Hartalika vrat 2025 in Marathi: “चला ग सख्यांनो, करूया हरतालिकाचे ‘हे’ व्रत, जे पार्वतीने केलं होतं शंकरासाठी”

Hartalika vrat 2025 in Marathi: मनोवांछित वर आणि अखंड सौभाग्यासाठी, जाणून घेऊयात सविस्तर माहिती

Hartalika vrat 2025 in Marathi: नमस्कार, श्रावण महिन्याची सांगता झाली ती पोळा या सणाने, म्हणतात ना ‘पोळा सगळे सण झाले गोळा’.आता येत्या मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीयेचे व्रत (Hartalika vrat) येत आहे. भारतीय संस्कृती आणि शास्त्रांमध्ये या व्रताला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. केवळ सुवासिनीच नाही तर कुमारिका मुलीदेखील आवडीचा जीवनसाथी (मनोवांछित वर) मिळवण्यासाठी हे व्रत मनोभावे करतात.

Hartalika vrat 2025 in Marathi: सौभाग्य आणि सुखी संसाराची कामना करणाऱ्या सुवासिनींसाठी तर हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चला, तर मग या लेखातून आपण हरतालिकेच्या व्रताची माहिती घेऊया – ज्यामुळे तुम्हाला पूजेच्या दिवशी नक्कीच मदत होईल.

“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”

Hartalika vrat 2025 in Marathi: "चला ग सख्यांनो, करूया हरतालिकाचे 'हे' व्रत, जे पार्वतीने केलं होतं शंकरासाठी”


हरतालिका व्रताचे महत्त्व आणि पूजा साहित्य

Importance of Hartalika fast and puja literature


Hartalika vrat 2025 in Marathi: हरतालिका व्रत हे मुख्यत्वे सौभाग्य आणि वैवाहिक सुखासाठी केले जाते. यासाठी काही विशिष्ट साहित्य वापरले जाते, जे व्रताची शोभा वाढवते

सुवासिनींचे सौभाग्य अलंकार बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी, कुंकवाचा करंडा आणि फणी (फणी).

मक्याचे कणीस, काकडी आणि मुळा यांना दोऱ्याने पाच वेळा गुंफून ठेवले जाते.

पूजेसाठी आवश्यक: वाळू (बारीक, शक्यतो गंगेची वाळू), चौरंग, केळीचे खांब किंवा झाडांचे तोरण, फुले, विड्याचे पान, एक-दोन फळे, ओटीचे सामान.

विविध झाडांची (वेलींची, फळझाडांची, फुलांची) ११-११ पाने.
हे व्रत कुमारिका मुलीदेखील करतात. काही ठिकाणी हे व्रत एकादशीप्रमाणे केले जाते, तर काही ठिकाणी फक्त एकदाच जेवण करून करतात.

हरतालिकेची पूजा कशी करावी?

Hartalika puja

Hartalika vrat 2025 in Marathi: एका विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारीचा गणपती ठेवा. या गणपतीची पूजा आणि आराधना करून व्रताची सुरुवात करा.

त्यानंतर स्थापित केलेल्या वाळूच्या महादेवाला सर्वप्रथम फुलाने पाणी शिंपडा. त्यानंतर दूध आणि परत पाणी असा अभिषेक घाला. बेलाचे पान आणि विविध झाडांची ११-११ पाने महादेवाला अर्पण करा.

Hartalika vrat 2025 in Marathi:वस्त्र आणि पांढरे फूल वाहा. त्यानंतर नैवेद्य दाखवून महादेवाची आरती करा.पूजेनंतर हरतालिकेची कहाणी वाचा.

Hartalika vrat 2025 in Marathi: सर्वप्रथम बारीक वाळू धुवून घ्या. ती चौरंगावर ठेवून कमानीचा आकार द्या. मध्यभागी शिवलिंग आणि नंदी यांची रचना करा. तसेच पार्वती आणि तिच्या सख्यांचीही प्रतिकृती तयार करा. जेवढ्या स्त्रिया पूजा करत असतील, तेवढे वेगवेगळे शिवलिंग तयार करणे शुभ मानले जाते. चौरंगाच्या बाजूने केळीचे खांब किंवा झाडांच्या फांद्या लावून जागा सुशोभित करा.

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना,पैसे सुरक्षित ठेवून करा दुप्पट!

Hartalika vrat 2025 in Marathi: "चला ग सख्यांनो, करूया हरतालिकाचे 'हे' व्रत, जे पार्वतीने केलं होतं शंकरासाठी”

श्री हरितालिकेची कहाणी

story of Hartalika


हरितालिके ऐका, तुमची कहाणी!
एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती, पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतांत चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरीं पडलें हेंही मला सांगा.”


तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेंच तूं पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस, आणि त्याच पुण्याईनं तूं मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यांतल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तूं कसं केलंस तें मी तुला आतां सांगतो.”


“तूं लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चोसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हीं तिन्हीं दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अशी कन्या कोणास द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यांत तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी, तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”
होती. चांगलं एखादं बयाईने


हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.


ग्रहांत श्रेष्ठ, श्रेष्ठ वर त. ते करावं,
नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तूं रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तूं सांगितलंस, ‘महादेवावांचून मला दुसरा पती करणे, नाहीं, असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा?’
मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यांत नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली.
त्या गुहेंत जाऊन तूं उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्रीं जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलों. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तूं म्हणालीस, ‘तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही.’


नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढ दुसया दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यांत तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तूं सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं व तुला घेऊन तो घरी गेला. मग कांही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यानें तुला मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.


“ज्या ठिकाणीं हैं व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून तें स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारें त्याची पूजा करावी आणि मनोभावें त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्रीं जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहींसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियाचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशीं बायकांनी जर कांहीं खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गोईचे गोठीं, पिंपळाचे पारीं सुफळ संपूर्ण.


आरती शंकराची

Aarti of lord shiva


लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा । विर्षे कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।। जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥धृ०॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।। विभूतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय० ॥२॥

देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें । त्यामाजी अवचित हलाहल उठिलें । तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय० ॥३॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी। शतकोटींचें बीज वाचे उच्चारी। रघुकुळटिळक रामदासाअंतरी ॥ जय० ।।४।।

Hartalika vrat 2025 in Marathi: ”आज आवतन घे, उद्या जेवायला ये…”या म्हणीतून सुरू होतो, विदर्भातला तान्हा पोळा!

Loading