा || जय जय भवानी || १ ||
अंगी लयुनिया काचोळी, वर मोत्यांची जाळी | ह्रुदयी शोभतसे पदकमली | कंठी हे गरसोळी || जय जय भवानी || २ ||
पायी घांगरीया रुण झुन, नाकी मुक्ताफाळ | माथा केश हे कुरळ | नयनी हे काजळ || जय जय भवानी || ३ ||
सिंहावरी तू बैसुनी, मारिती दानवगण | तुजला विनवितो | निशी दिन गोसावी नंदन || जय जय भवानी || ४ ||
लक्ष कोटि चंड किरण
लक्ष कोटि चंड किरण सुप्रचंड बिलपति,अंब चंद्र वदन बिंब, दीप्ती माजी लोपती,सिंह शिखर अचलवासी मूळपीठ नायिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 1
अकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले,डोलताती पुष्प-हार भार फार दाटले,अष्टदंडी बाजूबंदी कंकणादि मुद्रिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 2।
इंद्रनीळ पद्म राग पांच हीर वेगळा,पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा,पैंजणादि भूषणे ती लोपल्या ती पादुका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 3।
इंद्र चंद्र विष्णु ब्रम्ह नारदादी वंदिती,आदि अंत ठावहीन आदिशक्ती भगवती,प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 4।
पर्वताग्र वासी पक्षी अंब-अंब बोलती,विशाल शाल वृक्ष राणी भवानी ध्यानी डोलती,अवतार कृत्य कार जडमुठादि तारिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 5।
अनंत ब्रम्हांड कोटी पूर्वमुखा बैसली, अनंत गुण अनंत शक्ति विश्वजननी भासली,सव्य भागी दत्त-अत्री, वाम भागी कालिका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका…। 6।
पवित्र मातृ क्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी,अंब दर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी,म्हणूनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका,धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका…।7। ||
उदो उदो जगदंबे माते
उदो उदो ग जगदंबे माते ।
महालक्ष्मी आई घेई देते माना ते ।।१ ।।
थोर त्रिलोकी भाग्य लाभले आश्विन मासाते ।
नवरात्रातील अष्टमीच्या दिनी येणे तव घडते ।।
उदो . || २ ||
तांदुळ पीठीचा करिती मुखवटा भक्ती भावाने ।
पुजा करिती सुवासिनी मग मोदा ये भरते ।।
उदो || ३ ||
धूप सुवासिक कोणी त्या जिती घेती कलशाते ।
कलश फुकिता खेळ खेळतां झुम्मा – फुगडी ते ।।
उदो ।।४ ।।
निवास तुमचा होता झाला भूवरी क्षेत्राते ।
तुळजापूर कोल्हापूर तैसे माहूर पवित्र ते ।।
उदो || ५ ||
जय जय नदिपति प्रिय तनये
जय जय नदिपति प्रिय तनये । भवानी, महालक्ष्मि, माये ॥ध्रु०॥
आदि क्षिरसागररहिवासी । जय जय कोल्हापुरवासी
अंबे भुवनत्रयिं भ्रमसी । सदा निजवैकुंठीं वससी
दुर्लभ दर्शन अमरांसी । पावसि कशि मग इतरांसी
( चाल ) करुणालये मोक्षदानीं
भक्त जे परम – जाणती वर्म – सदा पदिं नरम
कृपेनें त्यांसी सदुपायें । संकटीं रक्षिसि लवलाहे ॥१॥
अमरेश्वर विधिहरिहर । मिळाले असुरांचे भार
मंदाचल नग रवि थोर । केला वासुकिचा दोर
ढवळिला सागर गर – गर । रगडिले जलचर मीन मगर
( चाल ) लाजती कोटि काम पोटीं
तुझें सौंदर्य – गळालें धैर्य – म्हणती सुर आर्य
जाळितो रतिपति सोसुं नये । होतां जन्म तुझा सुनये ॥२॥
त्रिभुवनस्वरुपें तूं आगळी । वरिलासी त्वां वनमाळी
तुजसम न मिळे वेल्हाळी । शंकर मकरध्वज जाळी
न मिळे स्पर्शहि पदकमळीं । पदरज लागो तरि भाळीं
( चाल ) पितांबर शोभतसे पिवळा
बहारजरतार – हरिभरतार – तरि मज तार
स्तवितां तुज जरि गुणग्रहे । दशशतवदनांही भ्रम ये ॥३॥
सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण तुझे ध्यानीं
दृढासन घालुनि निर्वाणीं । बैसले महामुनि तपिं – ध्यानीं
तरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुण वर्णुं कसे वदनीं
( चाल ) जरी हा विष्णुदास तूझा
बहु अपात्र – करी सुपात्र – कृपा तिळमात्र
करोनी मोक्षपदीं वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥४॥
Gauri Ganpati Aarti sangrah:या हा आरती संग्रह नक्कीच तुम्हाला गौरी गणपती म्हणजेच महालक्ष्मी यांना आरतीचा काल धरायला लावतील इतरांना देखील शेअर करा.
Gauri Ganpati Aarti sangrah: ऐकलं का तुम्ही? आता मुख्यमंत्री, पंतप्रधानही धोक्यात! नवीन विधेयक आज संसदेत सादर
Gauri Ganpati Aarti sangrah: